काथ्याकूट

सध्या काय पाहता?(२०२५)

Primary tabs

जसं जमेल तसं सांगत राहूया..सध्या काय पाहतो..
K-POP demon hunter
1
खर म्हणजे तिच्या बरोबर कूंफू पांडा बघायला खूप धमाल येते.तिचं ते सात मजली , खळखळून हसणं मी सुखाने पाहत राहते.लेट ईट गो असं लहानपणी ती मनापासून गाताना आनंदून जायचे.उशीच्या खोळीपासून शाळेच्या कंपास, पर्यंत सगळीकडे फ्रोजनचे एल्सा,ॲना,ओलेफ दिसू लागले.डिस्नेच्या प्रिन्सेस तिच्या बोलण्यातून तीच्या मैत्रीणी भासतात.
के फॉर काईट शिकवण्याच्या पुढे जाऊन जनरेशन अल्फा असलेल्या माझ्या लेकीने मला के फॉर के-पॉप डेमॉन हंटर(K-POP demon hunter )शिकवलं.
के पॉप म्हणजे कोरियन पॉप.आजच्या घडीला BTS,Blackpink,Blackswan यांच्या संगीताने,चमकदार व्हिडिओने भुरळ घातली आहे.
खरंच #kpopdemonhunters हा ॲनिमेशन सिनेमा खूप सुंदर आहे.
रूमी, मुख्य पात्र, K-pop आयडॉल आणि राक्षस शिकारी अशा दुहेरी भूमिकांमधून स्वतःची खरी ओळख शोधते. हे अस्तित्ववादाशी निगडित आहे, जिथे व्यक्ती स्वतःच्या उद्देशाला अर्थ देते. रूमीचा अंतर्मनातील संघर्ष आणि "What It Sounds Like" गाण्यातील भावनिक प्रवास आत्म-प्रतिबिंब आणि स्वीकार हे दिसते.
या सिनेमातलं गोल्डन,सोडा पॉप,टेक अवे ही गाणी भन्नाट आहेत.लहान मुलांना ज्या वयात अनेक न्यूनगंड जडतात .तिथे हा सिनेमा केवळ मनोरंजनच नाही तर स्वतः वर प्रेम करायला खूप मदत करतो.

जुइ

हा चित्रपट लेकीसोबत पाहायचा आहे. या चित्रपटातील गोल्डन गाण्याचे तिच्याकडून बरेच कौतुक ऐकले आहे. मध्यंतरी तेहरान नावाचा जॉन अब्राहमचा चित्रपट पाहिला, तो मात्र विषेश रूचला नाही.

Bhakti

गोल्डन .. अप्रतिम आहे.

जुइ

वेडनेस्डेचा दुसरा सिझन पाहिला. ओके आहे, जेवढी हवा पहिल्या सिझन अन त्यातील लेडी गागाने गायलेल्या गीताने केली होती त्यामानाने दुसरा अगदीच ठिकठाक आहे.

इतक्यात काही मराठी चित्रपट शोधून ते पहिले.
अनवट, ७ रोशन वीला, गैर, विकी वेलिंगकर (हा निव्वळ टीपी, पण तरी आवडला)

Bhakti

'दशावतार' मराठी सिनेमाची वाट पाहतेय.

+१ पुढच्या वीकेंडला जाण्याचा प्लॅन आहे, त्याआधी कोणी पाहिला तर कसा वाटला ते नक्की सांगा.

Bhakti

मी आज जाणार आहे, सांगते कसा आहे ते .

Bhakti

वय वर्षे ८१ तरीही जेव्हा निळसर पाण्यात मत्स्य अवताराची निरसळ रंगभुषा घेऊन दिलीप प्रभावळकर ट्रेलरमध्ये पाहिले. तेव्हा हा कलाकार काळाची लीला सहज पार करू शकतो हे जाणवले.
दशावतार कोकणची लोककला मान ,कोकणी कलाकारांची ओळख आहे.हे सूत्र धरूनच एक सच्चा दशावतारी कलाकाराच्या विविधांगी रूपातून कोकणची सध्याची दुखरी नसही दाखवली आहे...खाणकाम!
निसर्गाचे वरदान देवराई ची छाया,राखणदाराची माया हळूहळू आधुनिकरणाच्या कचाट्यामुळे लोप जाईल का?हा सुन्न करणारा प्रश्न भेडसावत राहतोच आहे.
सिनेमा अस्सल कोकणी आहे.तिथली साधी माणसं लक्षात राहतात.सिद्धार्थ मेनन आणि दिलीप प्रभावळकर यांच्या बापलेकाचे नाते खुप सुंदर भावूक करणारे दाखवले आहे.
पण पुढे अनेक थरारक घटनांमध्ये दिलीप प्रभावळकर यांच्या असंख्य विविधांगी फ्रेम नजर खिळवून ठेवतात.
भरपूर प्रीडेक्टेबल कथानक असले तरी त्याला दशावतारची जोड आणि कोकणच्या निसर्गाचा प्रश्न‌ यात हाताळण्याचा छान प्रयोग झाला आहे.अजय गोगावले यांच्या आवाजातील भैरवी गीत रंगपूजा गीत विशेष श्रवणीय आहे.
चांगला मराठी सिनेमा आपणच पुढे न्यायला हवा,पाहायला हवा.

बाकी ललित प्रभाकरचाही 'आरपार' हा सिनेमा रिलीज झाला आहे.त्याचा चि.सौ.का.१२३४५६७८ वेळा पाहिला आहे,मला फार आवडतो ललित :) आरपार मध्ये ह्रता दुर्गुळेही आहे.पण थिएटरमध्ये जाऊन रोमॅंटिक सिनेमा पाहायचं माझं वय राहिलं नाही (हा हा).
अजूनही कुर्ला टू वेंगुर्ले हाही कोकण पर्याटनाची कथा असणारा छान सिनेमा आलाय.

