- 6272 views
भारतातील काही अप्रसिद्ध युनेस्को जागतिक वारसा स्थळांबाबत बोलण्याआधी, आपण युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणजे नेमके काय हे समजून घेऊ या. जागतिक वारसा स्थळ म्हणजे अशी कुठलीही मानवनिर्मित वास्तू किंवा नैसर्गिक जागा, जी सांस्कृतिक, ऐतिहासिक, शास्त्रीय किंवा इतर कुठल्याही कारणाने महत्त्वाची आहे आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी जिचे जतन होणे गरजेचे आहे. निसर्गाने किंवा मानवाने बनवलेली अशी एक सुंदर कलाकृती, जी कलात्मकदृष्ट्या किंवा नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाची आहे, एक असा अमूल्य ठेवा, जो भविष्यात जन्म घेणार्या सगळ्या मानवांसाठी जपून ठेवायला हवा. युनेस्को अर्थात United Nations Educational, Scientific and Cultural Organization ही जागतिक संस्था जगभरातल्या अशा ठिकाणांना जागतिक वारसा स्थळे घोषित करण्याचे काम करते. एखाद्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित स्थळाचे महत्त्व अधोरेखित करणे, त्याचा मोठेपणा जगासमोर आणणे आणि त्याचे संवर्धन व्हावे ज्यासाठी जागरूकता निर्माण करणे, त्या दृष्टीने जनमत तयार करणे ह्या कारणांसाठी त्या ठिकाणाचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश केला जातो.
जगभरात ११९९ जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यातली सर्वाधिक (५९) इटली ह्या देशात आहेत. त्याखालोखाल चीनचा क्रमांक लागतो, ह्या देशात ५७ जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यानंतर फ्रान्स आणि जर्मनी हे देश संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत, ह्या देशांमध्ये प्रत्येकी ५२ जागतिक वारसा स्थळे आहेत. या यादीत आपला भारत सहाव्या स्थानावर असून आपल्या देशात ४२ जागतिक वारसा स्थळे आहेत. मला फिरायला आवडते, खासकरून जागतिक वारसा स्थळांना भेट द्यायला तर मी एका पायावर तयार असतो. युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा शिक्का म्हणजे आपण भेट देत असलेले स्थळ सुंदर, महत्त्वाचे, इतरांहून वेगळे, कलात्मकदृष्ट्या संपन्न आणि उत्तम स्थितीत राखले गेले असल्याची एक पावतीच असते म्हणा ना! भारतातल्या ४२पैकी जवळजवळ २७ जागतिक वारसा स्थळांना मी भेट दिलेली आहे, राहिलेल्या इतर ठिकाणांना भेट देऊन ही टक्केवारी १००% करण्याचा माझा मानस आहे, पाहू कधी योग येतो ते! भारतातल्या जागतिक वारसा स्थळांपैकी ताजमहाल, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, खजुराहोतील मंदिरे, हंपीतील मंदिरे अशी काही ठिकाणे आपल्या परिचयाची असतात, पण त्याच वेळी आपल्याला तामिळनाडूतील चोल मंदिरे, भीमबेटकातील गुहाचित्रे, तेलंगणातील काकतीय रुद्रप्पा रामेश्वर मंदिर अशा अनेक जागतिक वारसा स्थळांची काहीच माहिती नसते. अशाच काही अपरिचित जागतिक वारसा स्थळांची माहिती करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
तामिळनाडू राज्यातील थंजावूर येथील बृहदीश्वर मंदिर, गंगाकोंडाई चोलापूरम येथील बृहदीश्वर मंदिर आणि कुंभकोणम येथील ऐरावटेश्वर मंदिर ह्या तीन मंदिरांना एकत्रित 'तामिळनाडूतील महान चोल मंदिरे' म्हटले जाते. ह्या मंदिरांच्या इंग्लिश नावात Living हा शब्द दिसतो. हा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे उभारणीपासून ते आजपर्यंत ह्या मंदिरांमध्ये अखंड पूजाअर्चा चालू आहे, त्यात कधीही खंड पडलेला नाही! ह्या मंदिरांपैकी थंजावूर येथील बृहदीश्वर मंदिर हे सगळ्यात जुने असून नुकतीच ह्या मंदिराने आपला १०००वा वाढदिवस साजरा केला. आकाराने प्रचंड अशी ही मंदिरे १००० वर्षांपूर्वी कशी बांधली असतील ह्या विचाराने थक्क व्हायला होते आणि आत्ताच एवढी सुंदर दिसणारी ही मंदिरे ऐन भरात असताना किती देखणी दिसत असतील, ह्या विचाराने मती गुंग होते. २०२३ सालच्या फेब्रुवारी महिन्यात आम्ही ह्या मंदिरांना भेट दिली, तेव्हा काढलेली काही छायाचित्रे -
गंगाकोंडाई चोलापूरम येथील बृहदीश्वर मंदिर:

