जे न देखे रवी...

**भूत त्याचे ठार काही होत नाही**

Primary tabs

घोट घे रे यार काही होत नाही
जीव जातो फार काही होत नाही.

एकदा रक्ताळली बेधुंद झाली.
म्यान ही तलवार काही होत नाही.

बांधता घर एकदा कळले उन्हाला
सावली मग पार काही होत नाही.

भूत नसते सिध्द करण्या ठार मेला.
भूत त्याचे ठार काही होत नाही.

गंजलेल्या जिंदगीला धार देतो
आणि मी भंगार काही होत नाही.

पोरसवद्या बालिकेची माय होते.
स्वस्थ ती घार काही होत नाही.

एकदा तिज आपुलेसे मानले कि
वेदनेचा भार काही होत नाही.

+कानडाऊ योगेशु

वाह क्या बात है.

बरेच दिवसांनी उत्तम गजल वाचली !!

गंजलेल्या जिंदगीला धार देतो
आणि मी भंगार काही होत नाही.

एकदा तिज आपुलेसे मानले कि
वेदनेचा भार काही होत नाही.

हे दोन शेर एकदम जबरदस्त आहेत.

मजा आली. लिहित रहा !

Bhakti

फारच जीवघेणी गझल! सुंदर!

एकदा रक्ताळली बेधुंद झाली.
म्यान ही तलवार काही होत नाही.