Bhakti

*(चि.व.चि.सौ.कां)

धन्यवाद @भक्ती :)
दिलीप प्रभावळकर यांच्यासाठीच पाहायचा आहे हा सिनेमा. शालेय वयात त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला होता, तेव्हापासून या वरून साध्या पण अस्सल कलाकार माणसाची मी फ्यान आहे.
त्याचा चि.सौ.का.१२३४५६७८ वेळा पाहिला आहे,मला फार आवडतो ललित :) आरपार मध्ये ह्रता दुर्गुळेही आहे.पण थिएटरमध्ये जाऊन रोमॅंटिक सिनेमा पाहायचं माझं वय राहिलं नाही (हा हा).
सेम सेम :) जाऊदेत वय नाही पण मन तर आहे ना ;)

कॉमी

नुकताच ब्लेड रनर पाहिला.
आवडला.

Bhakti

साय -फाय नक्की पाहणार.

स्वधर्म

लाय टू मी ही अमेरिकन वेब सिरीज अ‍ॅमेझॉनवर पहात आहे. खोटे बोलणे ओळखण्याचे कौशल्य वापरून संशयितांमधून नेमका अपराधी शोधणे अशा वेगवेगळ्या कथांची थ्रिलर मालिका. सुरूवात तरी चांगली वाटत आहे.

लाय टू मी चे किती सिझन्स आहेत? माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे एकाच सिझन नन्तर ती मालिका बन्द झाली होती. सन्ग्णकावर पहिला सिझन बघितला होता कधिकाळी.

जुइ

The Thursday murder club हा जेष्ठ कलाकारांना घेऊन तयार केलेला सिनेमा रंजक आहे, आवडला!

कंजूस

एक कोरियन चानेल होता त्यात खूप वेगवेगळे कार्यक्रम असत. कोरियन हेल्थ, व्यायाम, बालकथा, सायन्स, पॉप किंवा इतर संगीत आणि मालिकासुद्धा असायच्या. आता ते सर्व काढून फक्त मालिका ठेवल्या आहेत.

Bhakti

"गोल्डा" या युद्धातील गोल्डा मीर यांच्या नेतृत्वावर केंद्रित आहे. चित्रपटात दाखवले आहे की कशा प्रकारे गोल्डा मीर यांनी सुरुवातीच्या धक्क्यांनंतर इस्रायलला एकत्र आणले आणि अमेरिकेच्या मदतीने विजय मिळवला. हेलन मिरेन यांनी साकारलेली गोल्डा मीर यांची भूमिका युद्धातील नेतृत्व आणि दबावपूर्ण निर्णयांना ठळकपणे दाखवते.गोल्डा कर्करोगाशीही या काळात झुंज देत असते,खरोखर आयर्न लेडी होती.पण खुप संथ सिनेमा आहे.

मारवा

Better call Saul चा पहिला season संपवून दुसरा सुरू आहे.
अत्यंत उत्कृष्ठ सिरीज आतापर्यंत तरी
ब्रेकिंग bad मध्ये जेव्हा saul चे पात्र बघितलेले होते तेव्हाच तो मनात रुतलेला होता. आता संपूर्ण series नेमक्या आपल्या आवडत्या पत्रावर बेतलेली म्हटल्यावर मोठा आनंद झाला.
मानवी भावनांचा खोलवर वेध, उत्कृष्ठ निर्मिती मूल्ये, सर्व कलाकारांचा लाजवाब अभिनय. किती तरी बाबी
सर्वात महत्त्वाचे script आणि फिलॉसॉफिकल स्टाईल फारच आवडली.
आणि किती ती वैविध्यपूर्ण महाभारत style पात्रे.
खूप आवडण्यात आलेली आहे.
ब्रेकिंग बॅड चे आणि vince gilligan चे फॅन असाल तर बेटर कॉल सॉल निव्वळ मेजवानी आहे

श्वेता२४

घरात गणपती- या चित्रपटाबद्दल फारसे कुठे ऐकले नव्हते तरी पण हा चित्रपट अगदीच पाहण्यासारखा आहे. ज्यांना कौटुंबिक चित्रपट आवडतात त्यांनी जरूर हा चित्रपट पहावा . मला आवडला .
जारण - या चित्रपटाबद्दल बरेच बोलले लिहिले गेले आहे. अभिनयाच्या दृष्टीने हा चित्रपट आवडला. पण कथा थोडी कमकुवत वाटली. प्रेडिक्टेबल वाटला.
कुबेरा- हा साउथ इंडियन मूवी आवडला. बऱ्याच दिवसांनी टिपिकल एंटरटेनिंग चित्रपट पाहायला मिळाला.

चौथा कोनाडा

घरात गणपती- या चित्रपटाबद्दल फारसे कुठे ऐकले नव्हते तरी पण हा चित्रपट अगदीच पाहण्यासारखा आहे.

घरत गणपती :} मी पण सुरुवातीस घरात असंच वाचत होतो...

एकंदरीत सिनेमा छान आहे, गाणी छान आहेत.
पहिला अर्धा तास मराठी टीव्ही मालिकेसारखा वाटल्याने बंद करणार होतो .. पण कथानकाने योग्य वळण घेऊन मला रोखले.

हेमंतकुमार

लघुपट
गजरा
खऱ्या सुगंधाचा अर्थ . . .
मोलकरणीच्या भूमिकेत मयुरी मोहिते यांचा सुंदर अभिनय !
https://www.youtube.com/watch?v=EdRa-3sqVqI&t=1s
. . .
अपरिचित (हिंदी)
आपल्याला फक्त फेसबुकी मैत्री हवी आहे की प्रत्यक्ष माणसांना भेटण्यात रस आहे ?
शिशिर शर्मा चांगल्या भूमिकेत
https://www.youtube.com/watch?v=sbMkZSHA5UY
. .
मुलाखत
गुलजार
खुसखुशीत, हास्यविनोदाने भरलेली, अर्थपूर्ण आणि राष्ट्रीयत्वाचे भान देणारी मोजक्या अर्ध्या तासाची सुंदर मुलाखत !
https://www.youtube.com/watch?v=PKU9pQC5fSE
. . .
अनेक भारतीय भाषांमध्ये पारंगत असलेले भाषांतरकार आणि भाषाशिक्षक वासुदेव डोंगरे
सुंदर मुलाखत !
https://www.youtube.com/watch?v=g9Gw1U_aMaI

सिरुसेरि

रिचर , शेरलॉक , क्राउन , रॉयल्स , कराटे किडस - लिजंडस , कोब्रा काय -- गेल्या काही महिन्यांमधे इत्यादी बघितले .

