जे न देखे रवी...

वाहुनी तू रहावे

Primary tabs

नसे सोय बोलून सत्यात काही
जगाला हवे ते असत्यात राही
उगा मौन राखून विश्वा पहावे
वहात्या जगा वाहुनी तू रहावे

घळे आसवांतून पाषाण लेणी
मुकी साचताना उरी दैव देणी
अबोलाच बोलून गाईल गाणी
स्थितप्रज्ञ राहूनही काळ वाणी

झरे ज्ञान मर्मातले होत ओळी
जरी सांडले वेचले घेत झोळी
शिदोरीच वाटेत ही चालवावी
उपाशी जिवा तेवढी चाखवावी

निसर्गास वाटेल जेही मनाशी
अनाहूत साकार होई जगाशी
जुळल्यास योग कृतीही करावी
नसे अन्यथा शांतता बाळगावी

रोहन जगताप

आपल्या बहुमोल प्रतिक्रियेसाठी अगदी मनःपूर्वक आभार!

चौथा कोनाडा

छान रचना.... आवडली !

निसर्गास वाटेल जेही मनाशी
अनाहूत साकार होई जगाशी
जुळल्यास योग कृतीही करावी
नसे अन्यथा शांतता बाळगावी

शेवटी हेच खरं ... नशिबात असेल तर आख्खी कायनात एकत्र येऊन तुम्हाला मिळेलच याची खात्री करते...
नायतं .. शांत रहायचं