भगवान श्रीराम मांसाहारी होते काय ?
💬 प्रतिसाद
(98)
म
मृगनयनी
Fri, 12/26/2008 - 11:49
नवीन
जयेश जी,
सहमत!
|| रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे ||
|| रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः ||
|| रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोस्मह्यम् ||
|| रामे चित्तलया सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर ||
|| राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे ||
|| सहस्त्रनाम तत्तुल्यम्, रामनाम वरानने ||
राम हा विष्णुचा सातवा अवतार होता. हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
रामाच्या आहारापेक्षा, रामाचे आचार- विचार उपयोगात आणण्याची गरज आज सर्वांत जास्त आहे.
| हरि ओम |
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
गुरुवार, 12/25/2008 - 15:06
नवीन
>>... राम मांसभक्षक होते की नाही याने नेमका काय फरक पडतो ते कळले नाही. ते जे काही खायचे त्याच्या रेसिप्या शोधून तसे स्वतः बनवून खाण्यात रस असेल तर गोष्ट वेगळी.
अहो पण एखाद्याला माहिती हवी असेल तर काय वाईट आहे त्यात? आणि आपल्याच धार्मिक ग्रन्थात काय लिहिले आहे ते समजून घेतले तर चूक काय ?
---रामानन्द
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
गुरुवार, 12/25/2008 - 18:40
नवीन
अरुण गोविल मांसाहारी होता काय? त्यावरून काही निष्कर्ष निघू शकेल....
- Log in or register to post comments
प
प्रियाली
गुरुवार, 12/25/2008 - 21:56
नवीन
अरुण गोविल मांसाहारी असल्याबद्दल माहित नाही परंतु एकदा चित्रिकरणा दरम्यान जमलेल्या लोकांनी त्याच्या (म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या) सिग्रेट पिण्यावर आक्षेप घेतला होता असे ऐकून आहे. ;)
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
गुरुवार, 12/25/2008 - 22:02
नवीन
म्हणजे प्रभू रामचंद्र(अरुण गोविल) मांसाहारी असले/नसले तरी त्यांना चैतन्यनलीकेचे वावडे नव्हते एवढे मात्र खरे.
चला चर्चेतून काही ना काही तरी निष्पन्न झाले म्हणायचे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 12/26/2008 - 03:34
नवीन
हो ना.
शिवाय भारतीय जन्ता पक्षाच्या बाजूने रावण (अरविंद त्रिवेदी) प्रचार करायचा असे वाचून आश्चर्य वाटले होते. काव्यगत न्याय यालाच म्हणत असावेत
आपला
(बिभीषण) आजानुकर्ण
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 12/26/2008 - 06:09
नवीन
काय हो लघुशंकाग्रस्त
मगाशी निमित्त व निमित्य यातला फरक नजरेस पडला पण जनता मधील पुर्ण न व जन्ता मधला पायतुटका न फरक दिसला नाही श्रीमान लघुशंकाग्रस्त?
म्हणतात ना... लोका सांगे..
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 12/26/2008 - 13:05
नवीन
अवलियापंत,
खरे म्हणजे जंता असे लिहिणार होतो. पण नंतर विचार बदलला आणि थोडे कन्सेशन देण्यासाठी जन्ता असा केला.
बाय द वे, 'पुर्ण' हे चुकीचे आहे 'पूर्ण' असे हवे.
आपला
(शुद्ध) आजानुकर्ण
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 12/26/2008 - 05:45
नवीन
अरुण गोविल मांसाहारी असल्याबद्दल माहित नाही परंतु एकदा चित्रिकरणा दरम्यान जमलेल्या लोकांनी त्याच्या (म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या) सिग्रेट पिण्यावर आक्षेप घेतला होता असे ऐकून आहे.
आणि म्हणे सीता (दीपिका) लक्ष्मणा(याचं नाव आठवत नाही)बरोबर पबमधे जायची!
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
Fri, 12/26/2008 - 06:04
नवीन
तो आधुनिक रामायणाचा भाग असावा.
