मेथी के शर्ले
Primary tabs
असंच स्क्रोल करतांना मेथी के शर्ले दिसले.
मेथीची भाजी उत्तर भारतात बटाटा बरोबर खातात हे माहिती होते.पण खास करून जे छोटे बटाटे असतात त्यांच्या बरोबर जालंधर मध्ये थंडीच्या दिवसात हा पदार्थ आवडीने खातात.
.jpg)
साहित्य
एक जुडी निवडलेली मेथीची पान यात काड्या घ्यायच्या नाहीत.
तीन मोठे बटाटे
आलं, लसूण,मिरची ,जिरे पेस्ट
हिंग,धने पावडर,आवडीचा मसाला
एक वाटी डाळीचे पीठ

कृती
१.मोठे बटाट्याच्या साल न काढता बारीकहून थोड्या मोठ्या फोडी करायच्या.
२.त्यात स्वच्छ केलेली मेथी व बाकीचे जिन्नस एकत्र करायचे.चवीनुसार मीठ टाकायचे.
३.या मेथी ,बटाट्याला पाणी सुटल्यावर एक वाटी डाळीचे पीठ टाकून मिक्स करायचे.
४.आता हे मिश्रण कापडावर छोट्या आकाराचे गोल वडे थापायचे.
५.चांगले खरपूस तळून घ्यायचे.
६.हिरवी पुदिना चटणी किंवा सॉस बरोबर यायचे.
कालची थाळी ज्यात पंजाबी मेथी के शर्ले आणि राजस्थानी दाल बट्टी यांच बल्ले बल्ले भांगडा झाला :)

बरोबर लस्सी असेल तर सोने पे सुहगा.
चार वर्ष जालंधर मधे ब्ल्यू स्टार मधे होतो. मोर कढी आणी चावल हा एक मस्त पदार्थ तीथेच खाल्ला.
धन्यवाद.
व्वा....!
वेगळाच पदार्थ.
चांगला दिसतो आहे पदार्थ. थाळी आवडली.
मेथीचे बरेच पदार्थ आमच्याकडे होतात. भाजी, पचडी, भजी, पराठे. आवडीने खातो.
चिरलेला कांदा लिहायचा राहिला.चिरलेला कांदाही यात घालायचा आहे.
सर्वांना धन्यवाद _/\_
'भक्तीघाई'... अजुन काय 😀
असो, नविन पदार्थ समजला आणि (फोटोत बघुन तरी) आवडला!
वरती कंकाका म्हणालेत त्याप्रमाणे आमच्याकडेही मेथीचे अनेक पदार्थ बनतात, त्यामुळे आता हे 'मेथी के शर्ले' बनवण्याची फर्माईश करण्यात येणार आहे...
भक्तीजी तुम्ही FOOD FATAFAT फोटोत जे दाखवले आहेत आणि तुम्ही केलेलं हे एकदम वेगळे दिसत आहेत
अंतर्जावरील फोटोत जे आहेत त्यात अक्खे छोटे ( मिनीइचर ) बटाटे आहेत का? ( विचारायचे कारण म्हणजे येथे असे अगदी पिल्लू बटाटे मिळतात ते आणून प्रोयोग केलला असता )
आणि तुमच्या तयारीत मध्यम बटाट्यांचे तुकडे दिसतात
आणि ते फक्त ३ महिने मिळतात असे का म्हणतात ?
अंतर्जावरील फोटोत जे आहेत त्यात अक्खे छोटे ( मिनीइचर ) बटाटे आहेत का? ( विचारायचे कारण म्हणजे येथे असे अगदी पिल्लू बटाटे मिळतात ते आणून प्रोयोग केलला असता )हो हो छोटे बटाटे वापरा.आणखीन एक सुचना,ते बटाटे दहा मिनिटे आधी उकडून घ्या.मी कच्चेच वापरले.
https://youtube.com/shorts/czKsHA-_moE?si=AbPdp7sFcGUTq0jM
मला तो फोटो नंतर सापडला.तोपर्यंत आधीच्या रेसिपीनुसार मी छोटे वडे थापले होते.
नवीन पदार्थ कळाला
पदार्थ नवीन आहे. ताई तुम्ही रेसिपी जरा नीट वेळ घेऊन लिहून तपासून मग फायनल करावी अशी विनंती.
कांदा लिहायचा राहिला, बटाटे उकडून घ्यावेत हे नंतर कोणी विचारल्यावर सुचवले.. (म्हणजे बहुधा कच्चे बटाटे घातल्याने फारसे चांगले टेक्सचर झाले नसावे)..
आंतरजालीय वेगळा फोटो आगोदर आणि शेवटी प्रत्यक्ष बनलेला यात खूप फरक, मधल्या स्टेप्सचे फोटो नाहीत. बारीकहून थोड्या मोठ्या वगैरे असे अंदाज हे प्रथम ट्राय करणाऱ्याला गोंधळात पाडतात. तुमचे पुरवणी प्रतिसाद वाचण्याआधीच कोणी लेखावरून बनवले तर अर्धीकच्ची राहील पाककृती.
