रे.....!
Primary tabs
रे!!
रे तसा रोजच असतो सभोवताली
पण कधीतरी अचानक गवसतो.
आणि बघताबघता जीवाभावाचा रुहानी होतो.
रेषेसारखा जरी सरळ असला तरी तसा गडी थोडा तिरपागडीच.
म्हणजे रुढी रिवाजांच्या चौकटी न मानणारा.
भूत भविष्याचं ओझं न वाहणारा,
मोकळा, सुटसुटीत, आखीव रेखीव रे!
कधी, आलं अंगावर घेतलं शिंगावर असा रांगडा ,
कधीकधी तर ऋषीसारखा स्थितप्रज्ञ तर कधी, राजमान्य राजश्री वगैरे वगैरे!
पण रे ला पहायचं ते गं सोबत!
एका रे ची तिथं किती ती रुपं!
गं भोवती रिमझिमणारा, रुंजी घालणारा रुमानी रे!
गं ला नखशिखांत राजवर्खी रंगात खुलवणारा रंगीन रे!
गं ला जपणारा तितकाच कोमल हळवा ऋजु रे!
वेड्या गं ची समजुत घालणारा रहनुमासा रे!
सर्व काही देऊनही रिता न होणारा संयमी अभोगी रतजगासा रे!
...
पण, पण, पण..
गोंधळलेल्या, अघळपघळ, आणि पट्कन गुंतणा-या बिचा-या गं चं या रोखठोक, रमूनही फार वेळ न रेंगाळणाऱ्या रे सोबत कसं बरं व्हायचं???
???
(रुहानी- रुह किंवा आत्म्याशी नातं असलेला
रुमानी- प्रणयी
रहनुमा- रस्ता दाखवणारा, मार्गदर्शक
रतजगा- रात्रीचं जागरण)
सा रे कि सा रे ग म को लेकर गाते चले
पापा नाही है धा नि सी दीदी, दीदी के संग चले.
पापा धानी नाही, म नंतर पूर्ण विराम.
रागदारी मस्त सुरु आहे. लगे रहो.
- रे उर्फ़ दिलीप बिरुटे :)
( आपला नम्र )
धन्यवाद सर!:)
साX
तसा अपघातीच जिवनी येतो
आणि बघताबघता जीवाचा शूल होतो.
सा, तसा रोज नसतो सभोवताली
कधीतरी अचानक धुमकेतू सा,धमकतो
आणि बघताबघता सौज्यन्याची ऐशीतैशी करून जातो.
अर्रर्र
हिन्दी भाषेतला.
मस्त!
सजना रे!
चंचल चांदणी गं
लुकलुकते तुझ्यात रे!
मोहक सृजा गं
रूजते तुझ्यात रे!
सजना रे...
वाह! तुझी आधीची अ"रे"रावी पण आवडली होती.