- Log in or register to post comments
म
मृगनयनी
Fri, 12/26/2008 - 11:51
नवीन
आणि म्हणे सीता (दीपिका) लक्ष्मणा(याचं नाव आठवत नाही)बरोबर पबमधे जायची!
»
अदिती,
दिपीका लक्ष्मणाबरोबर नाही, भरताबरोबर (स्वर्गीय अभिनेता :संजय जोग) जायची. ;)
अर्थात, "दिपीका" सीतेचा अभिनयही..खरोखर अप्रतिम करत असल्यामुळे, (तिच्या आणि संजयच्या ही) रामायणातील प्रतिमांना जराही धक्का पोचला नाही.
:)
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 12/26/2008 - 13:07
नवीन
सीतेचे काम करणारी दीपिका काँग्रेसची खासदार होती म्हणे.
आपला
(ऐकीव) आजानुकर्ण
- Log in or register to post comments
स
सुक्या
गुरुवार, 12/25/2008 - 22:49
नवीन
मी रामाला देव किंवा भगवान मानत नाही. माझ्या मते राम ही एक आदर्श व्यक्तीरेखा होती. ज्या काळी समाजप्रबोधनासाठी अगदी नगन्य साधने उपलब्ध होती तेव्हा लोकांना आदर्श जिवन जगण्यास प्रव्रुत्त करण्यासाठी राम / लक्षमण / सिता वगेरे व्यक्तीरेखा अस्त्तीत्वात आल्या. राम हा अस्तीत्वात नव्हता , तो काल्पनीक आहे हा वाद मला घालायचा नाही. परंतु सर्वसामान्य मनुष्यासमोर जगण्याचे एक आदर्श उदाहरण ठेउन समाजात शांतता निर्माण करने हा एक त्याचा उद्देश होता असे मला वाटते. पुर्वाश्रमीच्या दरोडेखोराने रामचरीत्र लिहुन आदर्श जिवनाचा पुरस्कार करावा ह्यातच सगळे आले. वनसंपदा मुबलक उपलब्ध असताना मांसाहार हा होतच असावा. रामही मांसाहारी असावा. त्या काळाचे जिवनमान पाहता मांसाहार त्यज्य असेल असे मला तरी वाटत नाही.
(मांसाहारी ) सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
Fri, 12/26/2008 - 07:12
नवीन
हे घ्या... वाचा...
http://www.maayboli.com/node/2802
- Log in or register to post comments
फ
फकीरा
Fri, 12/26/2008 - 11:06
नवीन
Vishay nivdatana japun nivdave.Udya tumhi Ram daru pit hota ka yavar kathyakut karal.Aani ase sapraman sangal ki sitaharan zalyavar ramane pine chalu kele.
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 12/26/2008 - 12:50
नवीन
sitaharan zalyavar ramane pine chalu kele
तर, रामायणाऐवजी देवदासायन ह्या महाकाव्याचा जन्म झाला असता.
;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 12/26/2008 - 13:14
नवीन
आपल्याला काय म्हणायचे आहे , ते समजले नाही !
रामायणातच राम मांस खायचा असा उल्लेख आहे, तो फक्त योग्य आहे का नाही हि चर्चा चालु केली होती मी. त्यात माझ्या अक्कलेचा कुठलाही भाग मी घुसडलेला न्हवता ! त्यात दारु पिण्याचा उल्लेख असता तर आम्ही तो ही विषय चालु केला असता. उगाच चुकिचा समज करुन घेउ नये. नुसते विषय वाचुन मत देण्यापेक्षा पुर्ण विषय वाचुन मत द्यावे. आणी देव करतो ते सगळे बरोबर ? मग धर्माचा अवतार युधीष्ठीराने बायकोला पणाला लावले म्हणुन उद्या अजुन कोणी लावले तर त्याला माफ करायचे ? देवाधर्माच्या कल्पना आता बदलायला लागणार बुव्वा ! धोनीचे पण मंदीर बांधत आहेत आता =))
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
- Log in or register to post comments
फ
फकीरा
Sat, 12/27/2008 - 09:04
नवीन
krupaya gairsamaj karun ghevu naye.Maze evdhech mhanane aahe ki charcha aani vaad yaat farak aahe.
