Welcome to misalpav.com
लेखक: अनन्त्_यात्री | प्रसिद्ध:
kumpan

चांदणठिणग्यांचे नभझुंबर पहाटफुटणीत विझता विझता शब्द गवसले- त्यांची पडझड बघत राहिलो दिवस उगवता

शब्दाशब्दामधुनी वाटले- येईल काही अमोघ उसळत पण निष्प्रभ अर्थाचा खुर्दा आला हाती.. बसलो मोजत साखरझोपेच्या काठावर शब्द भासले होते ओतीव धग दिवसाची सोसून कळले ते ही निपजले पोकळ, निर्जीव लख्ख समजले पुन्हा यापुढे भ्रमनिरास ना होऊ देणे ओलांडून शब्दांचे कुंपण अर्थनिरर्थापल्याड जाणे