हे गुलाबजाम करताना पिठ चांगले मळून घ्यावे आणि एका ओलसर कपड्यात गुलाबज्यामचे गोळे ठेवावेत म्हणजे ते कोरडे पडत नाहीत. हलक्या आचेवर गुलाबी तळावेत आणि थोडे थंड झाल्यावर पाकात घालावे. पाक जास्त चिकट करु नये. छान मऊ होतात..
टारझन
12/21/2008 - 22:05
तयार झाले की बोलवा ! आणि जराशे वाढीव मापात करा .. जास नाय ६०-७० फकस्त !!
मी केले पण अगदि डोक्यावर मारला तर टेन्गुळ येइल असे झाले
सो प्लिज हेल्प मी.
तुम्ही खरेच मारुन पाहिले असल्यास टेंगूळ आले असावे.
जर टेंगळाचा आकार लहान असेल तर आयोडेक्स किंवा मूव लावा. टेंगळाबरोबरच रक्तपातही झाला असेल तर डेटॉलने धुवून घ्या आणि सोफ्रामायसिन लावा.
मोठी इजा झालेली असल्यास एखाद्या डॉक्टरला टेंगूळ आणि गुलाबजाम दोन्ही दाखवा. कदाचित जखम शिवावी लागेल. वैद्यकीय विमा असल्यास अत्त्युत्तम.
मात्र यापुढे काळजी घ्या. गुलाबजाम डोक्यावर मारु नका म्हणजे टेंगूळ येणार नाही.
>>>गुलाबजाम डोक्यावर मारु नका म्हणजे टेंगूळ येणार नाही.
=))
गिट्स चे गुलाबजाम करताना ते पिठ पाण्या ऐवजी दुधात भिजवा आणि अगदी अलगत हाताने पिठ मळा, (भाकरी किंवा चपातीचे पिठ मळताना जोर लागतो तसा जोर देऊ नये.)
आणि तुप लावुन अर्धातास पिठ झाकुन.
एकीकडे एकतारी पाक करायला घ्यावा. त्यात वेलची पुड घालावी.
अर्धातासाने तुप हाताला लावुन लहान आकाराचे गोळे करावे, आणी लाईट ब्राऊन कलर येई पर्यत तळावे, गरम गरम गुलाब जाम कोमट पाकात भिजत घालावेत म्हणजे पाक गुलाब मध्ये आत पर्यत जातो.
:)
एका तासात मस्त मऊसुत गुलाबजाम तयार.
फोटो काढायचा आणि खायला द्यायचे. :)
बाजारात वेगळा गुलाबजामचा खवा मिळतो तो वापरून पारंपारिक पद्धतीने केलेले गुलाबजामच सुंदर लागतात.. हे गिट्स वगैरे सगळे इन्स्टंट फूडचे प्रकार आहेत आणि आमच्या मते गाण्यात आणि खाण्यात इन्स्टंट असं काहीही नसतं!
या दोन्हीही अतिशय कष्टसाध्य कला आहेत. उत्तम गुलाबजाम किंवा उत्तम पुरणपोळी किंवा एखादा उत्तम पुरिया किंवा यमन जमायला/जमवायला आयुष्यभराची तपस्या लागते..
बाजारात मिळणार्या इन्स्टंट गुलाबजामची गिट्सची पाकिटं वापरून केलेले गुलाबजाम अत्यंत थर्डरेट होतात असे आमचे वैयक्तिक मत आहे..असो.
चु चु...
तू तात्यांचं ऐकू नको बाबा..
तू कुठे असतोस?? भारतात की भारताबाहेर?? भारतात असशील तर सरळ.. मिठाइच्या दुकानातून गुलाबजाम घेऊन ये आणि खा..
भारताबाहेर असशील तर गिट्स, स्वाद , चितळे यांची गुलाबजाम मिक्स मिळतात त्यांचे मस्त होतात हो गुलाबजाम
शितलने सांगितले आहेच.. एक आणखी सूचना म्हणजे.. ते मिक्स दूधात मळताना अगदी चिमूटभर पिठीसाखर घाल त्यात.. म्हणजे आतूनही १००% गोड होतो गुलाबजाम.. कारण पाक आत शिरायला मदत होते..
- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
गिट्स किंवा तत्सम बाजारु कंपन्याच्या पाकिटाचे गुलाबजाम नीटसे होत नाहीत हे खरे आहे.आम्ही गुलाबजाम घरी करताना खवा व थोडी पिट्टी त्यात मिसळुन घेतो. थोडी पिट्टीसाखर त्यात घालतो. जोर न देता हलक्या हाताने ते मिश्रण मळुन त्याचे गोळे करुन घेतो.मंद आचेवर तेल गरम करुन त्यात ते गोळे हलकेच तळुन घेतो. दुसरीकडे साखरेचा पाक करुन घ्यावा. पाक देखिल चांगला जमावा लागतो. पाकात ते तळलेले गोळे सोडावे.गोळे चॉकलेटी रंग होईपर्यत तळावेत. म्हणजे मऊ गुलाबजाम तयार होतात.खव्याचे प्रमाण व दर्जावर गुलाबजाम चांगले मऊ होतात. पाकिटातल्या मिश्रणाच्या गुलाबजामची चव थोडी वेगळी लागते.माझ्यामते त्यात वेगळे इसेन्स वापरल्याचा तो परिणाम असावा.
>>माझि १ मैत्रिन म्हनालि कि आत एक फुताणा घाल.
== योग्य सुचना ! पिठापासुन गोळे करताना त्याला लाडवाला बेदाणा लावतात तसा एक एक फुटाणा लावावा म्हणजे गुलाबजाम फुटत नाहि , तसेच पिवळ्या फुटाण्यामुळे गुलाबजामला पिवळसर सोनेरी असा रंग यायला ही मदत होते. असे गुलाबजाम बनवुन झाल्यावर बाउल मध्ये २ गुलाबजाम काढुन घ्यावेत (त्याच्या नैवेद्य दाखवुन देवास अडचणीत आणु नये) त्यावर थोडी मिरपुड / चाट मसाला / खारी बुंदी व कोथिंबीर भुरभुरावी. गरमागरम चहा किंवा तांदुळाच्या भाकरी बरोबर फर्मास बेत जमवावा !!
आपलाच
प्रसाद कपुर !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
गिट्स च्या पॅकेट्च्या मागेच लिहिलेले असते कसे करयचे ते.. फक्त १/२चमचा रवा टकावा म्हणजे पाक आत जातो गुलाबजामुनच्या. प्रयत्नाती पर्मेश्वर ......
हे गुलाबजाम करताना पिठ चांगले मळून घ्यावे आणि एका ओलसर कपड्यात गुलाबज्यामचे गोळे ठेवावेत म्हणजे ते कोरडे पडत नाहीत. हलक्या आचेवर गुलाबी तळावेत आणि थोडे थंड झाल्यावर पाकात घालावे. पाक जास्त चिकट करु नये. छान मऊ होतात..
तयार झाले की बोलवा ! आणि जराशे वाढीव मापात करा .. जास नाय ६०-७० फकस्त !!
(गुलाबजामप्रेमी) टार्या
अवांतरः
चि.क्रुती याला आमचा रामराम सांगा.
माझ्या मते नावातच थोडी गडबड आहे, 'गिट' म्हणजे (सायबाच्या देशातला) अंमळ मूर्ख माणूस! त्यामुळे आपण कितीही हुशारी दाखवली ... ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ!
गिट्सचे बनेबनाये गुलाबजाम नाही का मिळत?
मी केले पण अगदि डोक्यावर मारला तर टेन्गुळ येइल असे झाले
सो प्लिज हेल्प मी.
तुम्ही खरेच मारुन पाहिले असल्यास टेंगूळ आले असावे.
जर टेंगळाचा आकार लहान असेल तर आयोडेक्स किंवा मूव लावा. टेंगळाबरोबरच रक्तपातही झाला असेल तर डेटॉलने धुवून घ्या आणि सोफ्रामायसिन लावा.
