Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाडी ग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन शंका उपस्थित करणाऱ्यांचे समाधान

श
शशिकांत ओक
Sun, 12/21/2008 - 20:33
🗣 20 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5940 वाचन

💬 प्रतिसाद (20)
ट
टारझन Sun, 12/21/2008 - 20:46 नवीन
आपणाकडून विविध मार्गांनी माहिती काढून तीच माहिती नाडी शास्त्री आपणाला सांगतो. याचा अर्थ आपण सांगितलेली सर्व माहिती लक्षात ठेऊन तेच भविष्य म्हणून तो आपल्याला सांगतो. जेंव्हा आपण म्हणतो की तीच माहिती तो परत सांगतो. म्हणजे ती माहिती तो परत उगाळतो.
झबरा लिहीलंय !! वरिल कोट आवडली !! आपल्या चिकाटीला येथे एकच व्यक्ती आहे जो आव्हाण देतोय !! जोडे पडणार हे माहीत असून लिहीत रहाणार्‍या दोण्ही व्यक्तींना मुजरा !!! - डॉ.टारझन णाडकर्णी (फैमिली डौक्टर) (आम्ही आपणाकडून विविध मार्गांनी माहिती काढून तीच्यावरून रोगाचे निदान सांगतो, याचा अर्थ आपण सांगितलेली सर्व माहीती लक्षात ठेऊन तेच निदाण म्हणून मी आपल्याला सांगतो, जेंव्हा आपण म्हणाल की तेच निदाण मी परत सांगतो , म्हणजेच ते निदाण मी पुण्हा निदाणाद देतो आणि चुर्ण उगळतो)
  • Log in or register to post comments
अ
अघळ पघळ Sun, 12/21/2008 - 22:43 नवीन
काही अपरीहार्य कारणास्तव आमचे रॉकीपंत सध्या मिपावर नाहीत. ते परत आल्यास तुमच्या नाडीचा योग्य तो समाचार घेतील.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 12/22/2008 - 01:15 नवीन
ओक साहेब.. छान चाललं आहे. तसंही... एकूणच भविष्य सांगणारे.. मग ते नाडीवाले असोत.. पट्टीवाले असोत ..ग्रहतारे वाले असोत किंवा पोपट वाले असोत.. या सर्वांशी माझं जमतच नाही. कारण माझा यांपैकी कशावरच विश्वास नाही.. तुमचं चाललंय ते चालूदे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Mon, 12/22/2008 - 05:12 नवीन
नमस्कार शशिकान्त जी.... नाडी ज्योतिषावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच "नाडी ज्योतिषा"बद्दल तुम्हाला वाटणार्‍या आत्मीयतेबद्दल आणि त्याची सत्यता जनमानसापर्यंत पोचवण्याच्या तळमळीबद्दल, मला खरोखरच आदर वाटतो. शिवाय जर एखाद्याला फसवायचे असेल तर तो ग्राहकाच्या हातात असा कुठलाच पुरावा हाती लागू देणार नाही की त्यामुळे तो पकडला जाईल. पण नाडी ग्रंथांच्या बाबत नेमके उलटे आहे. आपणांस वहीच्या रुपाने पुरावा आपल्याला टेपसकट आवर्जू्न दिला जातो. त्याची शहानिशा करणे आपल्या हातात आहे. नाडीज्योतिषाच्या सत्यतेबाबत पहिला पुरावा... :) त्य़ामुळे हा मजकूर जर खोटारडेपणा न करता खरोखरच नाडी ग्रंथातून येत असेल तर त्याची उत्पत्ती मानवी बुद्धीच्या कक्षेच्या बाहेरील असली पाहिजे असे म्हणणे प्राप्त होते. पर्यायाने अतींद्रिय शक्तींतून ती माहिती झाली असली पाहिजे असे नाइलाजाने मान्य करावे लागते. शशिकांत जी, याला एक्झॅटली, "अतीन्द्रिय शक्ती " नाही म्हणु शकत....