जे न देखे रवी...
ज्योत
Primary tabs
रिकाम-टेकडी मोठी तिच्या माथ्यावर
माझा वायफळमळा-त्याच्या बांधावर
मृगजळ साठवितो रोज थोडे थोडे
पिऊनी ते दौडतात कल्पनांचे घोडे
एकशृंगी घोडे त्यांचे पसरूनी पंख
उडतात - टाळण्यास समीक्षकी डंख
कल्पिताचे वास्तवाशी जुळवी जो नाते
ज्योत त्याची विझण्याच्या आधी मोठी होते
Oh, the magic of unicorns, So pure and bright, ...
But can't avoid critics even if he is right.
कवीता आवडली
मस्तच
+१०१
हा शब्द आवडला , हे घ्या फुस्स्स्स्स्स =))))
आवडली, नेहमीप्रमाणेच नवीन कल्पना!