मोठी इजा झालेली असल्यास एखाद्या डॉक्टरला टेंगूळ आणि गुलाबजाम दोन्ही दाखवा. कदाचित जखम शिवावी लागेल. वैद्यकीय विमा असल्यास अत्त्युत्तम.
मात्र यापुढे काळजी घ्या. गुलाबजाम डोक्यावर मारु नका म्हणजे टेंगूळ येणार नाही.
आपला
(मदतनीस) डॉ. आजानुकर्ण
>>>गुलाबजाम डोक्यावर मारु नका म्हणजे टेंगूळ येणार नाही.
=))
गिट्स चे गुलाबजाम करताना ते पिठ पाण्या ऐवजी दुधात भिजवा आणि अगदी अलगत हाताने पिठ मळा, (भाकरी किंवा चपातीचे पिठ मळताना जोर लागतो तसा जोर देऊ नये.)
आणि तुप लावुन अर्धातास पिठ झाकुन.
एकीकडे एकतारी पाक करायला घ्यावा. त्यात वेलची पुड घालावी.
अर्धातासाने तुप हाताला लावुन लहान आकाराचे गोळे करावे, आणी लाईट ब्राऊन कलर येई पर्यत तळावे, गरम गरम गुलाब जाम कोमट पाकात भिजत घालावेत म्हणजे पाक गुलाब मध्ये आत पर्यत जातो.
:)
एका तासात मस्त मऊसुत गुलाबजाम तयार.
फोटो काढायचा आणि खायला द्यायचे. :)
गुलाबजाम तळताना तेल अगदी कडकडीत तापवू नका. वरुन कीर्तन आत तमाशा या धर्तीवर ते बाहेरून जळतील व आत कच्चे राहतील. तेल थोडे बेताचे तापवावे.
आपला
(हलवाई) आजानुकर्ण चितळे
फोटो काढायचा आणि खायला द्यायचे. :O
काय? फोटो की गुलाबजाम?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
फोटो 'काढायचा' (म्हणजे एक फोटो) आणि खायला 'द्यायचे' (काहीतरी अनेकवचनी)
आता फोटो एक असल्याने अनेकवचनी फक्त गुलाबजामच राहतात.
जर व्याकरणात काही दोष नसेल तर गुलाबजामच खायला 'द्यायचे' असे म्हणता येईल.
आपला
(तर्कशुद्ध) आजानुकर्ण
हो, गुर्जी...
(ढ) इनायक चपळगावकर (पाचवी फ)
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
इनोबा,
तु गुलाबजाम चा फोटो खा, आम्ही गुलाबजाम खातो.. :)
>>व्याकरणात काही दोष नसेल तर गुलाबजामच खायला 'द्यायचे' असे म्हणता येईल.
कर्णाने बाण व्यवस्थित मारला आहे. :)
मुळात गिट्सचे वगैरे गुलाबजाम अत्यंत फालतू होतात..
बाजारात वेगळा गुलाबजामचा खवा मिळतो तो वापरून पारंपारिक पद्धतीने केलेले गुलाबजामच सुंदर लागतात.. हे गिट्स वगैरे सगळे इन्स्टंट फूडचे प्रकार आहेत आणि आमच्या मते गाण्यात आणि खाण्यात इन्स्टंट असं काहीही नसतं!
या दोन्हीही अतिशय कष्टसाध्य कला आहेत. उत्तम गुलाबजाम किंवा उत्तम पुरणपोळी किंवा एखादा उत्तम पुरिया किंवा यमन जमायला/जमवायला आयुष्यभराची तपस्या लागते..
बाजारात मिळणार्या इन्स्टंट गुलाबजामची गिट्सची पाकिटं वापरून केलेले गुलाबजाम अत्यंत थर्डरेट होतात असे आमचे वैयक्तिक मत आहे..असो.
आपला,
(गाण्यातला अन् खाण्यातला) तात्या.
