जे न देखे रवी...

सांज

Primary tabs

अता आर्त हळवी हवा सांज असते
स्मृती पाखरांचा थवा सांज असते

जरी रात्र असते तुझी दाट छाया
छटांचा तुझ्या कारवा सांज असते

दिशा क्षितिज संदिग्ध करती पुन्हा अन्
पुन्हा जीवनी नाखवा सांज असते

जुने तेच ते रंग लेवून परके
समारंभ अवघा नवा सांज असते

न तू आज येथे न मी आज तेथे
अता रोज ही मारवा सांज असते

- कुमार जावडेकर

राघव

खूप दिवसांनी सुंदर कविता/गझल वाचण्यात आली! :-)

अता आर्त हळवी हवा सांज असते
स्मृती पाखरांचा थवा सांज असते

न तू आज येथे न मी आज तेथे
अता रोज ही मारवा सांज असते

दोन्ही द्विपदी अप्रतीम! :-)