जुइ

किर्तनकार आफळे बूवांचे किर्तन ऐकण्याचा योग येथे गेल्या आठवड्यात आला. औलोकिक अनुभव होता त्याचबरोबर अविराज तायडे हे पंडित भिमसेन जोशींचे शिष्य यांचेही गायन ऐकायची संधी मिळाली. दोन्ही कार्यक्रमासांठी तुलनेत वेळ कमी होता त्यामुळे मनाला चुटुपूट लागून राहिली. अर्थात तूनळी सगळे पाहायला ऐकायला मिळतेच, प्रत्यक्ष अनुभूती निराळीच.

Bhakti

बोन एपेटिट, युअर मेजेस्टी" Bon Appetit, Your Majesty
कोरियन ड्रामा,५०० वर्षे भूतकाळात पोहचलेल्या शेफ मुलीची आणि तेव्हाच्या राजाची हलकी फुलकी रोमॅंटिक, कॉमेडी सिरीज आहे.ही कथा पाककृतींच्या विविध आविष्काराने सजली आहे.अधिक तर मांसाहारी पाककृती आहेत.तरीही ती शेफ ज्या पद्धतीने अनेक पदार्थांचा शोध लावते ते दरवेळी पाहायला खुपच मस्त वाटते.एकंदरीत खुप्पच गोड सिरीज आहे.

विकांताला मुंबई पोलिसांमधील प्रसिध्द इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांच्यावरील 'इन्स्पेक्टर झेंडे' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर बघितला.

कालीधर लापता पाहिला. अभिषेक बच्चनचा सहज सुंदर अभिनय आवडला.
कथा साधीच आहे. लहान मुलाचा अभिनय, छायाचित्रणही भन्नाट. मस्तच.

-दिलीप बिरुटे

हेमंतकुमार

१. एक्सचेंज ऑफर ( हिंदी)
निवृत्त मुख्याध्यापक - जुना संगणक ते नवा संगणक - कसाबसा स्वीकारलेला बदल - इच्छा नसताना लादलेले फेसबुक सदस्यत्व - माजी विद्यार्थ्यांची अकस्मात भेट - आणि . . .
सुखद शेवट पण आनंदाश्रू आणणारा .
एम के रैना : अविस्मरणीय भूमिकेत.
https://www.youtube.com/watch?v=EqCLjvxKPko
. . .
२. LOVE BY CHANCE (मराठी)
हलकाफुलका छान आहे.
प्रियदर्शनी आणि विराजस दोन्ही आवडले.
https://www.youtube.com/watch?v=vcmhPt22wso
. . .
३. आस (हिंदी )
गरीबी- सोशिकता आणि . . . आशा. . . निराशा. . . .
परिणामकारक शोकांतिका !

https://www.youtube.com/watch?v=0WgYgdi6G1Q

Bhakti

एक्सचेंज ऑफर ( हिंदी)-छान विशेष!

चित्रगुप्त

'एक्सचेंज ऑफर' आत्ताच बघितला. सुंदर आणि र्‍हदयस्पर्शी.
-- पूर्वी ९० च्या दशकात दिल्लीतल्या आमच्या ऑफिसात - USIS मधे एम. के. रैना अधूनमधून गप्पा करायला येऊन बसायचा ते आठवले. इतक्या वर्षांनंतर त्याला बघूनही खूप छान वाटले आणि त्या जुन्या आठवणी जागृत झाल्या. अनेक आभार.

Bhakti

मारीसन-Maareesan
या दक्षिण भारतीय सिनेमाबद्दल खुप ऐकलं होतं.एक सिरीयल किलरची गोष्ट आहे.सामान्य माणूस असलेला माणूस सिरीयल किलर होतो.पण कथेत दोन नायकांची मैत्री होते.अनेक ट्विस्ट आणि टर्ननंतर शेवट क्लायमॅक्स रहस्यभेद चांगला जमलाय.फास्ट फॉरवर्ड करून पाहिला तर वेळ वाचेल ;)

असंका

वॉव,स्पॉयलर!
अलर्ट.....???

:(

हा पिच्चर गेल्या आठवड्यात दहा दहा मिनिटं करत सुमारे एक पाउण एक तासाचा बघून झाला आहे. ओके ओके मजा येत होती. आता हे काही तरी वेगळंच कळलं. आता वेग्ळ्या नजरेने बघितला जाइल!! (बघितला तर!)

(जर मी फास फोर्वर्ड न करता, अख्खा उरलेला पिच्चरच न बघता वेळ वाचवला, तर क्रेडिट आपल्याला... :D)

Bhakti

हम्म,मला नाही आवडला हा सिनेमा.खुपच ओव्हररेटेड वाटला.वेळ वाया गेला.

