जे न देखे रवी...

आठवती..

Primary tabs

आठवती ओले पायठसे
मृद्गंध भारली सांज
नभी मेघमृदंगा साथ करी
रिमझिमती पाऊसझांज

नभ तोलून धरल्या क्षितिजाला
झगमगत दुभंगे वीज
ढग पापण्यात दडण्याआधी
अनिमिष जागतसे नीज

सृजनाची हिरवी हाक जरी
भवतालातून दुमदुमते
ओथंबून येता नभ अवघे
अवचितसे दाटून येते

आठवती ओले पायठसे
मृद्गंध भारली सांज
नभी मेघमृदंगा साथ करी
रिमझिमती पाऊसझांज

अहाहा ! इथेच पैकीच्या पैकी गुण टाकले.
बाकी ओळीही सुरेख.

लिहिते राहा. पुलेशु.

-दिलीप बिरुटे

गवि

+१

पुढची दोन कडवी लयीत डगमगली आहेत. एक तर पूर्ण मुक्त किंवा पूर्ण लय असे आवडते. अर्थात पसंत अपनी अपनी..