काथ्याकूट

सध्या काय पाहतेय? ---२०२६

Primary tabs

1
या रे या
stranger things च्या फ्यान लोकांनो
इकडे या
भावनांचे पाट वाहू द्या
stranger things ला भरलेल्या मनाने
गुड बाय करू या
शेवटचा भाग right side up अक्षरश: दोन तास मनःपटलावर अधिराज्य करतो.वेकना मरणार हे माहितीच होत . पण एल पण गायब होणार होत हे अनपेक्षित होत . सुपरनॅचरल मालिका असं गृहीत चालताना यात सायन्सचा वर्म होल हा कन्सेप्ट हि सिरीज सगळ्यांसाठी बघणीय होते.कारण ते भूत खेत जाम बोर करतात.
2
कोणाचं कौतुक करावं ???
सायकोकायनेटिक क्षमता असलेली इलेव्हन ,मैत्रीने घट्ट विणलेले माइक,लुकास, डस्टिन आणि विल,मॅक्स, धडाकेबाज नॅन्सीचा,स्टीव्ह ,हूपर,जोनाथन,रॉबिन जॉयसी,गोड गोडुली हॉली,डफर, बडबडी एरिका की हेन्री उर्फ वन उर्फ वेकना उर्फ खेकडा भजी(भारतीयांनी दिलेले नाव ) :) की पिसाळलेल्या कुत्र्यासारखे मागे लागणारे डेमोगोर्गनच यांचं करायचं.

२०१६ पासून १० वर्षात ५ सीझन आणि ४२ भागांत ही सगळी पात्र आपल्या बरोबरच वाढत होती.हृदयस्पर्शी मैत्रीचा अर्थ पुन्हा पुन्हा पटवून देत होती. ८० च्या दशकातील जुन्या आठवणी पॉप गाण्याने जाग्या होत होत्या https://en.wikipedia.org/wiki/Stranger_Things:_Music_from_the_Netflix_O… ."Running Up That Hill (A Deal with God)" by Kate Bush हे गाणं आता माझी मोबाइल रिंगटोन आहे .

यावर इन्स्टावर थेअरी ,कॉमेडी,अशा रीलचा महापूर आला आहे .त्यात मॅक्स समोर गेट आलं तरी वेड्या सारख्या का बडबडत आहे हा प्रश्न असो :),वेकना भाऊने केलेला वेट लॉस,एल सारखी पॉवर आल्याचा विश्वास असो :)
3
4
अहो शेवट ,तुम्ही सस्पेंस ,थ्रिलरवर गोष्ट संपवता तेव्हा हे क्षणिक ठरत .मानवी भावनांना जेव्हा स्पर्श करता तेव्हा ती गोष्ट अमर होते. माईक सगळ्यांना समजून सांगतोय आपलं बालपण आता दूर चाललं आहे ,संपलं आहे .हा खेळ संपला आयुष्याचे नवीन अध्याय आता खेळणार आहोत.... हायला खूप दिवसांनी एखाद्या सीरिजने आनंद दिला ,हसवलं,उत्सुकता वाढवली ,रडवले.
हॅट्स ऑफ डफर ब्रदर !!!!!

मदनबाण

सध्या या सिजनचे २ भाग पाहुन झाले आहेत. तुमच्या मागच्या भागात कोणीतरी White Tiger सुचवला होता तो देखील पाहिला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Pandit

Bhakti

व्हाईट टायगर.. नेटफ्लिक्सवर वेगळाच White Tiger सिनेमा पाहिला स्लमडॉग मिलेनियर ची आठवण झाली, झोपडपट्टी ते बिग बॉस पण यात गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

मदनबाण

तुमच्या मागच्या धाग्यात असंका या आयडीने रशियन "टी - ३४" वि. जर्मन "टायगर" असा सामना असे लिहल्याने माझ्या लक्षात राहीले.
याचे दुसरे कारण म्हणजे काही काळा पूर्वी M1 Abrams Tank चे फायरिंग माझ्या पाहण्यात आले होते. त्या टँकची एकच फायरिंग पाहुन मी चाट पडलो होतो. केवळ ५ सेकंदाचा शॉट खतरनाक आहे!
त्यामुळे तो टॅंकपट पाहण्याची इच्छा मला रोखता आली नाही! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]

