जे न देखे रवी...

शब्दांचा अचपळ पारा

Primary tabs

कवितेच्या वाटेवरती
कधी झुलतो मोरपिसारा
मोहवितो पांथस्थांच्या
पाणवल्या, दिपल्या नजरा

कवितेच्या वाटेवरती
कधी विफल, विरागी राख
दडलेले त्यात कधीचे
धुमसते निखारे कैक

कवितेच्या वाटेवरती
अर्थाचा वर्ख निखळतो
शब्दांचा अचपळ पारा
वाटेवर विखरुनी जातो

अर्थाचा वर्ख निखळतो

अर्थाचा वर्ख निखळूच शकत नाही. दॅट्स द होल पॉइंट.

शब्द आणि अर्थ इतके संपृक्त आहेत , त्यांना वेगळं करताच येत नाही.

असो.

लिहित रहा.

मनिष

हे खास आवडलं...

कवितेच्या वाटेवरती
कधी विफल, विरागी राख
दडलेले त्यात कधीचे
धुमसते निखारे कैक