Vaad nirman hotil,konachi shradhasthane dukhavtil ase vishay talave.Te kaam rajkarnyanche aaple nahi.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 12/26/2008 - 14:09
नवीन
राम मांसाहारी असेल किंवा नसेल त्याने काय फरक पडतो.
आयुर्वेदात कोणत्या प्राण्याच्या/ पक्ष्याच्या मांसाचे आयुर्वेदीय उपयोग कायकाय आहेत याची सखोल चर्चा आहे.
प्राचीन काळी ऋषीमुनीना हे ज्ञान मांसभक्षण केल्यावरच प्राप्त झाले असेल ना?
यज्ञात बळी दिल्या पशुंचा उपयोग नन्तर खाण्यासाठीच होत असे.
एक गोष्ट आवर्जुन लक्षात येते की बहुसंख्य उच्चवर्गियांचे देव गणपती विष्णु याना शाकाहारी नैवेद्य लागतो तर बहुजन समाजाचे देव म्हसोबा भैरोबा खंडोबा म्हाळसाई मांढरदेवी काळूबाई याना मांसाहारी नैवेद्य लागतो.
रामायणातल्या एका गोष्टीचे मला नेहमी अश्चर्य वाटते की परशुरामाने पृथ्वी १९वेळा नि:क्षत्रीय केली होती. पहिल्यांदा नि:क्षत्रीय केल्याननतर क्षत्रीय परतपरत कसे निर्माण झाले
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
Fri, 12/26/2008 - 19:24
नवीन
परशुरामाने फक्त क्षत्रिय पुरुषांना मारले असावे. आणि त्यावेळी जर काही क्षत्रिय स्त्रिया गरोदर असतील, तर ती क्षत्रिय पोरे अर्थातच पुढच्या बॅचमधे परशुराम मारणार, नाही का?
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
Fri, 12/26/2008 - 19:48
नवीन
मग त्याच्या पुढच्या बॅचमधे क्षत्रिय कुठून आले?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
Fri, 12/26/2008 - 19:59
नवीन
ती सायक्लिक प्रोसेस आहे.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 12/26/2008 - 20:01
नवीन
अरे इनोबा,
असे बघ पहील्या बॅच मधले सगळे पुरुष (लहान मुले सोडून) समजा त्याने मारली. तर जी लहान मुले मोठी झाली त्यानी यथावकाश पुढची बॅच निर्माण केली असणार.
पुढची बॅच मोठी झाल्यावर त्याना मारले असेल पण तत्पूर्वी त्या पुढच्या बॅचने त्यापुढची बॅच निर्माण करण्याचे कार्य चालू केले नसेल कशावरून? :)
२१ वेळा नि:क्षत्रिय पृथ्वी म्हणजे वारंवार राजांशी युद्ध करून राजाला आणि त्याच्या सेनेला २१ वेळा पराभूत केले असेल. :)
पुण्याचे पेशवे
Since 1984
- Log in or register to post comments
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 01/02/2009 - 17:32
नवीन
पण त्यातून दरवेळी मी सहीसलामत निसटलो की नाही? हा: हा: हा:!
- झुरळ मारणारा क्षत्रिय.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Fri, 12/26/2008 - 22:21
नवीन
राम नावाचा राजा खरोखर अस्तित्त्वात होता असे सिद्ध करणारे काय पुरावे आहेत? नाणी, शिलालेख आहेत का? असल्यास कुठल्या काळात?
मला वाटते आज उपलब्ध असणारे पुरावे बघता रामायण हे एक काव्य आहे आणि राम हा त्याचा काल्पनिक नायक आहे.
काव्यात उल्लेखलेल्या जागा खर्या आहेत पण म्हणून सगळ्या व्यक्ती असतील असे नाही.
तेव्हा पुरावा मिळेपर्यन्त असे म्हणता येईल की राम हा काल्पनिकच होता.
