जनातलं, मनातलं

माझ्या मिपावरील लेखांचं इंग्रजी पुस्तक We are the Quarry, Fate is the Hunter

Primary tabs

माझे मिपावर लिहिलेले माझे बोटीवरचे आणि इतर सर्व अनुभव अर्थातच मराठीत आहेत. प्रतिसादामध्ये तुम्ही त्यांचं कौतुक खूपच केलंत. मात्र हल्ली बहुतांश मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. 'वाचता येत नाही' असं म्हणणं तितकसं बरोबर नाही. ते टाळतात.

दुसरी गोष्ट म्हणजे माझे नव्वद टक्के विद्यार्थी अमराठी आहेत. त्यांना मी कॉलेजमध्ये जेव्हां यातल्या काही गोष्टी सांगितल्या तेव्हां त्यांनी आग्रह धरला की मी त्याचं इंग्रजीत पुस्तक करावं. मी सर्व अनुभव पुन्हा इंग्रजीत लिहिले आणि कालच त्याचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. अनोळखी लेखकाच्या पहिल्या पुस्तकाची विक्री दुकानातून जवळ जवळ होतच नाही. जी काय होते ती ऑनलाइन. भरपूर विद्यार्थी आपले फॅन असण्याचा एक प्रचंड फायदा असतो. पुस्तक amazon वर विक्रीला आलं आणि बारा तासात out of stock दाखवायला लागलं! हल्ली पूर्वीसारख्या हजार प्रती छापून ठेवत नाहीत. print on demand पद्धत असते. घाईघाईनी आणखी प्रती छापल्या. आता उपलब्ध आहेत.

तुम्ही त्या सर्व हकीकती वाचल्या आहेतच. कोणीही अजिबात ते पुस्तक विकत घेऊ नका. मात्र ज्याला इंग्रजीत त्या वाचायला आवडतील असा कोणी तुमच्या माहितीत असला तर त्याला ही amazon ची लिंक कृपया पाठवा.

पुस्तकांचं नाव आहे 'We are the Quarry, Fate is the Hunter'.

https://www.amazon.in/We-are-quarry-fate-hunter/dp/8197057885/ref=sr_1_…

तुमचे अनुभवकथनपर लेखन कायमच आवडले आहे. ते लेखन आता इंग्रजीमधे पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध आहे ही खूपच आनंदाची बाब आहे. यासाठी हार्दिक अभिनंदन.

'We are the Quarry, Fate is the Hunter' हे पुस्तक या प्रकारचे लेखन वाचायला आवडणार्‍या व्यक्तिंना आवर्जून सुचवीन.

नठ्यारा

लई झ्याक. तुमचे अनुभव म्हणजे एका वेगळ्याच जगाची खिडकी असते.
-नाठाळ नठ्या

निनाद

नवीन इंग्रजी पुस्तकाबद्दल अभिनंदन!

माहितगार

अभिनंदन
मराठी मंडळींनी असे प्रयत्न अधिकाधीक करावयास हवेत.

स्वीट टॉकर

नठ्यारा, निनाद, खेडूत, माहितगार आणि डॉक्टरसाहेब, धन्यवाद!

ह्या पुस्तकाला कसा रिस्पॉन्स मिळतो ते बघून मग मराठी काढायचं का ते ठरवीन.

चौथा कोनाडा

हार्दिक अभिनंदन !
आणखी एक नवं क्षेत्र पादक्रांत केलंत !

स्वीट टॉकर

@चौ को - पादाक्रांत कसलं? पुस्तक प्रकाशित करणं सोपं असतं. विकणं कठीण!