जे न देखे रवी...
त्रिमितीच्या तुरुंगात
Primary tabs
त्रिमितीच्या तुरुंगात
घुसमटे जीव ज्यांचा
उघडीन त्यांच्यासाठी
मार्ग चवथ्या मितीचा
कळसा नंतर पाया
तिथे नियम असतो
कार्यकारण भावाचा
जाच जराही नसतो
स्थळ-काळात तिथल्या
पेव खाच खळग्यांचे
उतरवी वर्तमान
भूत वेडे भविष्याचे
दोर परतीचे मात्र
नाही कापणार नक्की
आपापल्या कोठडीची
खूण ध्यानी ठेवा पक्की :)
शेवटची दोन कडवी समजली,आणी आवडली सुद्धा. पण बाकी कवीता समजली नाही.
श्रीधर फडके यांनी ग्रेसांच्या कवितेला चाल देण्याचा प्रयत्न केला.पण पुढील कडवी समजली नाहीत. ग्रेसांचा व त्यांचा परिचय नव्हता म्हणून ते सुधीर मोघ्यांकडे गेले. त्यांनी सोपे करून दाखवले.
https://youtu.be/Ikx26HFj_SM?si=sdn-l2uFSf7haigV
अगदी तसेच माझे झाले म्हणून तुम्हीच उलगडून सांगा म्हणजे कवीतेचा अस्वाद घेता येईल.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
हे मुक्तक लिहिताना wormholes in space-time हा विषय डोक्यात होता. ह्या संकल्पनेचे सुलभ मराठीत स्पष्टिकरण मी देऊ शकत नाही पण:
Many physicists postulate that wormholes are merely projections of a fourth spatial dimension.
Also,
Wormholes have the theoretical potential to disrupt causality, meaning the natural order of cause and effect could be violated.
कवितेची संकल्पना,पार्श्वभूमी समजून सांगीतल्यावर कवितेचे मर्म कळाले. सुंदर.
आवडली.