कुंभकोणम येथील ऐरावटेश्वर मंदि:

थंजावूर येथील बृहदीश्वर मंदिर

मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळहून फक्त ४५ कि.मी. दूर असलेली ही गुहाचित्रे जवळपास १२००० वर्षे जुनी आहेत. काळ १०००० वर्षांपूर्वीचा असो, आजचा असो किंवा १०००० वर्षांनंतरचा असो, माणूस कलेशिवाय जगू शकत नाही, हे ही चित्रं पाहिली की स्पष्ट होतं . अश्मयुगातील मानवाने काढलेली ही चित्रे त्या काळातले मानवी जीवन कसे होते, हे दाखवणारा एक आरसाच आहेत म्हणा ना! २०१४ सालच्या मे महिन्यात आम्ही ह्या मंदिरांना भेट दिली, तेव्हा काढलेली काही छायाचित्रे -

गुजरातमधील बडोद्याला अर्थात वडोदऱ्याला अनेक जण जातात, पण तिथून फक्त ४५ कि.मी. दूर असलेल्या चंपानेर पावागद पुरातत्त्व उद्यानाची माहिती अनेकांना नसते. किंबहुना खुद्द वडोदऱ्यात राहणाऱ्या अनेकांना असे कुठले ठिकाण आपल्या शहराजवळ आहे याची कल्पना नसेल. मी म्हणेन की इथल्या काही मशिदींच्या छतावर केलेल्या कोरीवकामाचा भारतातल्या सर्वोत्कृष्ट कोरीवकामामध्ये समावेश करावा लागेल. २०१२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात आम्ही ह्या मंदिरांना भेट दिली, तेव्हा काढलेली काही छायाचित्रे -

तेलंगणातील वरंगल शहरापासून ६६ कि.मी. दूर असलेल्या ह्या मंदिराचा अगदी अलीकडे, म्हणजे २०२१ साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. काकतीय राजांच्या काळात, साधारण १२१३ साली बांधून पूर्ण झालेले हे मंदिर भव्य आणि देखणे आहेच, ते विशेष प्रसिद्ध आहे ते बाहेरील बाजूस बसवलेल्या काळ्या पाषाणातील नर्तिकांच्या मूर्तींमुळे. ह्याच वर्षी एप्रिल महिन्यात आम्ही ह्या मंदिराला भेट दिली, तेव्हा काढलेली काही छायाचित्रे -