टर्मीनेटर

मागे दिवंगत मिपाकर चौकटराजा ह्यांनी 'गन्स ऑफ नेव्हरॉन' हा चित्रपट आवर्जून पाहण्याची शिफारस केली होती म्हणून युट्युबवर तो पाहताना हा चित्रपट सजेशनमध्ये आला आणि पाहीलाही होता. पण रशियन भाषेतला हा चित्रपट त्यावेळी सबटायटल्स वाचत बघितल्याने नावानिशी लक्षात राहिला नव्हता. आता वरच्या प्रतिसादांत 'White Tiger' हे नाव वाचून सर्च केल्यावर वर्षभरापूर्वी तो इंग्लिशमध्ये आल्याचे दिसले. तुम्ही हाच चित्रपट म्हणत असाल तर मला तो त्यावेळीही आवडला असल्याने आता ही इंग्लिश आवृत्ती उद्या किंवा परवा सवडीने पुन्हा बघणार! (अत्ता 'El Camino: A Breaking Bad Movie' बघायचे आधीच ठरवले आहे 😀)

मदनबाण

व्हय जी, आवडला. :)

stranger things शेवटी पाहुन संपवली.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

ही मालिका पाहायला सुरुवात करणार, अगदी कोऱ्या मनाने, ब्रेकिंग बैड, बॅटर कॉल सॉल संपली, सध्या फ्रिडम एट मिडनाईट पाहतोय, त्या नंतर स्ट्रेंजर थिंग्स!

कांदा लिंबू

stranger things पहिला खंड एकाच रात्री सलग पाहून घेतला. ‌ खूपच आवडला. दुसऱ्या खंडात फार काही विशेष वाटलं नाही, दोन-तीन भाग बघून नंतर सोडून दिला. ‌ आमची अपत्ये मन लावून सगळे खंड सगळे भाग बघत असतात. सध्या त्यांचा पाचवा खंड सुरू आहे. ‌ ते पाहत असतात तेव्हा मीही अधून मधून पाहत असतो. ‌

---

एवढ्या प्रचंड मोठमोठ्या मालिका पाहत बसण्यात मला फार काही रस नाही. ‌ दीड दोन तासांपेक्षा अधिक मोठाले सिनेमेही फारसे पहा वाटत नाहीत. (पण जमताड़ाचे सगळे खंड सगळे भाग दिवसरात्र सलग पाहिले होते. ‌ कालापाणी मालिका संपूर्ण सलग पहिली होती. ‌ क्रिमिनल जस्टिस चे एक एक खंड सलग पाहिले होते. ‌ धुरंदर दोन वेळा थेटरात पाहून झाला.)

कांदा लिंबू

@Bhakti, एक अनाहूत सल्ला - कालापानी आधी पाहिली नसेल तर नक्की पहा आणि त्यातला "अन्नसाखळीत आपण शक्य तेवढ्या वर राहायला हवं" हा विचार, आपल्या लेकीला -- तिला कळेल तेव्हा --समजावून सांगा.

https://www.netflix.com/title/81314368?preventIntent=true

जुइ

Stranger things मालिक अजून तरी पाहिली नाहीय.

मध्यंतरी classic गट्टात मोडणारा Sound of music पाहिला. हा सिनेमा सत्यकथेवर आधारीत आहे. अतिशय नयनरम्य सिनेमा आणि कथानकही ओघवते आहे. बर्‍याच काळापासून पाहायचा होता, पण राहून जात होता. गेल्यावर्षी या सिनेमाला ६० वर्ष पूर्ण झाली म्हणून पुन्हा प्रकाशित करण्यात आला होता.

पहिला भाग आला होता तेव्हा मी तो एका रात्रीत पूर्ण केला होता.
दुसरा, तिसरा सगळ्या भागांचे असेच.

शेवटच्या भागाचेही तसेच.

हा शेवटचा एपिसोड, ख्रिसमस नंतरचे एपिसोड, रात्री बारा ते सकाळी सहा याच वेळात पाहिले.

या सिरीजने खूप आनंद दिला. शेवटचा एपिसोड देखिल बेहद्द आवडला.

सगळे वाचले हे आवडले.

