'एका खेळियाने' आता पुस्तक स्वरूपात!
Primary tabs
मिपाकरांनी भरभरून प्रेम दिलेली लेखमाला 'एका खेळियाने' आता सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात उपलब्ध झाली आहे.
त्याचं झालं असं की दोन एक वर्षांपूर्वी सकाळने एक स्पर्धा घेतली होती. त्यात 'एका खेळियाने'ला सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. त्याचेच फलित म्हणून सकाळ ने एका खेळियानेचे लेख पुस्तकरूपात प्रकाशित केले आहेत. मिपावर आधी प्रकाशित झालेले काही आणि काही नवीन अश्या तीसेक लेखांचा त्यात समावेश आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे पॅरिस ऑलिंपिक्स सुरु झाले त्याच दिवशी, २६ जुलै ला हे पुस्तक वेगवेगळ्या ई-दुकानांमध्ये उपलब्ध झाले. पुस्तकाचे ई-बुक देखील लवकरच उपलब्ध होईल. पुस्तक खालील दुव्यांवरून मागवता येईलः
अजून प्रकाशन समारंभ झालेला नाही, पण ज्या दिवशी तारीख कळेल तेव्हा मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण केले जाईल - कारण ह्या कार्यामध्ये मिपाकर ही घरची मंडळी आहेत!
लेखन करत राहण्यासाठी मिपाकरांच्या प्रतिसादाने खूप प्रोत्साहन मिळाले आणि त्याचंच फलित म्हणजे 'एका खेळियाने' हे पुस्तक! घरच्यांचे आभार काय मानायचे? लोभ आहेच - तो वाढत रहावा हीच प्रार्थना!
जे.पी.मॉर्गन
७ ऑगस्ट २०२४
अभिनंदन
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
- (आनंदी) सोकाजी
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
पुस्तक प्रकाशित होण्याचीच वाट बघत आहे.
हार्दिक अभिनंदन .
अभिनंदन!
मिपावरचे बरेच वाचले आहेत त्यामुळे इतरही चांगले असतील यात काहीच शंका नाही. भारतात जाईन तेव्हा पुस्तक घेण्यात इंटरेस्ट आहेच.
मनःपूर्वक अभिनंदन. आपले येथील सर्वच लेख वाचलेले आहेत. पुस्तक घेणारच.
अभिनन्दन जे पी भाऊ.
हे पुस्तक म्हणत आहात का ??
अभिनंदन
अभिनंदन. शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
अभिनंदन जे पी सर
जे पी मॉर्गन सर, आपले हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
भारीच! हार्दिक अभिनंदन!
किंडल वर्जन घेण्याची ईच्छा आहे. आले कि घेतो. :-)
खूप मस्त
खूप अभिनंदन !
लिहिते रहा .