जे न देखे रवी...

अदृष्ट

Primary tabs

दिशा-कोन ढळले, सावरले,
...अथांग उरले,
रेणुबंध खिळखिळले, जुळले,
...अजोड उरले,
नक्षत्रे विझली, झगमगली,
...ओजस उरले,
चित्रलिपी अडली, उलगडली,
...अव्यक्त उरले,

अज्ञेयाच्या उंबरठ्यावर ज्ञात थबकले,
अदृष्ट दिसले.

अहिरावण

लेले आणि लीली यांचे मिलन