कारण भृगु, अगस्ति-कौशिक, अत्रि.. इ. ऋषींनी ग्रह-गोलांचा अत्यंत सखोल अभ्यास करून, त्यानुसार अनुमान काढुन, सिद्धांतादाखल "पट्ट्या" लिहिल्या गेल्या... त्यात "अतींद्रिय शक्ती" पेक्षा मूलभूत ज्ञानाचा, अथक प्रयत्नांचा अधिक वाटा आहे. ५००० वर्षांपूर्वी, केलेल्या या सत्कार्याला "दैवी" म्हटलं, तर अधिक गौरवास्पद वाटेल. :) बुद्धिवाद्यांचा मग "वैचारिक पायाच कोसळतो" म्हणून त्यांना ते तत्वतः मान्य करणे शक्य होत नाही. मग त्यांना काहीना काही सबबीसांगून नाडी पट्टयांची शहानिशा करण्याचे टाळावे लागते. पूर्णतः सहमत! :)
  • Log in or register to post comments
ए
एडिसन Mon, 12/22/2008 - 20:41 नवीन
माझाही पूर्ण विश्वास आहे नाडी ज्योतिषावर..मी तसेच माझ्या परिचयाच्या ६ जणांना ह्या पद्धतीचा पुरेपूर अनुभव आलेला आहे. चेष्टा करणार्‍यांना एकच मनापासून सांगावेसे वाटते, एकदा अनुभव घ्या आणि मग वाटेल तितकी रेवडी उडवा. ओकसाहेब, आपल्या व्यासंगाचे आणि चिकाटीचे फार कौतुक वाटते. Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
स
सहज Mon, 12/22/2008 - 05:21 नवीन
ओकसाहेबांच्या चिकाटीची दाद देतो. ज्योतीष, नाडी, इ इ भविष्य, भुत वाचनाच्या प्रयत्नांबद्दल इतकेच विचारु इच्छीतो की जर का ह्या धंद्याना कायदे लागु केले तर चालेल का? किंवा का करु नयेत? तसेच हा धंदा नसल्यास व कायदे नको असल्यास पुढील १०० वर्षे हे प्रकार केवळ विनामुल्य ठेवले गेले तर ह्या प्रकारांना भवितव्य असेल का? या ज्ञानाचा उपयोग करुन नक्की कुठल्या समस्या समजता / सोडवता येतात की ज्या अन्यथा सुटूच शकत नाहीत? आपल्याला मिळालेल्या वहीत नेमके काय होते? भविष्यकाल लिहला आहे का? मिपासदस्यांच्यासाठी ही सेवा विनामुल्य उपलब्ध करुन देउ शकाल का? वह्या, पेन पुरवले जाईल. एकदा ही तपासणी होईल मग चर्चा पुढे सुरु होइल. तोवर आमच्या प्रतिसादांना तर्कदुष्ट म्हणून बोळावले जाईल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 12/22/2008 - 06:30 नवीन
ओकसाहेबांच्या चिकाटीची दाद देतो. अगदी असेच म्हणतो... अवांतर:-- बाकी नाडी,,नाडी,,,नाडी हे वाचुन आमच्या टाळक्यात वेगळेच गाण आल !! हे :-- http://www.youtube.com/watch?v=Lfcwqb3QFDQ प्रमाणाच्या बाहेर अवांतर :-- (या गाण्याच्या चालीवर नाडी भविष्य टेप करुन मिळेल का ?) :? (ताडी,माडी,नाडी या वस्तुंपासुन लांब असणारा) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
क
कुशंका Mon, 12/22/2008 - 20:13 नवीन
चालूद्या. कमवा. काही फुकट खात नाही. लोकांना शेंडि लावण्यासाठी बुद्धि लागते आणि मनोरंजन करण्यासाठि अंगात कला असावी लागते बुवाबाजिचे विविध प्रकार म्हणजे बुद्धि आणि कलेचा संगम आहे चालूद्या
  • Log in or register to post comments
क
कुशंका Mon, 12/22/2008 - 20:16 नवीन
वरिल प्रतिक्रिया 'जनरल ' आहे. कुणा एका व्यक्तिसाठि नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुशंका
इ
इनोबा म्हणे Mon, 12/22/2008 - 20:32 नवीन