एक काल्पनिक पात्र शाकाहारी होते का मान्साहारी ह्याचा वाद निरर्थक आहे.
- Log in or register to post comments
ग
गौरिसन्जय
Tue, 12/30/2008 - 17:59
नवीन
shri ram he aatmagyani hote...... evdech mala mahatvache vatate.... jyala he kalale--- "aatma-gyani" ya shabdacha aarth ---- tyala manat shri ramavishai shanka yenarch nahi... tyanche gyaan evade mothe aahe.. ki tyapudhe asha charcha karun vel phukatach ghalavala yachi prachiti yeiel. shri ram sakshat aatmagyani , maryada purushotam hote ... tyache vaganukiche aapan aacharan karu shakalo tar kharach janam phukat janar nahi. te vegi hote ki nahi yala kadiche mahatva rahanar nahi....
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 12/31/2008 - 07:12
नवीन
मला वाटते त्याप्रमाणे राम मान्साहारी होता की नाही या चर्चेचा हेतू श्रद्धास्थानान्ची बदनामी करणे हा नाही. राम मटण खात होता म्हणून आपण त्याला कमी लेखणार नाही. (मासाहारी शब्द नीट लिहिता आला नाही म्हणून मटण हा शब्द लिहीत आहे. जाणकारानी मार्गदर्शन करावे).
मुख्य हेतू हा हिन्दू धर्म हा सध्या आहे तसाच अनन्त काळापासून आहे ही समजूत खोडून काढणे हा आहे.
मी कलकत्त्याला असताना तेथे इस्कॉनचे एक उपहारग्रह (पुन्हा टायपिन्गची अडचण) होते. तेथे फक्त शाकाहारी जेवण मिळे. चौकशी केली तेव्हा भगवान की जगहमे नॉन व्हेज कैसे दे सकते है असे उत्तर मिळाले. तेव्हा माझ्याही मनात हाच विचार आला होता.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Wed, 12/31/2008 - 07:45
नवीन
आम्हाला ही सगळी चर्चा अगदी निरर्थक वाटते....
आम्ही स्वतः अट्ट्ल मांसाहारी आहोत...
श्रीरामांविषयी आम्हाला अत्यंत आदर आहे..
आता,
श्रीराम मांसाहारी होते?
आनंद आहे, आमच्यापैकीच होते....
श्रीराम मांसाहारी नव्हते?
अरेरे, जीवनातला एक अत्युकृष्ट आनंद ते अनुभवू शकले नाहीत...
श्रीराम मांसाहारी नसले तरी आमचा त्यांच्याविषयीचा आदर कमी होत नाही....
श्रीराम कितीही महान असले तरीही ते केवळ मांसाहारी नाहीत म्हणून आम्ही त्यांचा त्याबाबतीतला आदर्श आम्ही आचरणात आणू इच्छित नाही.....
कोणत्याही भूतकालीन व्यक्तीच्या आचरणापेक्षा आम्ही आमच्या अनुभवाला जास्त महत्व देतो....
जय श्रीराम!
:)
- Log in or register to post comments
ध
धम्मकलाडू
Wed, 12/31/2008 - 10:21
नवीन
म्हणजे काय? नक्कीच. अगदी गोमांसही खात असतील. थोडक्यात त्यांचा आहार अगदी वैदिक असेल. तसेही राजसी आहारात मटण, चिकन, मासे येऊ शकतात. फक्त तेलाऐवजी तूप वापरणे इष्ट. मात्र तिखट, मसाले अगदी माफक प्रमाणात असायला हवे. मंडळी, प्रत्यक्ष सीतामाईने बनविलेल्या पाककृत्या इथे कुणाला देता आल्या तर किती उत्तम होईल! अहाहा!!!
(मटणमार्तंड) धम्मकलाडू
|| राम रमेशं भजे ||
ज्याला भजी आवडत नाही तो खरा रामभक्त असूच शकत नाही.