स्वधर्म

पार्किंग हा तामिळ सिनेमा काल अ‍ॅमेझॉनवर पाहिला. रोजच्या जीवनातील घटना कशा अंगावर काटा आणणार्‍या असू शकतात आणि चित्रपट हे काय ताकदीचे माध्यम आहे याची प्रचिती आणून देणारा. परीधी या वयस्कर व्यक्तीरेखेचा अभिनय अतिशय आवडला. अनेक दृष्टीकोन समोर ठेवत कथा अत्यंत उत्कंठावर्धक पध्दतीने पुढे जाते. खरे तर सिनेमा किंवा कोणतीही कला म्हणजे उत्कंठा कशी ताणली व पेलली जाते आणि ती कशी अनपेक्षित प्रकारे पूर्ण होते हेच आहे. अगदी शास्त्रीय संगीतातही समेवर येणे हा उत्कंठा पूर्ण होण्याचाच आनंद देते. ते या सिनेमात जमले आहे. बाकी थोडे सिनेमीकरण आहेच, तामिळ असल्याने पण जरूर पहा.

आता रामकुमार बालकृष्णन या दिग्दर्शकाचे सिनेमे शोधून पहावे असे वाटू लागले आहे.

चित्रपट आवडला. एक लहानशी गोष्ट आणि राग कुठे घेऊन जातो याची कलात्मक मांडणी.

धन्स.

-दिलीप बिरुटे

NiluMP

ज्यांना डॉकमेंटरी आवडतात त्याचसाठी
नेटफ्लिक्स :
Take Care of Maya
Terrorism Close Calls

Bhakti

Chernobyl
ही सिरीज मी खूप पूर्वी पाहिली होती.पण ज्यांना विज्ञान,इतिहास यांची आवड आहे त्यांच्यासाठी Must to watch सिरीज Hotstar वर आहे.सोवियेत युनियन -अमेरिका शीतयुद्धाच्या कालावधीत हे घडते.सोवियेत युनियनच्या कुचकामी रिॲक्टर धोरणाने हा कांड होतो.अनेक जीवांचा बळी घेणारा चर्नोबिल आणि राजकारण ,पाहण्यासारखे आहे.

सन्जोप राव

जिओवर ही अप्रतिम मालिका बघितली. एडी रेडमाईन (किंवा जो काही उच्चार असेल तो) जबरदस्त काम करतो. लाशाना लिंचला मुद्दाम जरा जास्त कळकट दाखवले आहे काय कुणास ठाऊक. उर्सुला कॉरबेरो (किंवा जो काही उच्चार असेल तो) काही वेळा छान दिसते. मूळ कादंबरीशी या मालिकेचा फारसा संबंध नाही, पण दुसर्‍या सीझनची वाट बघावीशी वाटावी अशी मालिका आहे.

कॉमी

पाहिला. ठीक ठाक.
पहिला अर्धा भाग छानच होता.
त्यानंतर ताळतंत्र सुटले असे वाटले. अतर्क्य पण अनेकदा पाहिलेले होते पुढचे सगळे.
सगळ्यांचा अभिनय छानच. नवीन अभिनेत्री खूप सुंदर आहे.
गाणी चांगली आहेत.

एक्स्चेन्ज ऑफर छान.

गजरा पण चांगला. त्यातले बांसरीचे गाहिरे सूर गारुड करणारे, प्रभावशाली वाटले.

@ स्वधर्मः

खरे तर सिनेमा किंवा कोणतीही कला म्हणजे उत्कंठा कशी ताणली व पेलली जाते आणि ती कशी अनपेक्षित प्रकारे पूर्ण होते हेच आहे. अगदी शास्त्रीय संगीतातही समेवर येणे हा उत्कंठा पूर्ण होण्याचाच आनंद देते.

अगदी खरे.

Bhakti

TRIAL चा दुसरा सिझन आला !
काजोलवरची नजर हटत नाही.अप्रतिम अभिनय केलाय.कथा देखील एका कणखर महिलेची आहे.हिंदी सिरीज पाहणे मी बंद केलंय.पण काजोलची ही सिरीज पूर्ण पाहावीत लागेल.

हेमंतकुमार

पुस्तकविषयक
दीपा देशमुख
‘जग बदलणारे ग्रंथ’ या त्यांच्या माहितीपर ग्रंथाचा परिचय.
https://www.youtube.com/watch?v=mR1GpaxXLO8&t=1433s
सुंदर मुलाखत
. . .
पुस्तकांवरची पुस्तकं आणि धमाल किस्से
सुरेख परिसंवाद !
नितीन रिंढे, सौमित्र कदम, गणेश विसपुते, इ. मान्यवर.
. . .
सचिन कुंडलकर
https://www.youtube.com/watch?v=Gy3kb1HabFY&t=81s
कोबाल्ट ब्लू पासून मोनोक्रोमपर्यंतचा लेखनप्रवास
पुस्तकांची अन्य भाषात झालेली भाषांतरे
पुस्तक भाषांतर यंत्रणा स्थापन करण्याचा मनोदय.

Bhakti

JOY -The Birth of IVF
जगातली पहिली आयव्हीएफ लुईस जॉय ब्राऊन हिचा जन्म १९७८ मध्ये झाला.
परंतू आयव्हीएफ तंत्रज्ञानावर १९६८ -१९७८ या दहा वर्षे स्टेप्टो, एडवर्ड्स आणि पर्डी यांनी मध्ये मानवी आयव्हीएफ संशोधनात सुरुवात केली.
डीएनए स्ट्रक्चरविषयी शोध लावणाऱ्या वॅटसन यांनीही चक्क या संशोधनाला विरोध दर्शविला होता हे पाहून खूप आश्चर्य वाटले.
मानवावरच्या पहिल्या टप्प्यातील संशोधनात त्यांना यश मिळवण्यात अनेक अडचणी आल्या.पण दुसऱ्या टप्प्यातील संशोधनात स्त्रीच्या फर्टीलायजेशनच्या सायकलनुसार सर्व प्रोसीजर केल्यावर त्यांना यश मिळाले.
पण फार उशीरा रॉबर्ट एडवर्ड्स यांना " इन विट्रो फर्टिलायझेशनच्या विकासासाठी " २०१० चा शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला . [ 29 ] स्टेप्टो आणि जीन पर्डी यांना मरणोत्तर नोबेल पुरस्कार दिला जात नसल्याने ते विचारात घेण्यास पात्र नव्हते.
यातूनच ख्रिश्चन धर्म तसेच समाजाचा अशाप्रकारच्या गर्भधारणेविषयीचे दुषित मत कारणीभूत आहे का हे वाटले.
सिनेमात प्रामुख्याने जीन पर्डी यांचे काम विशेष हे दाखविण्यात आले.त्या स्वतः सिविएर एंडोमेट्रियोसिसशी झगडत होत्या.त्यामुळे त्यांना एका अनफरटाईल स्त्रीसाठी मातृत्व किती महत्त्वाचे आहे हे जाणवत असेल.
छान संथ शीतल सिनेमा आहे.मानव हा मानवी जीवनाचा विज्ञानाद्वारे कसा शिल्पकार झाला हे पाहणं खुप रोचक वाटले.