लोकांना शेंडि लावण्यासाठी बुद्धि लागते आणि मनोरंजन करण्यासाठि अंगात कला असावी लागते बुवाबाजिचे विविध प्रकार म्हणजे बुद्धि आणि कलेचा संगम आहे अगदी खरे आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 12/22/2008 - 20:35 नवीन
ओक साहेब, बर्‍याच दिवसांनी आपल्याला मिपावर पाहून संतोष जाहला. आपल्या विषयात आम्हाला गती नाही.. चालू द्या..! आपला, (पब्लिकला विश्वरूप दर्शन घडू नये म्हणून चट्टेरीपट्टरी चड्डीची नाडी आवळून बांधणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 12/26/2008 - 06:44 नवीन
पब्लिकला विश्वरूप दर्शन घडू नये म्हणून चट्टेरीपट्टरी चड्डीची नाडी आवळून बांधणारा हाहाहा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ध
धम्मकलाडू Wed, 12/24/2008 - 06:30 नवीन
या चर्चेत दादांच्या नाडीविषयक कामगिरीचा गौरव करण्यात आला होता. आपण या विषयातले तज्ज्ञ आहात. दादांच्या नाडीशास्त्राबद्दल अधिक माहिती द्याल का? धन्यवाद. (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Tue, 12/23/2008 - 23:05 नवीन
हा प्रश्न पूर्वी बर्‍याच वेळा विचारलेला आहे पण अजूनही अनुत्तरित... या नाडीवाल्यानी ६ अब्ज (सध्याची लोकसंख्या)+ पुर्वीची लोकसंख्या + आगामी लोकसंख्या एवढ्या नाड्या नक्की कुठं ठेवल्या आहेत? जाहीर उत्तर द्यायला खूप अडचणीचा प्रश्न असेल तर तसे जाहीर करून टाका म्हणजे परत परत विचारायचा त्रास वाचेल.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 12/26/2008 - 16:25 नवीन
या बाबतीतला मी जाणकार नाही, पण हा गणिती हिशोब. जगातील सर्व मनुष्यांच्या पट्ट्या लिहिल्या असण्याची गरज नाही. फक्त जे लोक पट्टी वाचून घ्यायला येतील, ते जाणून, त्या तेवढ्याच लोकांच्या पट्ट्या दूरदर्शी लेखकांनी लिहिल्या तर पुरे असते. यामुळे अर्थातच काही प्रमाणात गणित पुढे चालवता येते - सर्व मिळून जास्तीतजास्त किती लोक पुरातन पट्ट्या वाचणार आहेत, याचा अंदाज लावता येतो (नाडी केंद्रात पट्ट्या सुव्यवस्थित रचल्या असतील, तर उपलब्ध पट्ट्यांचा आकडा ग्रंथालय-अधिकार्‍याकडून सहज मिळू शकेल.) शिवाय नाडीच्या पट्ट्या लिहिण्याचे तंत्रज्ञान कोणाला ठाऊक झाले, तर याच पद्धतीने दरवर्षी मर्यादित संखेत पट्ट्या लिहीत राहाता येतील. अशा प्रकारेसुद्धा ही आकड्यांची समस्या सोडवली जाऊ शकते. "नवीन पट्ट्या सापडून केंद्राच्या ग्रंथालयात हरती होत आहेत का?" या प्रश्नाचे उत्तरही केंद्राच्या ग्रंथालय-अधिकार्‍याकडून सहज मिळू शकेल. बाकी चालू द्या. तंत्राबाबत तपशीलवार उत्तर श्री. ओक किंवा अन्य माहीतगार देऊ शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
र
रामपुरी Fri, 12/26/2008 - 17:05 नवीन
