जे न देखे रवी...

नाळ

Primary tabs

प्रश्न सुटता सुटता
माय उत्तरांची व्याली
प्रसवल्या उत्तरांच्या
प्रश्नचिन्ह शोभे भाळी

ललाटीचे लेकरांच्या
वाचुनिया फुंदे माय,
"प्रश्न घेऊनी जन्मल्या
उत्तरांचे करू काय?"

प्रश्नांकित उत्तरांची
गाठ घडोघडी पडे
एक सोडविण्याआधी
नवा प्रश्न ठाके पुढे

अनादि नि अनंत ही
श्रेढी प्रश्न उत्तरांची
चिरंतनाशी जोडीते
नाळ क्षणभंगुराची

जाळ झाला तरी नाळ तुटत नाय
प्राक्तन भोगले तरी प्रश्न सुटत नाय
क्षणभंगुर नाळ, नातं जोडते चिरंतनाचे
किती फेडू म्हणता, कर्ज उरते अनंताचे

कवीता आवडलीच.