जे न देखे रवी...

सद्दीत सुमारांच्या ह्या

Primary tabs

जटिलाच्या दारावरती
दुर्बोध देतसे थाप
भेटीत उमजले दोघा,
"उभयतांस एकच शाप

सद्दीत सुमारांच्या ह्या
उ:शाप नसे शापाला
अस्वस्थ उद्याची हाक
ऐकू ना येई कुणाला"

दुर्बोध जटिलसे हसले
दुर्बोधून जटिलही गेले
अन् विषण्ण होऊनी दोघे
आश्रयी कवीच्या गेले :)

गवि

फारच आवडली. नेहमीप्रमाणेच दर्जेदार...

तिमा

अपूर्णतेच्या अंधारात
पूर्णत्वाचे विवर
अर्थकाहुर शब्दभांडारात
विषण्णतेचे प्रहर
पद्यपंक्तिच्या मांडवात्
शब्दफुलांची झगमग
दुर्बोध रचनांच्या जाळ्यात
वाचकांची तगमग
सुबोध स्पष्ट विचारांचे
अर्थवेत्त्यांना वावडे
तिमिरघन मायाजालात
रसिकांना शब्दकोडे !

कुठे जटिल कुठे दुर्बोध
शब्दच्छल सारा रसिक अबोध
कुठे अपुर्ण कुठे पूर्णत्व
कल्पनेचा खेळ शब्दांचे महत्व
खेळीया खेळ करतो
शब्द बाणांनी रसिका छळतो

कवी ग्रेस आठवतात.

मनिष

सुमारांची वाढ खरंच बेसुमार झालीयं...