जे न देखे रवी...

फाया

Primary tabs

"कृबु (*)व्यापित या जगी अता तुज स्थान काय उरते ?
मनात येता क्षणार्धात मग इच्छित अवतरते !
काव्य, नाट्य, शिल्पे, चित्रे अन् जटिल अधिक काही
गरज तुझी यासाठी कशाला? कृबुच सर्व देई !"

कठोर शब्दे मानवी प्रतिभा दुःखमग्न झाली
नवक्षितिजांना ओलांडुन कृबु पार पुढे गेली
हताश होत्साती प्रतिभा क्षण-भर निष्प्रभ झाली
पुन्हा सावरून मनात काही जुळवून मग वदली,

"कृबुवरती स्तुतिसुमने उधळीत होऊ नको दंग
कारण विरहित कार्य कधीतरी असते का सांग ?
असेन कायम मीच मानवी सृजनाचा पाया
नसेल माझे अत्तर तर कृबु कोरडाच फाया :)"

~~~~~~~~~~~~~~~~~~
(*) कृत्रिम बुद्धिमत्ता
फाया: अत्तर लावण्यासाठी वापरला जाणारा कापसाचा बोळा

असेन कायम मीच मानवी सृजनाचा पाया
नसेल माझे अत्तर तर कृबु कोरडाच फाया :)"

मिपावर आणी अन्यत्र कृबु ची च जयजयकार होताना सध्या तरी दिसते.

संकल्पना आवडली.