जे न देखे रवी...
जुनेरलं नातं...
Primary tabs
जुनेरल्या नात्यामध्ये
ऊब गोधडीची;
विरलेले धागे तरी
जर ओळखीची..
जुनेरल्या नात्यामध्ये
अबोल पाऊस;
भिजलेले मन तरी
डोळा ना टिप्पूस..
जुनेरल्या नात्यामध्ये
सल ही जुनीच;
गळाभेट नाही परी
सय नेहमीच..
जुनेरल्या नात्यामध्ये
शब्द हरवले..
जुनेरले नाते आता
मुके मुके झाले..
जुनेरले नाते सख्या
नशिबाचा खेळ..
पाय निघता निघेना
आली निरोपाची वेळ
....
आली निरोपाची वेळ.
सुंदर रचना.
सं - दी - प
धन्यवाद सर!
आवडली.
धन्यवाद.:)
ओह " आली निरोपाची वेळ." अचानक गंभीर टर्न देणार्या या शेवटच्या ओळीसाठी
Thank you . :)
सर्वप्रथम "जुनेरले" ह्या शब्दासाठी अभिनंदन. प्रथमच ऐकला. पण त्यातुन भावना पोचत आहेत.
शेवटचा ट्विस्ट आवडला. खरेच नाते जुनेरले होणे आजकाल नशिबाचा खेळच आहे.......
खूप खूप धन्यवाद.
जुनेरले हा शब्द माझा नाही. मी फेसबुकवर कुठेतरी वाचला, आवडला आणि इथं वापरला.
नेहमीच काहीतरी वेगळं देऊन जातात.
प्रतीपदेची चंद्रकोर बघून सुचलेल्या काही ओळी अर्धवट राहील्या होत्या त्या आज पुर्ण झाल्यासारखे वाटले.
ती स्वतंत्र कविताघ्च आहे. आणि सुंदर आहे
आली निरोपाची वेळ.>>
हे खोडून टाका प्लीज.
:).
तसंही असतं कधीकधी.
आशयपूर्ण कविता. अशीच काही जुनेरली नाती आठवली.
धन्यवाद!.