जे न देखे रवी...
बखरीच्या पानाआड
Primary tabs
बखरीच्या पानाआड
पाहिले मी क्षणभर
दडपल्या वास्तवाचे
छिन्नभिन्न कलेवर
प्रचलित इतिहास
तुझ्या माझ्या मेंदूतून
अज्ञाताच्या शक्यतांना
टाके पुरता पुसून
जेत्यांचाच इतिहास
रुळे मग माझ्या मुखी
पराजितांचा ठरतो
इतिहास अनोळखी
बखरीच्या पानाआड
वास्तवाचा भग्न गड
त्याच्या झाकल्या गूढाचे
कसे सरावे गारूड?
कविता आवडली.
कवीता आवडली.
मस्त
गहन आशयाची साध्या सोप्या शब्दातली मांडणी आवडली.
जेत्यांचाच इतिहास
रुळे मग माझ्या मुखी
पराजितांचा ठरतो
इतिहास अनोळखी
++ हेच रामायण- महाभारत - ग्रीक - रोमन- चिनी - इजिप्शियन - पासूनच्या सगळ्या 'इतिहासा'चे वास्तव.
बखरीच्या पानाआड
वास्तवाचा भग्न गड
त्याच्या झाकल्या गूढाचे
कसे सरावे गारूड?
या ओळी खासच. सत्य फार 'महाग' असते, किंमत दिल्याशिवाय गवसत नाही.
सुंदर कविता...'छिन्नभिन्न कलेवर' हा शब्द खूप आवडला यातील.