जे न देखे रवी...
विलक्षणाच्या उभ्या पिकावर
Primary tabs
विलक्षणाच्या उभ्या पिकावर
देण्या खडा पहारा
पाहिजेत-जे भेदू शकतील
स्थळकाळाची कारा
पाहिजेत ते - नेणीव ज्यांची
जाणिवेतुनी झरते
अर्थगर्भ मौनातही ज्यांचे
रोमरोम रुणझुणते
पाहिजेत-जे उत्स्फूर्तीच्या
पुष्करणीचे पाणी
पिऊनी खोदतिल अमूर्तावरी
अकल्पिताची लेणी
पाहिजेत-जे अज्ञेयावर
कलम करुनी ज्ञाताचे
विलक्षणाचे वाण बनवुनी
घेतील पीक उद्याचे
विलक्षणाच्या उभ्या पिकावर
सोडुया हा कॅटरपिलर
>>>
आजच्या काळात असा क्यु आर मीट करणारा प्रोफाईल मिळणे....
कवीता आवडली.
छान कविता!
अनन्त्_यात्री तुम्हाला कवितेतलं काही कळंत नाही. शिकवणी लावा सर्वज्ञानी कॅटरपिलर कडे :)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आवडली
पैजारबुवा,