डफर बंधूंना स्क्रीनची भाषा परफेक्ट कळते. शेवटी ज्या पूर्वसुरींवर ते पोसलेले आहेत त्यांना ते कोळून प्यायले आहेत हे जाणवत राहते.

ब्राव्हो ब्राव्हो!

Bhakti

शेवटचा एपिसोड देखिल बेहद्द आवडला.
शेवटच्या एपिसोडचा शेवट रडवून गेला!काळ किती पळत राहतो,आपणही त्याच्याबरोबर पळले पाहिजे.

Bhakti

१
१९९०-९१ ला प्रथम सादर झालेले प्रशांत दळवी लिखित चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित "चारचौघी" नाटक २०२२ lरोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे या कलाकारांच्या साथीने २०२२ ला नाटक ३१ वर्षांनी पुनरुज्जीवित केले होते .मागील वर्षी या नाटकाचे अखेरचे प्रयोग पार पडले.प्रत्यक्ष नाटक पाहायचा योग्य आला नाही आज झी फाईव्ह OTT वर हे नाटक पाहिले.रोहिणी हट्टंगडी याचे संवाद नाही गर्जनाचं.. पितृसत्ताक संस्कृतीला, बंडखोर तरीही पुरुष द्वेष नाही, निर्णय घेतलास तर तो निभावणारी बाई हो ... पूर्ण नाटकभर या गर्जना ठसा पडतात, कानात गुंजत राहतात .रंगमंचावर नाटक पाहू शकले नाही याचे जरा वाईट वाटले.

स्त्रीने पितृसत्ताक पद्धतीने आखलेल्या कुंपणातच वागले पाहिजे. ती जरा जरी याहून वेगळी वागली तर ते अनैतिक वा चुकीचे समजले जाते. त्यांनी "चारचौघी" सारखेच वागले पाहिजे .अशावेळी नाटकातील चौघीचे निर्णय या समाजाला कसे पचतील? नाटकातील संवादानुसार ५० वर्षांनंतर कदाचित लागू होतील असे निर्णय आज घेतलं तर उठणाऱ्या वादळाला सामोरं आज जावं लागणारच.

आई सावित्रीबाई विवाहित पुरुषाशी लग्न न करता तीन मुलींना जन्म देत एकटी सांभाळते...(आजही अशी उदाहरणे फारच दुर्मिळ आहे)

तिच्या तिन्ही मुलींच्या आयुष्यात पितृसत्ताक चाकोरीमुळे वादळ आले आहे.

नाटकात अनेक प्रश्नाना वाचा फोडली आहे ...​पुरुषांच्या अनैतिक संबंध समाज सहज पचवतो ?? मठ्ठ पुरुषाला समाज प्रश्न न विचारता त्याच्या बायकोला लढायला लावतो ??(लग्न टिकवायला द्रौपदी प्रमाणे किंवा मातृसत्ताक पद्धतीनुसार बहुपतित्व आज शक्य आहे ??

हे प्रश्न विद्या वैजयंती विंनी आआपापल्या आयुष्यातील घटनांद्वारे सादर करतात आपल्याला विचार करायला भाग पाडतात.

अशी काळाच्या पुढची नाटके आली तर यामुळे कुटुंबव्यवस्था धोक्यात येईल अशीही नकारात्मक घंटा समाजात वाजू लागतात.पण नाटकातील वैजयंती कुटुंब वाचवते पण स्वतःचे सत्व हरवते केवळ तडजोडीने ती आता जगणार हे एक आजच्या अनेक स्त्रियांचे प्रातिनैधिक उदाहरणही नाटकात आहे हे विसरता काम नये .

विद्या जेव्हा घटस्फोटाची केस लढताना ६- ६ महिने आई वडील दोघांनीही मुल का सांभाळू नये ? एकट्या बाईचीच जबाबदारी आहे का ? हा प्रश्न मांडते तेव्हा तिला एक उलट्या काळजाची आई ठरवलं जाते वडील मात्र इथे नाम निराळेच राहतात .खरंच बाईला तिचे आईपण निभवावे लागते पुरूषाला बापपणाची सक्ती का नाही...किती हास्ययास्पद आहे हे ..

विनीचा मी एकाचवेळी दोन्ही पुरुष का निवडू शकत नाही ? हा प्रश्न तर कुठूनच मेंदूत शिरत नाही यावरचे उत्तर तर लांबच !!

