जे न देखे रवी...
जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..
Primary tabs
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे.
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे
जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे
कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला
अवघडावे असे लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.
दोन घोट कोणत्या पेयाचे घ्यायचे चहा की काफी हे स्पष्ट केलेले नाही.
कधी कधी प्रज्ञेची तर्री कमी पडते,मग
कवीतेची रेसिपी विचारावी लागते......
आपल्या कवितेची पेरणा सांगताना आवघड वाटत असेल तर नका सांगू...
बादवे,आवडली.
:) _/\_
द्रव झाला महाग असा ... मोजावे द्रव्य किती, किती
न परवडती प्याले.... फकस्त दोन घोट घेऊन लिहावे
द्रव झाला महाग असा,मोजावे द्रव्य किती, किती
फकस्त दोन घोट घेऊन कसे लिहावे, किती किती
न परवडती प्याले,चकणाही महाग झाला
दोस्तांसवे मयखाने शोधावे किती किती
हा .... हा .... हा .... !
किती भावस्पर्शी ओळ !
:)) __/\__
"न परवडती प्याले,चकणाही महाग झाला" - डोळ्यांत टच्चकन पाणी आले व हृदय गलबलले.
वाह छान.
बादवे..
भूछत्री आली पण कोडाई कॅनाल आणि गरम पाण्याचे कुंड राहिले वाटते.
आम्ही आपले भूछत्री आणि जिलबी वाले. इतरांचे कोडाई कॅनाल पाट वहात आहेत आणि गरम पाण्याचे कुंड वाफा सोडत आहेतच त्याच्या दमटपणात आपली भूछत्री कधी कधी जन्मास घेते :)