चु चु...
तू तात्यांचं ऐकू नको बाबा..
तू कुठे असतोस?? भारतात की भारताबाहेर?? भारतात असशील तर सरळ.. मिठाइच्या दुकानातून गुलाबजाम घेऊन ये आणि खा..
भारताबाहेर असशील तर गिट्स, स्वाद , चितळे यांची गुलाबजाम मिक्स मिळतात त्यांचे मस्त होतात हो गुलाबजाम
शितलने सांगितले आहेच.. एक आणखी सूचना म्हणजे.. ते मिक्स दूधात मळताना अगदी चिमूटभर पिठीसाखर घाल त्यात.. म्हणजे आतूनही १००% गोड होतो गुलाबजाम.. कारण पाक आत शिरायला मदत होते..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अंमळ चुक झालेली दिसतेय प्राजु ताईच्या समजण्यात.
आपलि,
(गरिब) चुचु
असे तिने लिहिलेले आहे शेवटी.
माझि १ मैत्रिन म्हनालि कि आत एक फुताणा घाल.
चुचु
गिट्स किंवा तत्सम बाजारु कंपन्याच्या पाकिटाचे गुलाबजाम नीटसे होत नाहीत हे खरे आहे.आम्ही गुलाबजाम घरी करताना खवा व थोडी पिट्टी त्यात मिसळुन घेतो. थोडी पिट्टीसाखर त्यात घालतो. जोर न देता हलक्या हाताने ते मिश्रण मळुन त्याचे गोळे करुन घेतो.मंद आचेवर तेल गरम करुन त्यात ते गोळे हलकेच तळुन घेतो. दुसरीकडे साखरेचा पाक करुन घ्यावा. पाक देखिल चांगला जमावा लागतो. पाकात ते तळलेले गोळे सोडावे.गोळे चॉकलेटी रंग होईपर्यत तळावेत. म्हणजे मऊ गुलाबजाम तयार होतात.खव्याचे प्रमाण व दर्जावर गुलाबजाम चांगले मऊ होतात. पाकिटातल्या मिश्रणाच्या गुलाबजामची चव थोडी वेगळी लागते.माझ्यामते त्यात वेगळे इसेन्स वापरल्याचा तो परिणाम असावा.
वेताळ
>>माझि १ मैत्रिन म्हनालि कि आत एक फुताणा घाल.
== योग्य सुचना ! पिठापासुन गोळे करताना त्याला लाडवाला बेदाणा लावतात तसा एक एक फुटाणा लावावा म्हणजे गुलाबजाम फुटत नाहि , तसेच पिवळ्या फुटाण्यामुळे गुलाबजामला पिवळसर सोनेरी असा रंग यायला ही मदत होते. असे गुलाबजाम बनवुन झाल्यावर बाउल मध्ये २ गुलाबजाम काढुन घ्यावेत (त्याच्या नैवेद्य दाखवुन देवास अडचणीत आणु नये) त्यावर थोडी मिरपुड / चाट मसाला / खारी बुंदी व कोथिंबीर भुरभुरावी. गरमागरम चहा किंवा तांदुळाच्या भाकरी बरोबर फर्मास बेत जमवावा !!
आपलाच
प्रसाद कपुर !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
आम्ही घरी ब्रेड स्लाईस सोबतच सर्व्ह करतो. पण तांदळाच्या भाकरीबरोबर सर्व्ह करण्याची कल्पना छान आहे.एकदा तरी करुन पहायला हवे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
तांदुळाची भाकरी ३ दिवस शिळी असेल तर खाल्यावर ब्रम्हानंदी लागते.
शेखर
गुलाबजाम चे गोळे करताना आत एक खडिसाखरेचा तुकडा (चौकोनी असतात ते) अथवा एक बेदाणा घालावा पाक आत शिरायला मदत होते
तेच साखर फुताना
चुचु
तेच नाही, साख्रर फुटाणा वेगळा आणि खडीसाखर वेगळी असते
टेंगळाचा फोटु?
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी