जनातलं, मनातलं

पुस्तक प्रकाशन

Primary tabs

२५ मार्च २०२०
या दिवशी कोरोनामुळे लॉक डाउन करण्यात आले .
त्यानंतर अनेक लोकांनी त्या काळात सेवा किंवा समाजसेवा केली ,
पण त्यांच्यामध्ये असेही काही लोक होते की ज्यांनी विशेष कार्य केलं . प्रेरणादायी !अगदी हटके !
अशा २७ लोकांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून विवेक स्पार्क फाउंडेशन या संस्थेनं ,
एक पुस्तक निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आणि तो आता पूर्ण झाला
देव पाहिलाय आम्ही
असं त्या पुस्तकाचं नाव आहे आणि ते कार्य कथा रूपात मांडण्यात आलंय .
त्याचं प्रकाशन आज संध्याकाळी होत आहे - २५ मार्च २०२४
६. ३० , न्यू इंग्लिश स्कुल टिळक रोड पुणे

यामध्ये दोन कथा लिहिण्याची संधी मला मिळाली आहे .

आणखी एक विशेष म्हणजे या कथांचं संपादन डॉ . उदय निरगुडकर यांनी केलं आहे

धुलीवंदनाच्या शुभेच्छा !

नठ्यारा

बिपीन सुरेश सांगळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. त्यांच्या जडणघडणीत मिपाचा वाटा आहे असं आम्ही मिपाकर अभिमानाने सांगू शकतो.
-नाठाळ नठ्या

अहिरावण

मनःपुर्वक अभिनंदन... :)

नाठाळ नठ्या
अहिरावण
आणि इतर वाचक
खूप आभार

मला संधी मिळाली हा भाग वेगळा
तो महत्त्वाचा नाहीये

त्या लोकांनी जे काम केलं आहे
त्या कार्याला खरा सलाम आहे

उदा .
सिरमने कोरोना लस तयार केली . आणि त्याची टेस्ट जेव्हा माणसावर करायची होती ... पहिल्यांदाच
कोण तयार होणार ? थेट विषाची परीक्षा !

तेव्हा जो तयार झाला त्या तरुणाची कथा मी लिहिली आहे
तो खरा हिरो !

आणि तसेच बाकीचेही इतर सगळे नायक / नायिका

हे एक उत्तम DOCUMENTATION झाले आहे

त्याचं कौतुक करणं आवश्यक आहे

धन्यवाद