जे न देखे रवी...

पूणे ससून

Primary tabs

इथं तीन लाख,
मिळतात बसून।
हो हे आहे,
पुण्याचे ससून।।

कसे बदलणार,
डाॅक्टरचे रक्त?
कुठे मिळणार,
'भ' विटामीन-रहीत
शुद्ध रक्त?!

कुणाकुणाचे
बदलणार रक्त?
पोलीस,RTO,
वकील,कस्टम,Excise,
जज,आमदार,बिल्डर?
त्यापेक्षा सोपी,
मजूरी सक्त ।।

नठ्यारा

बाजीगर,

भ व्हिटामिन चा उल्लेख जरासा खटकला. मात्र नंतर त्याची उपयुक्तटा कळून आली. खरंतर महाभारतकाळापासून भ व्हिटामिन वर प्रस्थापितांचा दात आहे. चालायचंच !

-नाठाळ नठ्या

दुनिया के बाज़ार में, सब सामान बिकता है !
किसी का नाम, तो किसी का मान बिकता है !
कौन कहता है कि मंहगी हो गयी हैं चीज़ें,
“मिश्र”,
जितना चाहो खरीदो, सस्ते में ईमान बिकता है !

शंभूराज मिश्र.

काही भुतलवरच्या देवांनी सुद्धा स्वताला बाजारात बसवले आहे. विश्वास केव्हांच पानिपतावर धराशायी झाला आहे.

पाषाणभेद

तुरूंगात पाठवा त्यांना आणि त्यांच्या कोणत्याच पिढीला सरकारी नोकरी नका देऊ असा कायदा करायाला हवा.

भागो

त्यांच्या कोणत्याच पिढीला सरकारी नोकरी नका देऊ असा कायदा करायाला हवा.>>> काय्स्च्या काही. अस का बर.? पुढच्या पिढीचा काय गुन्हा?
"मेरा बाप चोर है"ची आठवण झाली.

रामचंद्र

यावरून इंग्रजांनी बाळाजीपंत नातूला भरभक्कम मोबदला दिल्यावर त्याच्या कुठल्याही वारसांना सरकारी नोकरी मिळणार नाही असं स्पष्ट केलं होतं असं म्हणतात ते आठवलं.

चौथा कोनाडा

अस्वस्थ करणारी दाहक रचना !
असं काही वाचलं की मन काळवंडून जातं ... आणि आपण ही या चक्राचा भाग आहोत याची ही जाणीव होऊन मन खंतावतं !