जे न देखे रवी...
माझी योगचर्या
Primary tabs
भुजंगासनाची
माझी रीत न्यारी
डसेन जिव्हारी
नकळत ॥१॥
शीर्षासन तर
माझे आवडते
नको ते उलटे
पाहतो मी ॥२॥
"धनुरा"सनाची
सवय लाविली
"मशाल" फेकली
दूरवर ॥३॥
सध्या "पद्मा"सन
घालतो मुकाट
ED चे झेंगट
कोणा हवे? ॥४॥
आवडली.
तुतारी आणी हाथ जोडला असता आणखी मजा आली असती.