जे न देखे रवी...

लाडकी झाली दोडकी...

Primary tabs

लागली कडकी,
घटली लाडकी ।।

9 लाख अपात्री,
135 कोटी/महिना
खर्चाला कात्री ।।

लाडकी बहिणीमुळे जिंकले,
आता माशी शिंकली ।।
चारचाकी नाहीना,
कितीउत्पन्न महिना ?।

आला 'त्यांचा ' आदेश,
आता तपासा निकष ।।
गरजू बहिणी राहूद्या
अपात्र बहिणी जाऊद्या ।।
म्हणे वेळ कमी होता,
ना केलाआधार लिंक कोटा ।।

9 लाख मोठा आकडा,
विरोधकांचा लावला
निकाल वेडा वाकडा ।।

नाना,दादा,भाऊ ची चलाखी,
विरोधकांची केली हलाखी ।।

आता गरज सरो,
लाडकी मरो ।।