- Log in or register to post comments
स
सुन्या कोकणी
Fri, 01/02/2009 - 13:35
नवीन
अरे रामाचो मांसाहार सोडा
येकदा आमच्या कोकणांतला माशांचा तिकला खावन बघा.
सगलो मांसाहार इसारतलाय...
.......सुन्या कोकणी
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 01/02/2009 - 18:20
नवीन
भारतीयांना मिरचीचा शोध पोर्तुगीझांनी १६व्या शतकात लावून दिला. तत्पूर्वी भारतीय पदार्थ तिखट करण्यासाठी काय वापरीत असावेत? मिरी/ लवंग?
(मासांहारी पदार्थ हे सहसा तिखट स्वरूपात अधिक रुचकर लागतात )
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Sat, 01/03/2009 - 12:53
नवीन
पोर्तुगीजांनी मिरचीची ओळख करून दिली तसाच बटाटा ही त्याच सुमारास माहित झाला. त्यापूर्वी उपासाला काय खात असावेत?
- Log in or register to post comments
च
चिगो
Fri, 02/10/2012 - 10:37
नवीन
काय राव? काळी मिरी (ब्लॅक पेपर) वापरत असतील.. तसाही भारत देश आणि दक्षिण-पुर्व आशिया मसाल्याच्या व्यापारासाठीच प्रसिद्ध होता तेव्हा..
- Log in or register to post comments
ग
गौरिसन्जय
Fri, 01/02/2009 - 19:57
नवीन
khare aahe Iscoon mandiratil sevekaaryanche. non-veg he panchendriya (5 sence)madhe modate aani vegetables he eekendirya(one sence)madhe modate . chicken etc nonveg food manjhe jiva-la marun , hatya karun , dukha devun aapan swatasathi sukhachi aapekshya kashi karu shakato.... aani aatma sukh kase milauu shaakato? dusaryala kuthalyahi nimitane dukh deuun aapan swatasathi sukh nahi milauu shakat mang te kunache maan dukhavne aasoo...va pashu hatya karun sugraas non-veg dish karun khane aasoo... chicken ,fish madhe pan tocha aatmaram vas ato jo tumachya aamchya, chara-charat vaas karato....
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Sat, 01/03/2009 - 13:00
नवीन
अहो गौरिसन्जय, तुम्ही विन्ग्रजी लिपीतून का लिहिता? वाचायला वेळ लागतो. आणि मुद्दा पटकन लक्षात येत नाही.
मांसाहार करून आमच्या शरीराला आनन्द मिळतो, आत्म्याला नव्हे. आणि बोकडाच्या शरीराला मारतो आत्म्याला नाही (नैनं छिन्दन्ति शस्त्राणि असे गीतेतच नाही का सान्गितलेले?)
- Log in or register to post comments
ग
गौरिसन्जय
Sun, 01/04/2009 - 09:50
नवीन
Because of presence of aatma , we all r alive. pan mala saanga jar tumachya mulala koni marun khalle tar tumhala aanand hoyel ki dukh hoye? ...............te chicken or goat is also baby of someone.. so it will charge u paap karama..... kalale ka aaplyala?
to type in marathi , it takes so much time(as i am not so good for type in marathi) and i do't have much time in my hand.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sun, 01/04/2009 - 11:46
नवीन
पण जीव तर पान, फुले, झाडे, तृणधान्ये, फळे, भाज्या ह्यांमध्ये सुद्धा असतोच की मग त्यांना खाल्याने पाप लागत नाही ?? फळे, भाज्या हे झाडाचे अवयव काढुन घेतल्याने त्याला दु:ख , वेदना होत नसतील ? त्यानी पाप लागत नसेल ?
शाकाहारी शंकासुर
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Sun, 01/04/2009 - 17:41
नवीन
इस्कॉनचे उदाहरण क्षत्रिय देवाचे सुद्धा ब्राह्मणीकरन कसे होते हे दाखवण्यासाठी लिहिले होते.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Sun, 01/04/2009 - 11:15
नवीन
किती सुरेख विष्लेशन केले आहात गौरीसंजय तुम्ही.अजुन एक शंका ह्या जन्मी केलेले पाप किती झाले आहे हे आपल्याला कसे कळेल?ते कमी करता येईल काय? चिकन,मटण व मासे ह्यामधले काय ज्यादा पापी आहे.म्हणजे खाल्ले की पाप ज्यादा लागते.
