जे न देखे रवी...

कवितेच्या गणिताची कविता + - x ÷

Primary tabs

कविता-रतीचे | विभ्रम अनंत
तयांचे गणित | कैसे करू?

तरीही करितो | वेडे हे धाडस
माझ्या अक्षरांस | हासू नये :)
~~~~~~~~~~~
कधी बेरीज बेचैनीची
कधी वास्तव वजावटीस
कधी गुणाकार गहनाचा
कधी भागे कवी शून्यास

कवितेचे गणित कसे हे
उत्तर ना त्याचे कळते
ओळींच्या मधली जागा
गणिताला डिवचून जाते

गणिताच्या मर्यादांचा
ज्या कुणी(@) लाविला शोध
तो कवी नसावा हृदयी
याचा नच उरतो खेद

~~~~~~~~~~~
@ Kurt Gödel is well-known for his incompleteness theorems, which showed inherent limitations of formal mathematical systems.

स्वधर्म

विनंतीस मान देऊन तुंम्ही कविता लिहिली. कसं जमतं बुवा?

कधी बेरीज बेचैनीची
कधी वास्तव वजावटीस
कधी गुणाकार गहनाचा
कधी भागे कवी शून्यास
हे खासच...