Bhakti

https://youtu.be/JZ5H9fEP2LU?si=vx-QBfiZ-Woe412i
हे तू नळीचे एक चॅनेल आहे.यात फिजिक्सचे सिद्धांत खुप मनोरंजन पद्धतीने सांगतात.पण हे चॅनल, फिजिक्स समजून घेण्यासाठी चिक्कार वेळ पाहिजे :)

श्वेता२४

एकदा बघायला छान आहे . ट्रेलर वरून स्टोरी काय असेल हे नक्कीच सांगता येत नाही. चांगली इंटरटेनमेंट ...साउथ चे एक्झॅगेरेशन आवडत असेल तर अशा लोकांना हा चित्रपट नक्की आवडेल.

काल परवा “रामचंद पाकिस्तानी” हा २००२ च्या खर्या घटनेवर आधारित पाकिस्तानी सिनेमा युट्युबवर पाहिला, या आधी २०१० लाही पाहिला होता पण तेव्हा इतका समजला नव्हता, एका पाकिस्तानी मुस्लिम व्यक्तीने पाकिस्तानी हिंदू कुटुंबावर सिनेमा बनवला हीच मोठी गोष्ट वाटली, सीमेपलीकडील वातावरण खासकरून थारपारकर जिल्हा, तिथले दलित हिंदू कुटुंब, एक लहान ७ वर्षांचा मुलगा कुटुंबावर नाराज होऊन बॉर्डर पार करून भारताच्या हद्दीत येतो, त्याच्यामागे त्याला शोधत त्याचे वडिलही भारतीय हद्दीत येतात, त्याना भारतीय सैन्य धरते, पुढे दोघांचा तुरंगवास, तुरुंगातील परिस्थिती, तिकडे त्या मुलाच्या एकट्या राहिलेल्या आईचे हाल सुंदरपणे चित्रित केलेत. भावनिक खेळ. आवडला सिनेमा. नक्की पहा.

https://youtu.be/q5SlisJJyNI?si=DyYFk0JHcFE6cnDV

सिनेमा पाहून झाल्यावर दिग्दर्शक मेहरीन जब्बार ह्याना मेल करून सिनेमा खूप छान बनवला, आवडला, फार बारकावे टिपलेत असे कळवले, आज मेलला त्यांचे उत्तर आले.

तुझ्या प्रेमळ आणि मनापासून आलेल्या संदेशासाठी खूप आभार. तुला माझा चित्रपट भावला याचा मला खूप आनंद आहे. आजच्या या विभागलेल्या काळात आपली समान मानवता सांगणाऱ्या कथा महत्त्वाच्या आहेत. आपल्याला वेगळं करणारं जितकं आहे त्यापेक्षा आपल्याला एकत्र आणणारं खूप जास्त आहे. सरहद्दीपलीकडून तुझ्यासारख्या लोकांचे संदेश मिळणे खूप मोलाचं वाटतं, आणि अशी आशा आहे की आपल्या देशांमध्ये सहकार्य व प्रवास करणे लवकरच सहज शक्य होईल.
तुझ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!

Thank you so much for your kind and thoughtful message. I’m delighted the film resonated with you. In these divided times, telling stories of our shared humanity matters. There’s far more that unites us than divides us and hearing from people like you across the border means a great deal, and I hope for the day when collaboration and travel between our countries is easy.

Wishing you all the best !

Bhakti

वाह,थेट कलाकाराची पोचपावती खुप आनंद देते.
मी भारत पाकिस्तान यांच्यातील नातेसंबंधांवरचे कर्मशिअलच सिनेमे पाहिलेत -पिंजर, बजरंगी भाईजान,गदर.

सोत्रि

आहाहा....काय आठवण करून दिलीत.

पिंजर एक नितांत सुंदर सिनेमा आहे. आता शोधून बघणे आले....

- (पिंजरच्या आठवणीने अंमळ हळवा झालेला) सोकाजी

काल कार्तिक कॉलिंग कार्तिक हा २०१० चा सिनेमा पहिला, युट्यूबला आहे, थोडा धीमा वाटला, ढकलून पाहिला तरीही कळतो, सस्पेन्स चांगला आहे.
त्या आधी डरना मना है पाहिला, इतका भीतीदायक नव्हता.

Bhakti

Cleopatra's Final Secret' ही एक डॉक्युमेंटरी आहे.
कॅथलीन मार्टिनेझ यांनी क्लियोपेट्राच्या अंतिम स्थान(कबर) शोध घेतल्यानंतर, क्लियोपेट्राचे अंतिम रहस्य भूमध्य समुद्रावरील वाळवंट आणि पाण्याखालील मोहिमा दाखवते.
क्लियोपेट्रा ही इजिप्तची एक शेवटची फेरोह होतीच पण ताकदवान स्त्री होती.अशी ताकदवान स्त्री तत्कालीन रोमन साम्राज्याला नक्कीच नको होती.तिने हे ठरवलंच होतं की कोणत्याही पुरुषाच्या हातून तिच्या अंतिम स्थानाचा शोध लागू नये.जवळपास ३००० वर्षांनी कॅथलीन या संशोधिकेने तिचे शेवटचे स्थान शोधण्याचा दावा केला आहे.
ही अप्रतिम डॉक्युमेंटरी जियो हॉटस्टारवर आहे.