वेताळ
- Log in or register to post comments
ग
गौरिसन्जय
Mon, 01/05/2009 - 14:32
नवीन
जीव तर पान, फुले, झाडे, तृणधान्ये, फळे, भाज्या ह्यांमध्ये सुद्धा असतोच की मग त्यांना खाल्याने पाप लागत नाही ?? फळे, भाज्या हे झाडाचे अवयव काढुन घेतल्याने त्याला दु:ख , वेदना होत नसतील ? त्यानी पाप लागत नसेल ?
खरे आहे तुमचे . पा प तर लागते. पन तुमिच सागा कि, आप् न plastic, rubber, iron , steel जिवन्त राहण्यासाथि खाउ शकतो का? नक्किच नाहि. आपन सजिव आहोत आनि मनुन आपन निर्जिव पदार्थ खाउ शकत नाहि. it is neccesity to eat vegetables , fruits etc to stay alive. फळे , भाजिपाला हे सर्वे एकेन्दिर्य आहेत. They are not develope as human beings or animals (body, speech, intellectual, chit and egoisum). but animala and human being have one common thing is पन्चेन्द्रिय (body, speech, intellectual, chit and egoisum).
and one thing when we eat vegetables it is our ncecessity to stay alive.
but when we eat goat, chicken etc nov-veg . food it only for pleaure . we have another option with our hand to eat vege food but still we intentionlly kill animals and cook it with intention to get pleasure of eating non -vegetraian food. so it will charge u definetly a big sin (paap karama ) for next life.............i
अजुन एक शंका ह्या जन्मी केलेले पाप किती झाले आहे हे आपल्याला कसे कळेल?ते कमी करता येईल काय? चिकन,मटण व मासे ह्यामधले काय ज्यादा पापी आहे.म्हणजे खाल्ले की पाप ज्यादा लागते.
yes !
everything which we are enjoying or suffering is all becacause of all karma we charged in our last birth. this birth is discharge of our last charge karmas. आपण प्र् ति क्रमन करुन नक्किच सुटु शक्तो.. .
u want more information.... u please go on this site.... u will find !! रिअल truth about your self.!! and all answers for ur qurries......
www.dadabhagawan.org
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Mon, 01/05/2009 - 15:23
नवीन
मराठीतून लिहायचा प्रयत्न केल्याबद्दल अभिनंदन. चालू ठेवा.
बोकड किंवा कोंबडी खातो ते मजा म्हणून हे मात्र मान्य नाही. अनेक दुर्गम भागात गरज म्हणूनच मांसाहार करावा लागतो.
असो. चर्चेचा विषय राम मांसाहारी होता की नाही हा आहे.
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Fri, 02/10/2012 - 14:13
नवीन
"it is neccesity to eat vegetables , fruits etc to stay alive. फळे , भाजिपाला हे सर्वे एकेन्दिर्य आहेत. They are not develope as human beings or animals (body, speech, intellectual, chit and egoisum)."
अहो, बोकड आणि मणुस तरी कुथे सारखे डेव्हलप होतात? आनी फळे भजीपाला एकेन्द्रीय असतात, हे कोणी सांगीतल तुम्हांला?
- Log in or register to post comments
व
वेताळ
Mon, 01/05/2009 - 18:31
नवीन
पण खुपच त्रोटक माहिती आहे. कर्मयोग व कर्मकांडे ह्याची गल्लत करु नये असे मला वाटते.काय खावे ,काय प्यावे ,कशी कपडे घालावी इत्यादी व्यक्तिगत गोष्टीत धर्माने लक्ष घालावे हे पटत नाही.समाजात वावरताना आपल्या वर्तुणुकीचा दुसर्याला त्रास होऊ नये हे पहाणे खुप गरजेचे आहे.निदान माणसानी माणसांसारखे वागावे ही अपेक्षा ठिक आहे.
