जे न देखे रवी...

मिराशी

Primary tabs

मी नाही कुणाचा बाप
मी नाही कुणाचा आजा
रंग बदलतो मी वारंवार
कुंपणावरचा सरडा जसा

मी न कुणाचे खातो, ल्यातो
तो श्रीराम आम्हांला देतो
लळा जिव्हाळा नाती गोती
मी वेशीवर टांगून रहातो

नाही कुणाची पर्वा, आशा
नाही पुसले म्हणून निराशा
स्वानंदाचे टाळ घेऊन हाती
जगतो मी माझीच मिराशी

चौथा कोनाडा

मस्त ! छान ! मस्त कलंदर फकीरी म्हणायची !
सगळं सोडून आता वैराग्य प्राप्त झालं !
येऊ देत पुढच्या रचना !

भागो

कर्नलसाहेब
कडॅक सॅल्युट!

शशिकांत ओक

भरघोस मिशीला पीळ देऊन म्हणणारा की

मी न कुणाचे खातो, ल्यातो
तो श्रीराम आम्हांला देतो
लळा जिव्हाळा नाती गोती
मी वेशीवर टांगून राहतो

आमच्या सारख्या शिपाई गड्याला चटकन भावतो...!