फॉल हा २०२२ चा सर्वाईवल सिनेमा पाहिला! उत्कृष्ट होता, पूर्ण सिनेमाभर एक टेन्शन भरलेलं वातावरण तयार करण्यात यश आलय. नक्की पाहवा! अंगठीचे मालक (लॉर्ड्स ऑफ द रिंग) पाहणेही सुरू केले आहे, पहिला भाग पाहून संपला.

जुइ

रेबेका नावाचा कादंबरी आधारीत रहस्यपट नेटफिक्सवर पाहिला. हा नव्याने परत तयार केला आहे. या सिनेमाबाबत वाचले होते. हिचकॉक यांनी देखिल हाच सिनेमा
(कृष्ण धवल सरूपात) दिग्दर्शीत केला आहे. हा सिनेमा तूनळीवर पाहायला मिळेल. नक्कीच पाहण्यासारखा आहे.

शुभां म.

अलीकडेच मला महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि आशय फिल्म क्लबद्वारे आयोजित फिल्म स्टडी सेंटर अप्रतिम उपक्रमाची माहिती मिळाली. या क्लबमध्ये दर महिन्याला जागतिक कीर्तीच्या दिग्दर्शकांचा एक चित्रपट दाखवला जातो आणि आयोजक केवळ चित्रपट दाखवत नाहीत तर त्या दिग्दर्शकाच्या कामाबद्दलची माहिती आणि तांत्रिक बाबींचे विश्लेषणही करतात.

ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध कन्नड दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांचा "कूर्मावतार" (२०११) हा चित्रपट या उपक्रमात दाखवण्यात आला.

"कूर्मावतार" (२०११) या चित्रपटात जीवनाचे वेगवेगळे पैलू दाखवले आहेत आणि प्रत्येक फ्रेम, प्रत्येक दृश्य अतिशय सुंदर आणि प्रभावीपणे सादर केले गेले आहे.संवादांपेक्षा दृश्यांवर अधिक भर देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना थक्क करून सोडतो आणि शेवटी प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून जातो.

गुलाबी टाकीज पहायचा आहे, आणि शक्य होईल तेव्हा इतर चित्रपटही नक्कीच पहिल. मागच्या वेळी पोलिश दिग्दर्शक आंद्रेज वायदा यांचा Man of Iron पाहिला होता.तो पण खूपच वेगळा सिनेमा होता.

पुण्यामध्ये बरेच कार्यक्रम होत असतात , मागे गुरु दत्त याचे जुने सिनेमा डिजिटल redevelop करून प्रदर्शित केले होते NFAI मध्ये. OTT var पाहण्यापेक्षा अशा कार्यक्रमात पाहणे एक वेगळंच अनुभव आहे.

Bhakti

गेल्या महिनाभरात खुप सिनेमे आणि सिरीज पाहिल्या पण सगळ्यात जास्त वेळ लागला तो 'अम्ब्रेला ॲकॅडमी' सिरीज पाहायला.
Sci fi सिरीज आवडतात त्यातही एकाचवेळी अनेक टाईमलाईन विषय दाखवणाऱ्या अधिक आवडतात.अशी ही Umbrella Academy सिरीज होती.अशीच अनेक टाईम लाईन दाखवणारी Dark सिरीज आहे.पण ती खुपचं किचकट वाटतं आहे त्यामुळे काहीच भाग पाहिले.

Bhakti

पलीकडे एका धाग्यावर याचा सिनेमा उल्लेख आहे.खरोखरच नक्कीच पाहिला पाहिजे असा हा सिनेमा आहे.या रीलने तर धुमाकूळ घातला आहे.
https://youtube.com/shorts/zIjJcmhrbY4?si=U4XePfEklKB8bI0k
.द हिडन फिगर!
हा सिनेमा खऱ्या व्यक्तीरेखांवर आधारित आहे.प्रगत मानल्या जाणाऱ्या अमेरिकेत १९६१ ला वर्णद्वेष होता.गडद त्वचा रंगांच्या लोकांना खूप हीन मानले जायचे.अशा वेळी चक्क नासामध्येही हा भेदभाव होता.पण कॅथरीन जॉन्सन, डोरोथी वॉन आणि मेरी जॅक्सन, या तीन हुशार गडद त्वचा रंगांच्या संशोधक बायकांनी इतिहास घडवला . गणितज्ञ ,मून मिशन भाग घेणारी कॅथरीन,आयबीएम कम्प्युटर हेड होणारी डोरोथी आणि मेरी नासातली पहिली कृष्ण वर्णीय इंजिनिअर होती.

त्यांचा लढा खरच खुप प्रेरणादायी होता .अफलातून सिनेमा आहे.

Bhakti

उदाहरणार्थ, समजा उरुग्वेतील नागरिक टिकटॉकवरून मांजराचे लक्षावधी व्हिडिओ शेअर करतात. बाइटडान्स त्यासाठी त्यांच्याकडून काही रक्कम घेत नाही किंवा त्याबदल्यात त्यांना रक्कम कथाही करत नाही.पण नंतर बाइटडान्सने इमेज-रेकग्निशन एआयला प्रशिक्षित करण्यासाठी त्या व्हिडिओचा वापर केला आणि हे एआय नंतर दक्षिण आफ्रिकी सरकारला एक कोटी यूएस डॉलर्स किमतीला विकलं. हा जो पैसा मिळाला, तो उरुग्वेतल्या मांजरांच्या व्हिडिओंचं फलित आहे हे उरुग्वेतल्या अधिकाऱ्यांना कळणार तरी कसं?आणि त्यांचा वाटा किती हे ते मोजणार तरी कसा?कॅट व्हिडिओचा कर लावला पाहिजे का? (कदाचित हे विनोदी वाटू शकेल, पण आपण हे उरुग्वेने कॅट व्हिडिओ अकराव्या प्रकरणात पाहणार आहोत. एआयमध्ये अत्यंत महत्त्वाचे पथदर्शक मार्ग सापडण्यासाठी मांजरांच्या प्रतिमा महत्त्वाच्या ठरल्या.)

