जे न देखे रवी...

रात्रंदिन आम्हां ट्रॅफिकचा प्रसंग |

Primary tabs

संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची क्षमा मागून.

रात्रंदिन आम्हां ट्रॅफिकचा प्रसंग |
हॉर्नचे आवाज आणि धूर ||१||
"रोड रेज" चे जीवा होतसे आघात |
तरी दामटतो आपुले वाहन नित्य ||२||
मी म्हणे ह्या प्रदूषणाचिया बळे |
अवघ्यांचे काळें केले तोंड ||३||