बघा विचार करून. बाकी नवीन पाककृती शोधून करण्याच्या उत्साहाचे कौतुक आहेच.
>>>> पदार्थ नवीन आहे. ताई तुम्ही रेसिपी जरा नीट वेळ घेऊन लिहून तपासून मग फायनल करावी अशी विनंती.
हे राम... सामान्यपणे जेष्ठ वयस्कर लोक जसे घरा-दारात सारखी कुरकुर करतात त्या स्वरूपाची ही प्रातीनिधिक प्रतिक्रिया. जेष्ठ वयस्कर लोक गप राहुच शकत नाही.
आवडली. छान. वाह ! असं प्रोत्साहन येऊच शकत नाही. अवघड हे लोकाचं. ( पळा)
-दिलीप बिरुटे
ऑ ? हे कोण बोलले बोला?
रंगच फिका झाला, तिखटच अजून हवे होते, फोटोच चांगले आले नाहीत, मांडणी आणखी आकर्षक हवी वगैरे वगैरे सदैव खुसपट काढणारे काही ज्येष्ठ आज हे म्हणत आहेत हे पाहून एक मिपाकर म्हणून ड्वाले पानावले.. इ इ.
धन्यवाद सर :)
काय बाई, गवि माझ्याशी का दुश्मनी घेतात ?कोण जाणे?
मी जी रेसिपी पाहिली त्यात कच्चेच बटाटे होते,वडेपण आकाराने छोटेच होते.नंतर 'रिसर्च' करून अधिक माहिती मिळाली.त्यात छोटे बटाटे, उकडलेले पण वापरले होते.
विचार पक्काच आहे.
नवनवीन पाकृ देतच राहणार
गविकडून कौतुक घेतच राहणार ;)
त्याचे असे आहे की, घरात अमुक एक ही पाककृती करा असे फर्मान , नाही नाही.. विनंतीपत्र दिल्यानंतर जर मागाहून अर्र थोडा कांदा घाला बरं का, आणि बटाटा उकडून घातल्यास अधिक बरा लागेल.. लसूण आधीच घालायला हवा होता.. वगैरे उपसूचनांचे परिशिष्ट जोडू गेल्यास तिकडून आमचा करेक्ट कार्यक्रम होईल अशी भीती असते.
>>> काय बाई, गवि माझ्याशी का दुश्मनी घेतात ? कोण जाणे ?
आत्ता काय बोलू ? तुम्हीच नाही अनेकांच्या खोड्या काढणे चालूच असते. बाकी, माणूस एकदम चांगला. लेखन वाचन समृद्ध, विषय, आशय, जगाकडे पाहण्याची उघड़ी नागडी, निकोप आधुनिक विज्ञानवादी दृष्टी अशा त्यांच्या मिपावरील लेखनाचे अनेक चाहते आहेत मीही एक. आता अधे-मधे कुरकुर करणे, टिकात्मक लिहिणे, वगैरे हे माणूस म्हटलं की चालायचंच. ( ह. घ्या काका )
-दिलीप बिरुटे
धन्यवाद हो सर. ते काही शब्द कामकाजातून वगळल्यास मजकूर वाचायला बरा आहे.
बाकी तुमच्याकडून कधी निखळ प्रशंसा ऐकायला आली तर नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय येतो.
गवि(विं)चे म्हणजे आमच्या मातोश्रींसारखे आहे. क्रिटीसाईजच करणार. माझे चांगले लेख पाहणारच नाही,फिरकणार नाही तिकडे :(
तरीही माझी जगातली सर्वात आवडती व्यक्ती माझी आई आहे.
तुम्ही ज्येष्ठ, उत्तम जाणकार मिपाकर यानिमित्ताने खुप आदर करते _/\_
तुमची टीका कधीच हलक्यात घेणार नाही!
गवि , सहमत मीही ह्याच प्रकारचे प्रश्न विचारले पण लोक जसे तुमचं प्रश्नवर टीका करतील तसेच माझ्य प्रश्नवर पण बहुतेक
गविंच्या प्रतिसादाच्या एकूण आशयाशी सहमत.
संविधाना नुसार ज्येष्ठतेनुसार कुरकूर करण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
बाकी चान चान.
करून पाहते
रेसिपी आवडली, नक्की करून पाहीन / अहोंना करायला सांगेन.
---
बाकी शर्ले हा शब्द आवडला. पहिल्यांदा ऐकल्यावर लिट्टी-चोखा हा शब्ददेखील आवडला होता.
या दिवाळीत मेथी पुरी हा प्रकार केला होता.
फार क्वचितच फरसाण वाले हा पदार्थ करून विकतात. आमच्या इथला एक जण करून विकायचा तो दुकान बंद करून गेल्याने तो घरीच केला. पुढच्या आठवड्यात पुन्हा होणार आहे.
हे नाव आवडले..खूपच दमदार वाटते..अमरीश पुरीच्या आवाजात "वो मेथी के शर्ले लाना जरा" व्वा...:)