हा परिच्छेद युवाल भरारी यांच्या 'नेक्सस' या पुस्तकातील आहे.अनेक सोशल मिडिया प्लॅटफॉर्म अशाच प्रकारे आपली माहिती,फोटो, व्हिडिओ चोरतात आणि AI कंपन्यांना विकत आले आहेत.

ह्या AI ला व्हिडिओ,फोटो देऊन प्रशिक्षित करण्यासाठी अनेक डाटा /माहिती देण्याचे काम भारतातल्या छोट्याशा खेड्यापाड्यातही केले जात आहे.

यावरील एक छोटासा पण अर्थपूर्ण सिनेमा Humans In The Loop हा पाहिला.नायिका AI ला अगदी बाळाप्रमाणे कसे उभे राहायचे,धावायचे याची माहिती पुरवत असते.आणि समांतर धावणारी तिचीही गोष्ट आहे.इकडे AI ला प्रशिक्षित करतांनाच माणूस निसर्गापासून दूर चालला आहे.डोळे भरून निसर्ग पाहायला,मन भरून निसर्गावर प्रेम करून गात्रांना समाधानी करण्याची कला तो विसरत चालला आहे.

Bhakti

Extraordinary Attorney Woo
ही एक अतिशय गोड दक्षिण कोरियन सिरीज आहे, जी ऑटिझम स्पेक्ट्रमवर असलेल्या वू यंग-वू या हुशार वकिलाच्या जीवनावर आधारित आहे.मुख्य नायिकेला अप्रतिम अभिनय केला आहे.ऑटिझम व्यक्तिरेखा साकारण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले असणार.आता ॲटर्नी वू प्रमाणेच माझी मुलगी आणि मीएका खोलीतून दुसऱ्या खोलीत आकडे मोजत प्रवेश करतो..काही काळ गंमत ;)

स्वधर्म

काल स्थळ हा अप्रतिम सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहिला. जी कलाकृती पाहताना तुंम्ही भान विसरून त्या प्रवाहात जाता, ती कलाकृती मी श्रेष्ठ मानतो. त्या अर्थाने 'स्थळ' हा सिनेमा तुंम्हाला इकडे तिकडे बघूच देत नाही. तुंम्ही त्या सिनेमातले एक पात्रच होऊन जाता, त्या गावात राहू लागता. सर्वात महत्वाचं म्हणजे दिग्दर्शक जयंत सोमलवार किंवा नायिका नंदिनी चिकटे यांचं नांव पूर्वी कधी ऐकलं नव्हतं पण सिनेमा कमाल बनला आहे. जे सांगायचं आहे ते अत्यंत सूचक (सटल) सांगितलं आहे आणि कुठेही बटबटीतपणा नाही. शक्य असेल तर अजिबात सोडू नका.
ट्रेलरः Sthal | A Match | स्थळ | Official Trailer | Sachin Pilgaonkar | Jayant Somalkar | Nandini Chikte
परिक्षणः स्थळ | Sthal Marathi Movie Review

त्याआधी अशोक सराफ, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर इ. असलेला महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन असलेला शिवाजी पार्क पाहिला होता. या प्रस्थापित लोकांची अक्षरशः कीव आली. किती तो बटबटीतपणा आणि कथानकातले, दिग्दर्शनातले कच्चे दुवे! का म्हणून यांना मोठे कलाकार म्हणायचं असा प्रश्न पडला.

Bhakti

स्थळ हा बहूचर्चित मराठी सिनेमा पाहायचे राहिलेच.संधी मिळाल्यावर नक्कीच पाहणार.
महेश मांजरेकरचे सिनेमे पाहायचं मी टाळते... ;)
का ते माहीत नाही.फार पूर्वी कुठेतरी सुप्त मनात काहीतरी गणितं त्यांच्या कलाकृतींच्या बाबतीत फिसकटली आहेत.

स्वधर्म

बहुतेक त्यांचा अहं सारखा जाणवतो हे कारण असावं. विशेषतः मराठी बिग बॉस मध्ये ते ज्या उर्मटपणे बोलायचे ते अगदी डोक्यात जायचे.

सरकारने मराठी शाळा बंद करण्यासाठी पावले उचलली, हिंदी सक्ती आणायचा प्रयत्न केला इ.इ. वेळी हे मोठे प्रतिथयश कलाकार, जे संपूर्णपणे मराठीच्या असण्यावर पोट भरतात, एका शब्दाने तोंड उघडत नाहीत, म्हणून पण डोक्यात जातात.

कॉमी

पर्वा असाच "मी शिवाजीराजे... " सुरू केला.
अत्यंत टुकार संवाद आणि कथा. पंधरा मिनिटे सुद्धा पहावला नाही.

Bhakti

खुपचं प्रभावी सिनेमा आहे.अगदी माझ्या पिढीतल्या अनेक सामान्य मुली या फेऱ्यातून गेलो आहोत.खुपच साचेबद्ध या कार्यक्रमात वरवरच्या प्रश्नांनी मन जुळवणी हे दिवास्वप्न तर आहे.पण मुलींच्या,घरच्यांच्या मनाची घालमेल या चित्रपटात खुप प्रभावी कोणत्याही मिर्ची मसाल्याशिवाय सादर झाली आहे.शेवटचे १५ -२० मि.घडणाऱ्या गोष्टी कोणत्याही संवादाशिवाय केवळ संगीतावर पुढे जात पाहतांना चर्र होते.
शेवटचे दृश्य पाहून माझ्या मुलीला हुश्श झालं :)
नाहीतर ती असं मुलींचे हाल होत आहे ,हे पाहून चिंता करत होते,सिनेमा बंद कर म्हणत होती .