आपल्या धर्मात नित्य कोणी मासांहार करत नाही.कधीतरी बदल म्हणुन तो केला जातो. म्हणुन मासांहार करणारे पापी व न करणारे पुण्यवान अशी पाप,पुण्याची गणती करता येणार नाही.दुध व दह्यात देखिल असे किती तरी जिवाणु असतात ,ज्याचे आपण भक्षण केल्यानंतर हत्या होत असते.मग हे पापकृत्य एक बोकड मारण्यापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे.
अजुन एक शंका आहे ती म्हणजे पृथ्वीवर देवाने जे काही अवतार घेतले आहेत ते कुणा ना कुणा पापीला मारण्यासाठीच घेतले आहेत. मग ती देखिल एकप्रकारची हत्याकांडेच आहे ना? कारण पाप केले की त्याची शिक्षा तुम्हाला नरकात मिळणारच असते,मग त्याची हत्या इथे पृथ्वीवर करण्यामागचे कारण काय आहे? अजुन एक कल्पना आहे की जे कोणी ह्या जन्मी पाप करतात त्याना दुसरा जन्म प्राण्याचा मिळतो. म्हणजे ते एकप्रकारचे पुर्वजन्मी पापीच होते त्याची ह्या जन्मी मांसासाठी हत्या केली जाते , मग ही हत्या पाप का समजले जाते.अशा खुप बाष्कळ कल्पना आहेत. अशाच कर्मकांडामुळे पहिलेच हिंदुधर्माची खुप हानी झाली आहे.आपल्या फायद्यासाठी कोणत्या ना कोणत्या गोष्टीला पाप,पुण्य ठरवणे बंद करा.जीवन जगताना अशा पापपुण्याच्या कल्पना केल्या तर जीवन जगणे मुश्किल होवुन जाईल.
वेताळ
- Log in or register to post comments
ग
गौरिसन्जय
Mon, 01/05/2009 - 19:15
नवीन
अर्जुनाने पन युध्ध केले पन तो मोक्शा ला गेला. कर्म करत अस्ताना अकर्म दशेने केले तर मोक्श मिळ्तो. एवदेच इथे मी सागु शकते. कर्मकांड आनि
आत्म् ग्यान यात खुप फरक आहे. तुम्हि जे कहि लिहिले आहे ते ते तुमच्या view point -ne बरोबर आहे. पन जर खरे-खुरे उत्तर हवे आहे तर ते तुम्हाला आत्म-ग्यनिच देऊ शक्तात.
so i have humble request u to go on site for qurisity.............www.dadabhagawan.org i am sure that ur all answer will in ur hand. i can tell this much only after our disscussion. thank u all for ur opinions. !! jai satchitaanad.!!
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Fri, 02/10/2012 - 14:17
नवीन
अहो , आताशी तर चर्चा तापयला लागलीय, लगेच जै सछिदनन्द नका करु..
- Log in or register to post comments
व
विकि
Mon, 01/05/2009 - 19:47
नवीन
राम मांसाहारी की शाकाहारी या विषयावरील वाद वाचायला मजा आली. आपण फुलटू खुष झालो.
- Log in or register to post comments
ग
गौरिसन्जय
Tue, 01/06/2009 - 16:29
नवीन
http://www.dadabhagwan.org/ आभरि आहे. व्यवस्थित आहे. उत्तरे मिळ् तिल. नक्किच. ..........
- Log in or register to post comments
अ
अन्नू
Wed, 02/08/2012 - 17:17
नवीन
रामाच्या आहाराविषयीच्या जागृत चर्चा पाहून डॉले पानावले!
बाकी सिता माईच्या रेसिपिज रामायण ग्रंथात आहेत का?
तसे वाल्मिकी हे त्या काळचे फेमस साईटर होते त्यांनी नक्कीच त्यांच्या नॉवेलमध्ये या रेसिपिज दिल्या असल्या पाहीजेत.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2