जगातील सर्व मनुष्यांच्या पट्ट्या लिहिल्या असण्याची गरज नाही. फक्त जे लोक पट्टी वाचून घ्यायला येतील, ते जाणून, त्या तेवढ्याच लोकांच्या पट्ट्या दूरदर्शी लेखकांनी लिहिल्या तर पुरे असते. अरेच्या हा मुद्दा डोक्यातच आला नाही. ज्यानी एवढ्या लोकांच्या नाड्या लिहून ठेवल्या त्याना हे नक्कीच माहीत असणार की कोण पट्टी वाचून घ्यायला येतील आणि कोण नाही. अवांतर किडा: मग हे नाडीवाले त्या पट्ट्या सरळ घरीच का पाठवून देत नाहीत? त्यांच्या केंद्रात बोलावून पैसे गोळा करायचा धंदा का उघडला आहे? हो आणखी एक, हे लबाड लोक काहीतरी संकट असल्याचे भासवून त्यावर हजारो रूपयांचे उपाय सुद्धा सुचवतात. नाडीच्या पट्ट्या लिहिण्याचे तंत्रज्ञान कोणाला ठाऊक झाले, तर याच पद्धतीने दरवर्षी मर्यादित संखेत पट्ट्या लिहीत राहाता येतील लिहिण्याचे माहीत नाही पण त्याच त्याच पट्ट्या वाचण्याचे आणि भोळ्या लोकाना लुबाडण्याचे तंत्रज्ञान त्याना नक्की ठाऊक झाले आहे. तंत्राबाबत तपशीलवार उत्तर श्री. ओक किंवा अन्य माहीतगार देऊ शकतील. अजूनतरी अशी माहीती माहीतगारानी दिलेली नाही म्हणजे समजून घ्या काय ते. (हे सर्व सांगोवागीचे नाही. मी प्रत्यक्ष जाऊन बघितले आहे यांचा कारभार कसा चालतो ते. हे लोक जी कॅसेट आणि वही वगैरे देतात त्यातले भविष्य म्हणजे थोतांड असते. उदा. वयाच्या २५-३० च्या दरम्यान तुम्हाला अपत्यप्राप्ती होईल (जी जगातील ६०-७०% जनतेला या वयात नाडी न बघता सुद्धा होतेच)). असो. माहीतगारांच्या उत्तराच्या अपेक्षेत रामपुरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
त
तिमा गुरुवार, 12/25/2008 - 13:56 नवीन
आपणाकडून विविध मार्गांनी माहिती काढून तीच माहिती नाडी शास्त्री आपणाला सांगतो. याचा अर्थ आपण सांगितलेली सर्व माहिती लक्षात ठेऊन तेच भविष्य म्हणून तो आपल्याला सांगतो. जेंव्हा आपण म्हणतो की तीच माहिती तो परत सांगतो. म्हणजे ती माहिती तो परत उगाळतो. लई भारी, म्हन्जी कसं की 'तुला कापूसकोन्ड्याची गोष्ट ऐकायची का?' तसं वाटताय राव! लोकंनो, आपापल्या नाड्या संबाळा, दादांसारख्या लोंबत्या ठ्येऊ नका.
  • Log in or register to post comments
र
रेझर रेमॉन Fri, 01/02/2009 - 15:50 नवीन
ओक साहेबांचा लेख वाचला. आपला एक मित्र संपूर्ण नास्तिक होता. तो डोंबिवलीला नाडी परीक्षा करून त्यांची काढायला गेला. पण त्याला जबराट आनुभव आला आणि तो कॅसेट ऍकून काही काळ तरी आस्तिक झाला! हा चमत्कार मी स्वतः अनुभवलाय! त्यांची नाडी सोडायला गेला आणि स्वत:ची तुट्ली. पण काही काळा नंतर हा आस्तिक पुन्हा नास्तिक झाला! असे चमत्कार होतच असतात! नॉस्ट्रॅडेमस वाचून आपण काही काळ भारावतोच ना! नेपोलिअन, साई प्रश्नावली पण खर्‍या ठरतात. कोणाची हीम्मत आहे काय नाही म्हणायची? पोपटवाल्याचा आम्ही स्वतः अनुभव घेतलाय. तो पण खरा ठरला होता, एका मंद मुलाच्या बाबतीत! बापू, भाऊ, महाराजांची कथने ही खरीच ठरतात! नाही कोण बोलतोय तो? आम्ही स्वतः अनुभव घेतलाय! हो म्हणायला काय घ्याल? मंदबुद्धी!
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Sat, 01/17/2009 - 16:59 नवीन
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 01/17/2009 - 19:35 नवीन
अहो पण हे आहे कुठे? काही दिसतच नाहीये. पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा