नवी ईमारतीतील अडगळ निवारण
Primary tabs
दोन प्राध्यापक
बांधकाम व्यावसायिकाच्या
कार्यालयात.
पहिल्या प्राध्यापकाने
दुसर्या प्राध्यापकास
कानात कुजबुजत विचारले
नव्या ईमारतीच्या अवारातील
जुने वड, पिंपळ, पारीजात, .......
समृद्धतेचे प्रतिक की अडगळ?
दुसरा प्राध्यापक उत्तरला
अर्थात अडगळ!
बांधकाम व्यावसायिकाने
आज्ञाधारक विद्यार्थ्या प्रमाणे
आपल्या कार्यकर्त्याकडे बघीतले
कार्यकर्त्यांनी दुसर्या दिवशी
नव्या ईमारतीच्या परिसरातले
सारे जुने वड, पिंपळ, पारिजात
गुलमोहर, मोगरा, जाई, जुई,
बोगनवेल सदाफुली
आणि असेल ते सारे हिरवे
अगदीच कंपाऊंडवॉलच्या मागची
बाभळी, पळस आणि बेशरमाची झाडे
घरी सरपणास पाठवली
काम तसं फत्ते झाले
पण एका मजल्याच्या गॅलरीतून
वाळत चाललेले एक रोप डोकावले
मग कार्यकर्त्यांनी, विरह जागवणार्या
तुळशीच्या जागी श्वासाशी विरह झालेला
एक शोभीवंत ख्रिसमस ट्री लावला.
तुळशीचीकुंडी असलेल्या काकुंनी
तक्रार केली तर
नव्या ईमारतीच्या करारात
नव्या ईमारतीचे बाह्य दृश्य
ठरवण्याचा आधिकार
बांधकाम व्यावसायिकाकडे असल्याचे
करार-कलम तोंडावर फेकले
दुसर्या वयोवृद्ध प्राध्यापिकेने
नाराजी दाखवली तर त्यांना
दिवाणखान्यासाठी
काही बोन्साय गीफ्ट दिली
तसा नव्या ईमारती समोर
जाहीरातीतल्या चित्रासारखा
हिरवागार लॉन दिला होता
पण बोअरवेल आटली
टँकर कडाडला तशी
ती स्वप्नवत लॉनही
अशी वाळून गेली
कि ती कधी होती
हे आता
कुणाला स्मरतही नाही.
.
हि कविता वाचल्यावर
कुणीतरी म्हणेलच
आताशा माणूस चंद्रावर जातो
चंद्रावर कुठे हिरवळीची अडगळ असेते का?
.
.
.
.
.
.
* अनुषंगिक नसलेले विषयांतर आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार
प्राध्यापक कसे असतात हे दाखवल्याबद्दल आभार !
प्राध्यापकांचा रोल निमीत्त आहे कि निमीत्तमात्र, तुम्हाला काय वाटते?
तुम्ही "माहितगार" आहात इतके आम्हास कळते. :)
मुक्तछंदाच्या रचनेवर अजुन काम करणे आवश्यक आहे. उत्तरदायित्वास नकार लागू हे यायला पाहिजे होतं ना.
बाकी प्रयत्न उत्तम आहे. येत राहा आणि लिहिते राहा. बरेच दिवस झाले बोलणे नाही. :)
-दिलीप बिरुटे
युट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. त्यासाठी उत्तरदायित्वास नकार लागू अद्ययावत करुन मग वापरेन. पण तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :)
याच विषय मालीकेत आणखी एखाद दुसरी कविता एखादा लेखही लिहिण्याचा मनोदय आहे. आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.
>>>> ट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे.
अरे वाह ! शुभेच्छा.
>>>> आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे.
हा हा ! किती छान. देर आये दुरुस्त आये. ;)
>>> तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :)
आपल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. :)
>>> आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे.
आपल्यासाठी कधीही उपलब्ध आहे. सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे,तितका अपवाद सोडला तर मी आहेच. :)
-दिलीप बिरुटे
>>सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे,
एम आय एम चं शीट लागतंय परत !
प्रा.डॅा. ह्या कामाच्या अनूभवांवर आधारीत एक माहितीपूर्ण लेख लवकरंच येऊ द्यात, त्यातून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतली निवडणूक प्रक्रीया समजायला मदत होईल.
माझ्या भाउजींना ‘एक्स्पेंडीचर मॅनेजमेंट’ची ड्यूटी लागली आहे. आचार संहिता लागू झाल्या पासून सूरू झालेले हे काम निकाल लागल्यानंतरही सुमारे महिनाभर चालू रहाणार आहे.
ह्या प्रक्रियेची जी माहिती त्यांच्याकडून मिळत आहे ती खूप रोचक आहे. तुम्ही लेख लिहिलात तर त्यावर काही रंजक माहिती शेअर करता येईल…
आम्ही आचारसंहिता लागण्याच्या एक दीड महीना अगोदर पासून निवडणुकीच्या कामात आहोत. पुढे ते निवडणूक निकाल कामापर्यन्त ते चाललेले असते. आता निवडणुकी आचारसंहितेमुळे काहीही लिहिता येणार नाही. पण निवडणुकीनंतर लिहीन.
केंद्राध्यक्ष होतो तेव्हा निवडणुकीतील कामाबद्दल कुठे तरी प्रतिसादात लिहिले आहे, कुठे ते आठवत नाही.
-दिलीप बिरुटे
मुलाखत घ्याच. आणि एक टी शर्ट भेट द्या.
मी अजून सुरवातही केली नाही. टी शर्ट कोणी आणि कसा द्यायचा असतो?
मुलाखत घेणारा आणि देणारा दोघांना पांढरा टी शर्ट असावा.
तो जितका धुवट आणि दंड दाखवणारा तितका चांगला.
मोरचुद नावाची कथा आठवली...
कथेची लिंक किंवा काही संदर्भ समजू शकेल का?
प्रतिसादासाठी अनेक आभार
एकदा एके सरकारी ठिकाणी खूप जंगली झाडी होती. पण, झाडे तोडायला परवानगी नसल्याने, झाडे तोडून, जागा मोकळी करता येत न्हवती.
त्यामुळे, सरकारी नोकरांची पंचाईत झाली.
ते नोकर एका बुजुर्क, राजकारणी व्यक्तीला भेटायला गेले.. त्यांचा सल्ला खालील देतो..
....
झाडे कापणे हे अयोग्य आहे. आमच्या गावात पण कुणीही झाडे कापत नाहीत किंवा मोरचूदाचे पाणी झाडाला देत नाहीत.
कर्मचाऱ्यांनी योग्य तो बोध घेतला.
काही महिन्यांतच, झाडे मरून गेली..
-----
ओह हे प्रकरण आठवणीतून गेले होते. तुम्ही दिल्याने स्मरण झाले. अनेक आभार.
>>हि कविता वाचल्यावर
कुणीतरी म्हणेलच
आताशा माणूस चंद्रावर जातो
चंद्रावर कुठे हिरवळीची अडगळ असेते का?<<
हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे.
>>हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे.<<
प्रतिसाद वाचून कवितेच्या काँटेक्स्ट मध्ये 'शास्त्रीयता' या शब्दाची गंमत वाटली. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.
कवितेचा आशय, पात्रांची निवड, शब्दांची योजना, शेवट आवडले.
अजून येऊ द्या.
मुक्तछंदातल्या कविता शक्यतो आवडत नाहीत पण ही जराशी कविवर्य पाडगांवकरांच्या मोरू कवितासंग्रहात बसेल अशा धाटणीची वाटली म्हणूनच आवडली.
लिहित रहा, आम्ही वाचत राहू .
सं - दी - प