स्वधर्म

आपल्या समाजातील एकंदर रुढीप्रियता आणि अज्ञान पाहून अगदी पहावत नाही. आणि या सिनेमात कोणतीही अतिशयोक्ती नाही.
मुलगी पेटून उठते पण शेतकरी तस्साच मार खात राहतो हे पाहून मनाला वेदना होतात.

एम एक्स प्लेयर वर फर्स्ट कॉपी चे दोन्ही सीजन पाहिले. ऑडीयो / व्हिडीओ पायरसीबद्द्ल आहे. कॅसेट, सीडी, इंटरनेट चा प्रवास पाहिलेला असल्याने मजा आली.

Bhakti

जॉनी एल एल बी-३ पाहिला.इतर दोन सिनेमांइतका मनोरंजक नाही.पण थेट शेवटचा एक तास सिनेमा नक्कीच पाहण्यासारखा आहे.मला कोर्ट , वकील,ॲर्ग्युमेंट पाहायला मजा येते :)

Bhakti

Stranger Things
याचा सध्या शेवटचा सिझन येतोय.त्यामुळे सगळीकडे खुप गाजावाजा आहे.त्यामुळे पाहायला सुरुवात केली.पहिले दोन सिझन पाहिले.चांगलच खिळवून ठेवलंय.
शेवटच्या सिझनचा पहिला एपिसोड रिलीज झाला तेव्हा खुप लोकांनी नेटफ्लिक्स वापरल्याने काही ठिकाणी ते क्रॅश झाले अशी बातमी आहे.

Bhakti

गुगलवर stranger things सर्च केल्यावर एक डायस येतो.तो क्लिक केला की मोबाईल उलटा होतो ;) उलटी दुनियाच जातो.
झाले सगळे एपिसोड,सिरीज पाहून.आता २५ डिसेंबरची वाट पाहायची.

मी सगळे सीझन्स जेव्हा जेव्हा आले तेव्हा सगळे एका रात्रीत पूर्ण केले. स्टोरीटेलिंगच्या तंत्रावर काय जबरदस्त हुकुमत आहे.

Bhakti

स्टोरीटेलिंग कमालच!४००० कोटींचे बजेट म्हणूनच नेटफ्लिक्स+इतर यांनी ठेवलंय.अशरक्ष: या सिरीजचे बजेट जुगार ठरणार होता,फायनल एपिसोड थिएटरमध्येपण रिलीज होणार आहे.
सगळे एपिसोड पाहून झाले म्हणून सिरीजच्या‌ वेगवेगळ्या थिअरीज पाहतेय.इन्स्टावर तर stranger things कंटेंटचचा महापूर आलाय.एका दृश्यात जेन मिसिंग आहे,तर एक संपर्क नंबर दिलाय.लोकांनी तो नंबर डायल केला तर, अक्षरशः व्हाइस मेसेज मिळतो 'वेलकम टू हॉकिन्स,इकडे भूकंप आला होता...वगैरे वगैरे.
दहा वर्षांपूर्वी चित्रित केलेल दृश्य बरोबर काही वर्षांनी योग्य त्या एपिसोडमध्ये ॲड करायचं म्हणजे दिग्दर्शकांनी काय पद्धतीने डिटेल्स रेखाटले आहेत.. Hat's off to Duffer Brother

असंका

जर कुणाला रणगाडे संबंधी युद्धपट आवडत असतील, तर एक अगदी जबरदस्त चित्रपट आहे युट्युब वर- "व्हाइट टायगर". यात रशियन "टी - ३४" वि. जर्मन "टायगर" असा सामना दाखवला आहे.

(वॉर्निंग: काही काही दॄष्ये अगदी अंगावर काटा आणणारी आहेत.)

Bhakti

Homebound
भारतातल्या अनेक गावांची ही कथा आहे.स्वप्नांचा पाठलाग करणारी गावातली तरुणाई, परंतु स्वप्नांना पैशांचे वास्तव ग्रासत राहतं.त्यात जर काळाचा फेरा आला तर...चटका लावणारा सिनेमा आहे.
दोन मित्रांच्या नात्यांची गहिरी कथा(सिनेमा) आहे.

Bhakti

गर्लफ्रेंड
हा दक्षिण भारतीय डब्ब सिनेमा पाहिला.अर्थात रश्मिका मंदाना असल्याने पाहिला गेला,इतकी संथ कथा आहे.टिपिकल सोज्वळ मुलीला टॉक्सीक बॉयफ्रेंड मिळतो.
तीच्या आयुष्याला आधीच एकाकीपणाची दु:खद किनार असते.त्यामुळे हे बळच गळ्यात पडलेलं बॉयफ्रेंडच लचांड सोडवायला खुप त्रास होतो.त्यात वडील, मित्रमैत्रिणी तुटतात.बॉयफ्रेंडच्या आईची अवस्था पाहून हे लग्न झाले तर असे कोशात जाऊ हे तिला समजते.शेवटी संशयी,तापट बॉयफ्रेंडला ती नकार देते.
तर या सायको तिची बदनामी करायला लागतो.ती अजूनच घाबरते.पण शेवटी तिच्यातली दुर्गा जागी होते,मी लग्न चांगल्याच डिसेंट मुलाशी करेल.आणि असा नाही मिळाला तर एकटी सुखात जगून दाखवेल असं त्याला ,जगाला ठणकावून सांगते.आणि तशीच जगताना शेवटी ती दाखवली.
टॉक्सीक रिलेशनशिप हा अजुनही ज्वलंत विषय आहे.अल्लड वयात मुला मुलींना प्रेमाचे फुलपाखरु आकर्षित करते पण आपला साथीदार फुलपाखरू ऐवजी डंख मारणारी मधमाशी तर नाही ना याची चाचपणी करत राहावी..