मग अशा प्रश्नासह बाईने करायचे काय ???

तर तिचे निर्णय तिला योग्य वाटतील ते ठामपणे घ्यायचे काळाच्या परिणामाच्या भीतीशिवाय ..हे नाटकाचे मर्म वाटते .

-भक्ती

कॉमी

छान नाटक आहे हे.
भरत जाधव आणि प्रशांत दामले ह्यांची अत्यंत टुकार नाटके पाहून आधीच क्वचित नाटक पाहणारा मी, मराठी नाटकांवर चुकीचे मत डोक्यात घेऊन बसलेलो. हे नाटक पाहून मत बदलले.

ह्यात विनीचा मुद्दा मला जरा "अतिच" वाटला पण तुम्ही म्हणता तसं आपापला निर्णय घेऊन ठामपणे वाटचाल करणे हा संदेश त्यातून मिळतो.

Bhakti

Stranger Things मधला स्टीव्हदादा हॅरिंग्टन Joe Keery चं End of Beginning हे गाणं Spotity US च्या लोकप्रिय गाण्यांच्या यादीत सुप्रसिद्ध गायिका टेलरताई स्विफ्ट ह्यांच्या गाण्याला मागे सारून पहिल्या क्रमांकावर जाऊन बसलं आहे.
दादा सॉलीड गायकही आहे:)

https://youtu.be/Ec08db2hP10?si=pm1zy1fecE3TnR-6

कालपासून स्ट्रेंजर थिंगचा अजून एक एपिसोड येणार या फ्यॅन थेअरीला उधाण आल होत.हो अजून एक भाग येणार तो बिहाइंड द सीन डॉक्युमेंटरी येणार आहे.
one last time. watch the never-before-seen behind-the-scenes documentary on the making of Stranger Things 5. january 12th.

मदनबाण

गाणं आवडलं! इथे शेअर केल्या बद्धल धन्यवाद!

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys

Bhakti

सिनेमाचा परिचय खुप मोठा झाल्याने स्वतन्त्र धागा खाली दिला आहे.
http://misalpav.com/node/53421

मध्यरात्रीचे स्वातंत्र्य (फ्रीडम ऐट मिडनाईट) ही जाळमालिका पाहून संपवली , खरं तर पाश्चात्यांच्या दृष्टीने पाहिलेला आपला इतिहास आवडला! शेवटी जिन्ना आणी गांधी ह्यांच्यात कशी कटुता निर्माण होते वगैरे छान दाखवलं आहे. मस्ट वॉच आहे.
त्यानंतर, जॅकलचा दिवस (the day of jackal) हा सारख्याच नावाच्या पुस्तकावर आधारित थरारपट पाहतोय, अतिशय गुंतवून ठेवणारे कथानक, तीन भाग पाहून झालेत.

जुइ

The Day of the Jackal ही Frederick Forsyth यांची अतिशय गाजलेली कादंबरी आहे, आता नाव निघालेच आहे तर वाचावी म्हणते!

जॅकलचा दिवस अर्थात द डे ऑफ द जॅकल हे जाळमालिका आज अखेर संपली, अतिशय थरारक म्हणावे असे कथानक होते. खूप आवडली. मी स्वतः एक उत्कृष्ट स्नायपर (पब जी मधला :) ) असल्याने फार आवडली! काय ती प्लॅनिंग, काय ते स्नायपर चे शॉट, मुख्य कथानायकाने अतिशय उत्कृष्ट काम केले आहे.

कॉमी

पाताल लोक पर्व पहिले.

ऍमेझॉन प्राईम.

आवडले. बऱ्यापैकी रिॲलिस्टिक कथा वाटली. सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे.

