जे न देखे रवी...

रानफुले

Primary tabs

असाच भटकत रानात असता
रानफुले समोर येती

नव्हता कसला गंध तयांना
रंगही नव्हते भरजरी विविध
परी तयांत होती नक्षी
बारीक नाजूक सुंदर कोमल

पिवळे गेंद उन्हात चमके
वार्यावरती डौलाने डुलके
वेड लागले मलाच तेथे
दृष्य मनोरम खरोखर ते

डोंगर उतार पठारावरती
फुले पाहता लागली समाधी
घोस तयांचे लेऊन घ्यावे
वाटले तक्षणी अंगावरती

एकरूप व्हावे, तेथेच रमावे
परत न फिरावे घराप्रती
बघतो जेव्हा अचानक
रानफुले समोरी येती

- पाभे (03/10/24)
(काल डोंगर उतारावर पाहिलेले दृष्य)

प्रचेतस

व्वा..सुरेख.
हल्ली सह्याद्रीत सर्वत्र हे दृश्य दिसत आहे.

रानफुलां सवे अनेक पक्षी पण दिसतात
अंधाराचे जाळे फिटता पाऊले डोंगराकडे वळतात

श्वेता२४

एकरूप व्हावे, तेथेच रमावे
परत न फिरावे घराप्रती

अगदि असेच वाट्ते.

गणेशा

मस्त... खूप दिवसांनी मिपा आणि कविता विभाग पाहिला...
आणि तुमची कविता वाचली सुरेख..

हल्लीच मारुती चितमपल्ली वाचतोय, त्यामुळे निसर्ग.. वाटा.. फुले.. पक्षी ह्या सर्व वर्णनांनी भारावून गेलोय, त्या मुळे कविता जास्तच आवडली...