पाककृती
श्रीखंड
Primary tabs

श्रीखंड श्रीखंड ..
गोठ्यातून ओह माफ करा
डेअरीतून आणा दूध एक लीटर
उकळी द्या येऊ एकदम बेटर
ऊन ऊन दूध हो द्या कोमट
विरजणाने जेव्हा होईल दही घट्ट
सूती कापडात दह्याला बांधा
निथळया पाणी पुरचुंडी टांगा
टांगलेल्या जीवा होता तास पूर्ण चौदा
चक्का..दिसता घट्ट ,पुरा झाला सौदा
फेटा फेटा.. पुरणयंत्री,कोण्या चाळणी
वा हैण्ड मिक्सी
एकास एक सम चक्का-पिठी करा एक
भुरभुरा इलाईची-सुकामेवा आवडीचा
निगुतीने करा हा श्रीखंड बेत आहे सवडीचा
-भक्ती
कवितेच्या माध्यमातून, पाकृ आवडली...
श्रीखंडाची काव्यमय पाककृतीचे आवडली.
छान.
-दिलीप बिरुटे
अहो आमरसाच्या दिवसांत श्रीखंड, गुनाह है यह. :)
कविता आणि पाकृ दोन्हीही छान जमले आहे.
मस्त. 'केशर' तेवढे राहिले की.
केशर , वेलची , चारोळ्या ( आवडत असतील तर) किंवा बदामाचे पातळ काप
अति गोड नको ,, झक्कास
मला बदाम, चारोळ्या नाही आवडत फ्रेन्च आवडते.वेलची म्हणजे इलायची ना?ती रगडून टाकलीय ,ती आवडते.
श्रीखंड पुरी
जमलीये भारी
मंडळींना वाटे प्यारी
सर्वांची मी आभारी ;)
मॅडमजी, श्रीखंड-पुरी कविता भारी.
मटन-पुरी करा एक दिवस.
धागालेखिका शाकाहारी असाव्यात असे त्यांच्या एकंदर पाककृतींवरुन दिसते.
+१
नाहीतर काय मुक्या प्राण्यांना प्रोटीनसाठी मध्ये घेण्यापेक्षा, डायरेक्ट ते जे घासपुस प्रोटीन घेतात ते खाऊन आम्ही प्रोटीन मिळवते.बाकी ज्यांना जे आवडतं ते त्यांनी खावं...नो इश्यू..
बाबुराव मटनाबरोबर भाकरी ब्येस लागते.. पुरी नगं
अहो,आमची धाव केवळ लिंबाच्या मटणापुरती... बनवाबनवीची कृपा ;)
बाकी तुमचा न आणि ण मध्ये घोळ सर्वत्र दिसतोय हो...
मी पहिल्यांदा मटर पुरी वाचली .ती बनवते एकदा.