Bhakti

१
शेरलॉक होम्सचे तर करोडो चाहते आहेत.पण काय होईल जर त्याला एक बहिणही असेल तीही त्याच्यासारखीच तरबेज आणि धाडसी!
एनोला होम्स ही एक काल्पनिक कॅरेक्टर आहे, जी अमेरिकन लेखिका नॅन्सी स्प्रिंगर यांनी २००६ मध्ये सुरू केलेल्या "The Enola Holmes Mysteries" या पुस्तक मालिकेत निर्माण केली. या मालिकेत एनोला ही शेरलॉक आणि मायक्रॉफ्टची खूप लहान बहिण (२० वर्षांनी धाकटी) दाखवली आहे.
नेटफ्लिक्सवर खूप लोकप्रिय झालेल्या Enola Holmes १ आणि २ या चित्रपटांमध्ये (मिली बॉबी ब्राउन मुख्य भूमिकेत आहे.
एनोला हुशार, निर्भय आणि लढवय्या आहे! अ‍ॅक्शन आणि हृदयस्पर्शी असे हे चित्रपट आहेत.
स्ट्रेंजर थिंगमुळे मिली ब्राऊन आवडायला लागली आहे.तिचा डॅमसेल हाही फॅन्टसी चित्रपट पाहिला.

जुइ

दोन्ही पाहिले आहेत! आवडले!

Bhakti

यंग शेल्डन -Young Sheldon ,माझी कन्याच हा मालिकेची माझ्यासाठी शोधकर्ती आहे .टी ही मालिका पाहत असताना ,तिच्यासोबत याचे अर्ध्या तासाचे दोनच भाग पाहिले आणि या शेल्डन प्रेमातच पडले.आता आम्ही दोघी याचे रोज एकत्र भाग पाहतो.... तेव्हा हास्यांचा एक कल्लोळच उठतो.
Young Sheldon अमेरिकन कॉमेडी टीव्ही सिरीज -९ वर्षांचा शेल्डन कूपरचे एक जीनियस, पण सामाजिकदृष्ट्या वेगळाच मुलगा आहे.त्याचे टेक्ससमधले जीवन,रोजशी अभ्यासू पण अनेकदा बालसुलभ गोष्टींनी भरलेली धमाल यात आहे. तो हायस्कूलमध्ये लवकर जाते कारण त्याचा बुध्यांक उच्चं आहे त्याच्या कुटुंबाशी आई-बाबा, भावंडे,आजी आणि आजूबाजूच्या पात्रांसोबत त्याच्या गमती जमाती पाहायला मजा येते .साधे जीवन यांच्यात त्याची बुद्धिमत्ता कशी बसते हे मजेदार आणि भावनिक आहे.याविषयी शोधताना कळाले की,Young Sheldon ही The Big Bang Theory प्रीक्वेल आहे, ज्यात शेल्डन कूपर या मुख्य पात्राचे बालपण दाखवले आहे.मी The Big Bang Theory चे नाव केवळ ऐकले आणि त्याचे काही रील्स पाहिले नाही. साधारण जे पूर्वीपासून आंतरराष्ट्रीय मालिका पाहायचे त्यांची खूप आवडती मालिका होती हे समजले.
1

सोत्रि

भन्नाट आहे!

मी माझ्या मुलांबरोबर बिंज वॉचिंग करून सगळे सीजन्स एका लाँग वीकेंडला संपवून टाकले होते.

- (बिंज वॉचर) सोकाजी

Bhakti

माझी लेक आधीच बडबडी आहे.ती सुद्धा माझ्या घरातली शेल्डन आहे.आजच तिला म्हटलं आजीने सूर्याला दूध उतू घातलं आहे पहा..ती म्हणाली "कशाला सूर्य आपल्यापासून कोटी किलोमीटर दूर आहे.तिथून कसा फीस ..फीस दूध पिणार ??खूप वर्षांनंतर सूर्य रेड जायंट होईल.त्याचा आकार इतका वाढेल की तो पृथ्वी
जवळ येऊ शकतो. पृथ्वीवर खूप उष्णता येईल समुद्र उकळतील, आणि पृथ्वी नष्ट होईल .मग कशाला त्याला दूध द्यायचं ???"
मी म्हटलं "बाई आज तरी आजीला तुझं ज्ञान देऊ नको फटके खाशील"
तिचे असे किस्से एकत्र करून मराठी छोटी शेल्डन मालिका होईल .
;);)

जुइ

नेटफ्लिक्स वर आहे का?

Bhakti

हो,आमचा तिसरा सीझन पाहणे सुरु आहे.

