काथ्याकूट

लेखाबरोबर फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करणे

Primary tabs

यापूर्वी याविषयी लिहिलेलं मी वाचलं आहे. पण आता ते माझ्याकडे उपलब्ध नाही. तसेच ॲन्ड्राईड फोन वरून फोटो किंवा व्हिडीओ कसे टाकावे याविषयी कुणी मार्गदर्शन करतील का?
धन्यवाद

कंजूस

यावर माझे लेख आहेत. पण दरवर्षी sharing sites चे धोरण बदलत राहाते आणि updates लक्षात घ्यावे लागतात. काही साईट्स विकल्या गेल्या, काही बंद झाल्या, काहींनी free account चे storage कमी केले, काहींचे हे काम किचकट झाले.
सध्या मी imgur.com वापरतो. त्यातून अगदी छोटीशी लिंक मिळते. इथून full size photo share( Google drive मधूनही होतो पण सध्या त्यात अडचणी येत आहेत) होतो. तो अगोदर compress करून टाकल्यास लेख लवकर उघडतो. पंधरा वीस फोटो जर का तीन चार एमबीएचे असतील तर slow internet असलेल्या मोबाईलला अडचण येते. 200. -300 kb size चे ठेवणे.
परंतू आपले व्यक्ती नसलेले फोटो Imgur मधून टाकले सोपे.

नूतन

म्हणजे तितकं सहज सोपे नाही म्हणजे

कंजूस

मोबाईलमध्ये फोटो असतात ते ४-५ एमबीए पेक्षा जास्त साइजचे असले तरी वाटसपवर पाठवले की 100-150 kbचे होतात तेच Imgur वर वापरू शकता.

कंजूस

Imgur वरून फोटो शेअर करण्यचा आणखी एक फायदा असतो तो म्हणजे Imgur चे सभासदही ते फोटो पाहतात आणि likes, comments देत राहतात. फोटोला नाव, कधी काढला आणि थोडी माहिती description मध्ये अवश्य द्यावी. तिथले सभासद instagram वर high resolution professional photos टाकतात असे नसते. आपल्या साध्यासुध्या फोटोंचे ही कौतुक होते.

भागो

मिपा वर फोटो चढवणाऱ्या आयडींबद्दल भयंकर आदर आहे. इथे तर लोक फोटो आर्टिकल लिहू शकतात.

भागो

फोटो आर्टिकल! म्हणजे
लेखाबरोबर फोटो नाही तर
फोटो बरोबर लेख!

नूतन

पण ते desktop वरून केले होते. जे सध्या करणं शक्य नव्हतं. म्हणून mobile वरून करायचे होते

कंजूस

आणखी एक सोपा उपाय आहे. एक नवीन Gmail account करून त्या ईमेलने ब्लॉग सुरू करा.( यामुळे तुमचे खरे नाव आणि Gmail गुप्त राहील). त्या ब्लॉगवर फोटो टाका आणि तिथून मिळणारी image link इथे वापरा. (हे फार सोपं आहे. )शिवाय ती लिंक तिथून कुणीही इथे आणू शकतो. ब्लॉग publish झालेला असल्याने तो public domainमध्येच असतात, फोटो दिसत नाही असं होतंच नाही.

बाबुराव

फ्लिकर अपलोडवायचे आणि तिकडून कोड आणुन चिकटवायचा.

कंजूस

फ्लिकर आता smugmug ने विकत घेतल्यानंतर फ्री अकाउंटमधून शेअरिंगची मर्यादा फक्त पन्नास फोटोंची केली आहे.