होयसाळ राजांनी बांधलेल्या बेलूर, हळेबिडू आणि सोमनाथपूर येथील हिंदू मंदिरांचा ह्याच वर्षी जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. २०१७ साली जेव्हा बेलूर, हळेबिडू येथील दोन मंदिरांना मी भेट दिली, तेव्हा ही मंदिरे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट नाहीत ह्या गोष्टीचे मला राहून राहून आश्चर्य वाटत होते आणि ही मंदिरे आज ना उद्या या यादीत येणार, याची खातरीही होती. आणि झालेही तसेच! मी हे मागेही म्हटलो आहे आणि पुन्हा एकदा म्हणतो, भारतातल्या मंदिरांमध्ये दिसणारी सर्वोत्कृष्ट मूर्तिकला ह्या मंदिरांमध्ये दिसते. भारतातली अनेक प्रसिद्ध मंदिरे मी फिरलो आहे, पण ह्या मंदिरांमध्ये जे मूर्तिकामाचे सौंदर्य दिसते, त्याला तोड नाही. अशी मूर्तिकला भारतात काय, अख्ख्या जगात नसेल. २०१७ सालच्या मार्च महिन्यात आम्ही ह्या मंदिरांना भेट दिली, तेव्हा काढलेली काही छायाचित्रे -

चला, आपण अधिकाधिक युनेस्को जागतिक वारसा स्थळांना भेटी देऊ या, त्यांबाबत इतरांना सांगू या आणि ही वारसा स्थळे टिकवू या!

तामिळनाडूतील महान जिवंत चोल मंदिरे अर्थात Great Living Chola Temples

भीमबेटकातील गुहाचित्रे अर्थात Rock Shelters of Bhimbetka
मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळहून फक्त ४५ कि.मी. दूर असलेली ही गुहाचित्रे जवळपास १२००० वर्षे जुनी आहेत. काळ १०००० वर्षांपूर्वीचा असो, आजचा असो किंवा १०००० वर्षांनंतरचा असो, माणूस कलेशिवाय जगू शकत नाही, हे ही चित्रं पाहिली की स्पष्ट होतं . अश्मयुगातील मानवाने काढलेली ही चित्रे त्या काळातले मानवी जीवन कसे होते, हे दाखवणारा एक आरसाच आहेत म्हणा ना! २०१४ सालच्या मे महिन्यात आम्ही ह्या मंदिरांना भेट दिली, तेव्हा काढलेली काही छायाचित्रे -
चंपानेर पावागद पुरातत्त्व उद्यान अर्थात Champaner-Pavagadh Archaeological Park
गुजरातमधील बडोद्याला अर्थात वडोदऱ्याला अनेक जण जातात, पण तिथून फक्त ४५ कि.मी. दूर असलेल्या चंपानेर पावागद पुरातत्त्व उद्यानाची माहिती अनेकांना नसते. किंबहुना खुद्द वडोदऱ्यात राहणाऱ्या अनेकांना असे कुठले ठिकाण आपल्या शहराजवळ आहे याची कल्पना नसेल. मी म्हणेन की इथल्या काही मशिदींच्या छतावर केलेल्या कोरीवकामाचा भारतातल्या सर्वोत्कृष्ट कोरीवकामामध्ये समावेश करावा लागेल. २०१२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात आम्ही ह्या मंदिरांना भेट दिली, तेव्हा काढलेली काही छायाचित्रे -
काकतीय रुद्रप्पा रामेश्वर मंदिर अर्थात Kakatiya Rudreshwara (Ramappa) Temple
तेलंगणातील वरंगल शहरापासून ६६ कि.मी. दूर असलेल्या ह्या मंदिराचा अगदी अलीकडे, म्हणजे २०२१ साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. काकतीय राजांच्या काळात, साधारण १२१३ साली बांधून पूर्ण झालेले हे मंदिर भव्य आणि देखणे आहेच, ते विशेष प्रसिद्ध आहे ते बाहेरील बाजूस बसवलेल्या काळ्या पाषाणातील नर्तिकांच्या मूर्तींमुळे. ह्याच वर्षी एप्रिल महिन्यात आम्ही ह्या मंदिराला भेट दिली, तेव्हा काढलेली काही छायाचित्रे -
होयसाळ राज्यांनी बांधलेली मंदिरे अर्थात Sacred Ensembles of the Hoysalas