Bhakti

आमच्या घरातली शेल्डन आणि मिमो :)
लेक आजीला वेगवेगळ्या विषयातले मार्क सांगत होती .अमक्याला तमुक वगैरे ...
ती म्हणाली "फक्त परिसर अभ्यासाला मार्क्स कमी आहेत "
आजी म्हणाली ,"तु परिसरात फिरताच नाही ,टीव्हीसमोरच असते ,कसे मार्क्स मिळणार ??"
लेक म्हणाली ,"बरोबर आहे ,मी परिसरात अजून फिरायला पाहिजे. "
:);)

Bhakti

फिरोदिया महाकरंडक अहिल्यानगर पाच दिवस चालला ,३० -४० नाटके सादर झाली .मी मैत्रिणीला भेटायला म्हणून खास तिथे गेले .तर फक्त हे शेवटचे एकुलते एक नाटक पाहायला मिळालं "स्वातंत्र्य सौभाग्य "!!हे नाटक खूपच आवडलं होत ,विचारही करता येणार नाही असे ट्विस्ट यात होते .
इतर दर्जेदार नाटके पाहायचे मिसल...याची खंत वाटत होती
विशेष योगायोग असा की या नाटकालाच प्रथम पारितोषिक मिळाले हे नंतर समजलं .त्यामुळे मुख्य विजेता नाटक तर आपण पाहिलं याचा योगयोगी आनंद झाला.
ही एक स्वातंत्र्य पूर्व काळातील गोष्ट एका जोडप्याची गोष्ट आहे. सौभाग्य ह्या संकल्पनेने आणि संस्कारात वाढलेली मुलगी तिच्या समोर स्वातंत्र्याने झपाटलेला तिचा नवरा त्याच्याशी तिचं लग्न होतं. त्याचे जे नातं स्वातंत्र्य आणि सौभाग्य ह्या दोन्ही गोष्टीने पुढे जातं आणि नंतर तिच्या मधे होणारा परिणाम एकंदरीत ह्या सगळ्याची गोष्ट आहे. एका ओळीत सांगायचं झालं तर, त्या काळात बऱ्याच स्त्रिया ह्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडल्या गेल्या आहेत पण प्रत्येकीचं कारण हे देश न्हवतं तर आधी तिचं सौभाग्य होतं.
सादरकर्ते : मुलुंड वाणिज्य महाविद्यालय, मुंबई.

तूर्तास तरी हे केवळ ४७ मिनिटांचे नाटक यु ट्यूबवर आहे .(नंतर ते गैरवापर होऊ नये म्हणून यु ट्युबहून काढून टाकले जाते असे समजले)
नक्की पाहून घ्या !!!
https://www.youtube.com/live/OrkRsl2I0JY?si=2jlhxMYx37WWKRl1

चित्रगुप्त

मजसारख्या दिवसाचे चोवीस तास मोकळे असणाराला सुद्धा दीर्घ मालिकाच काय, दोन -अडीच तासांचा सिनेमा बघण्याचीही चिकटी नाही, तर तिकडे दिवसभर काम, व्यावहारिक जबाबदार्‍या वगैरे असलेले पब्लिक हे एवढे सगळे कसे बघू शकते ब्वा, असा प्रश्न पडला आहे.

काका, वेबसिरीजचे तेच तर वैशिष्ट्य आहे. त्या बघाव्या लागत नाहीतर बघितल्या जातात! आपण फक्त सुरुवात करायची पुढे काय होणार ह्याची उत्सुकता लागून आपोआप तुम्ही पाहत राहता, पाहत राहता नी पाहतच राहता…. तुम्हाला वेळ काढावा लागत नाही वेळ आपोआप निघतो.

काका, वेबसिरीजचे तेच तर वैशिष्ट्य आहे. त्या बघाव्या लागत नाहीतर बघितल्या जातात! आपण फक्त सुरुवात करायची पुढे काय होणार ह्याची उत्सुकता लागून आपोआप तुम्ही पाहत राहता, पाहत राहता नी पाहतच राहता…. तुम्हाला वेळ काढावा लागत नाही वेळ आपोआप निघतो.

