जे न देखे रवी...

नसूनी तयात

Primary tabs

भिती वाटता जीव काहूर राही
न जाणे कसे काय होणार काही
विचारात गुंतून डोके सदाही
उरी दाटता भाव आभास पाही

खरे काय ते की मनाचाच कावा
कुणी ओळखावे कसे सांग देवा
जिवाचा मुठीतून आकांत धावा
धगत्या मनाला कसे शांत ठेवा

भिताना मनाची मनालाच याही
हताश क्षणाची असे होत लाही
रडूनी नसे साध्य इच्छाच काही
मनी आसवांना जगी अंत नाही

दिसे स्वर्ग बाहेर पाताळ आत
अडोसाच नाही उभा वादळात
निमूट स्वतः पाहिले मी मनात
दिसूनी मला मी नसूनी तयात

रोहन जगताप

मनःपूर्वक आभार. हो, अगदी बरोबर. कविता भुजंगप्रयात वृत्तात आहे.

चित्रगुप्त

भुजंगप्रयातातली वृत्तबद्ध कविता आवडली.
(रच्याकने, 'तेरे प्यार का आसरा चाहता हूं ... वफा कर रहा हूं वफा कर रहा हूं' हे जुने गाणेही याच वृत्तात आहे. म्हणून बघा).

रोहन जगताप

आपण वृत्त ओळखले आणि आपल्याला कविता आवडली हे वाचून चांगले वाटले. आभारी आहे.