जे न देखे रवी...
इलेक्शनी चारोळ्या
Primary tabs
(१)
समुंदर हूं मैं
लौटकर आऊंगा.
त्सुनामी आली
वाहून गेले त्यांचे
स्वप्नांचे मनोरे.
(२)
चित भी मेरी
पट भी मेरी
सरडे माझे
सारे जिंकले.
(३)
शेअर बाजाराचा फंडा
त्याला कळलाच नाही.
शॉर्ट टर्म गेन साठी
लाँग टर्म तोटा केला.
अरे आता तरी गप्प बस
झाला तुझा शि शू पाल
वाट लावली मालकाची
आता तरी तोंडाला कुलूप घाल
जानवसा सजला, वऱ्हाडी जमलं
एका नवरी साठी तिन,तिन नवरं
कधीचा म्होतूर, भटांची एकच घाई
बाशिंग कोण बांधणार पत्त्याच नाही
केली धूळफेक
करुनी ईव्हीएम सेट
दाखवली लाडकी बहीण
नतमत्सक गुजरातचरणी थेट.
काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष जिंकले की, EVM घोटाळा नसतो....
बाय द वे,
चीनच्या आणि सोरोसच्या, हातातील कठपुतळी होण्यापेक्षा, भारतातला पैसा भारतात राहणे उत्तम.
....राष्ट्र प्रथम...
मनोरंजक प्रतिसाद.
हे तुम्हीच कबूल केलेत ते उत्तम.
प्रगती आहे.
अशीच तुमची उत्तम प्रगती होत राहो....
मनोरंजक प्रतिसाद.
पालथ्या घड्यावर पाणी.....
तुमचे, हे असे इतरांच्या ओंजळीने पाणी पिणे किती दिवस चालणार आहे?
वाटूनी खोके
फोडली सेना
आता महाराष्ट्रा
गुजरातशी लढ म्हणा.
कधीच शिव्या भैय्यांना
कधी शिव्या अण्णांना
कधी शिव्या गुज्जुंना
मतदाराचे मन मात्र
आम्हा कळत नाही.
ईव्हीएम वर खापर फोडून
आम्ही स्यापा करतो.
* स्यापा = रडगाणे
हरलो तर EVM घोटाळा आणि जिंकलो तर जनादेश.
.....डब्बल ढोलकी...
मनोरंजक प्रतिसाद.
अहो,
तुमचेच तर म्हणणे आहे की EVM चा घोटाळा.
पण ....
हा घोटाळा फक्त महाराष्ट्र राज्या पुरताच की इतर पण सगळ्या राज्यात?
ई.व्हि.एम मध्ये घोटाळा
हे ऐकुन आला कंटाळा
आता रोज सकाळी नउ वाजता 'मुंबई महाराष्ट्रापासुन तोडण्याचा डाव'
दमलेली तुतारी म्हणाली-भूक लागली, खाउन घ्या वडापाव
लोकसभेत जिंकले
बेडकीगत फुगले
लाडक्या बहिणीने
टाच ठेवली
बाहेरचे सारे
घरामंदी आले
घर घरापरी
वाटेचना
सगळे फिरले
दादा मात्र तिथेच
गाडीभर पुरावे
कचऱ्यात गेले