Bhakti

आपण चित्रकार कलाकार आहेत.कलेद्वारे अद्वैत अनुभवता.माझ्यासारखीला सिनेमे पुस्तके मालिका पाहणे (अट -ते सर्वोत्कृष्ट पाहिजे) एक अद्वैतच आहे :)

टर्मीनेटर

ह्या आठवड्यात 'Better call Saul' बघायला सुरुवात केली असून जवळपास दिड सिझन पाहून झाला आहे. मस्त आहे!
'ब्रेकिंग बॅड' मधल्या सगळ्यात आवडलेल्या पात्रांपैकी हे एक पात्र असूनही ही सिरीज मी अजूनपर्यंत का बघितली नव्हती हा प्रश्न पडला 😀

ह्या विकएंडला बिंज वॉचिंग करून हिचे सगळे सिझन्स बघून संपवणार 👍

टर्मीनेटर

'लालो' हे नाव परिचयाचे वाटत नाहीये त्यामुळे बहुतेक अजुन एंट्री झाली नसावी...
आज रात्री किमान 2 एपिसोड्स बघीन, त्यात जर एंट्री झाली तर नक्की कळवतो 😀

टर्मीनेटर

"लालो ची एंट्री झाली का? :)"

लाँग विकेंडचा पुरेपूर उपयोग करत "Better call Saul" चे सगळे सहा सीझन्स बघून झाले.
लालो ची एंट्री बरीच उशिरा म्हणजे चौथ्या सीझनच्या आठव्या एपिसोडमध्ये झाली एकदाची 😀
'लालो' हे खलनायकी पात्र भारीच आहे! मी हा आठवा एपिसोड दोन वेळा पाहिला असल्याने चांगलाच लक्षात राहिला, अर्थात तो लालो साठी नाही पण त्यात 'ह्युल'ला जेलमध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी जिमी आणि किम जे काही उपद्व्याप करतात ते पुन्हा पाहण्यासाठी पुन्हा पाहिला 😂
संपूर्ण सहा सीझन्स मधल्या त्रेसष्ट एपिसोड्स पैकी मला सगळ्यात जास्त आवडलेला (विनोदी) एपिसोड हाच आहे!

बाकी सिरीजबद्दल बोलायचे तर साडेपाच सीझन्स पर्यंत खूपच मस्त जमून आली आहे पण पुढे मात्र भरकटल्यासारखी वाटली! शेवट तर अजिबात आवडला नाही, तिथे कथानकाने अक्षरशः 'माती' खाल्यासारखे वाटले. 'क्राईम नेव्हर पेज' वगैरे ठीक आहे, तेच तत्व पाळूनही ह्या सुंदर सिरीजचा शेवट कितीतरी चांगल्याप्रकारे करता आला असता अशी भावना मनात घर करून बसली आहे.

मला मात्र शेवट आवडला! शेवटी तो कबूल करतो की हायसनबर्ग त्यानेच घडवला! त्यामुळे हायसनबर्गपेक्षा मोठा खलनायक सॉल भासला!

टर्मीनेटर

'हायझेनबर्ग कडे रसायनशास्त्राची उत्तम जाण असल्यामुळे उच्च दर्जाचे मेथ तयार करण्याची कला' एवढी एक गोष्ट सोडली तर कुठलेही स्वकर्तृत्व नसते. त्यामुळे एवीतेवी काही महिन्यांत कॅन्सरने मरणारच असलेल्या वॉल्टर व्हाईटला हायझेनबर्ग म्हणून घडवण्यात सॉल सहित अनेकांनी आपापल्या स्वार्थासाठी हातभार लावलेला असतो.

त्याच्यापेक्षा टूको सालामांका , अपंगत्व आलेला डॉन हेक्टर, गुस्तावो फ्रीन्ज हे खरेखुरे खलनायक तर लांबच ठेऊ, पण टोड सारखा भाडोत्री गुंड/मारेकरीही मला कितीतरी मोठा खलनायक वाटतो 😀

त्याच्यात 'खलनायक' म्हणवण्याचे एकजरी लक्षण असते तर पहिले त्याने आपली बायको स्कायलरला गोळी घालून ठार मारलेले दाखवायला हवे होते. तेवढी हिम्मत बायकोच्या ताटाखालचे मांजर असलेल्या ह्या मास्तरकडे नसते हे देखील एकवेळ मान्य, पण सतत उठता-बसता लोकांचे मुडदे पाडणाऱ्या सराईत गुन्हेगार लोकांच्या सहवासात राहणाऱ्या ह्या मास्तराने त्यांच्याकडून तरी हे काम करून घेतले असते तरी मी एकवेळ त्याला खलनायक मानायला आनंदाने तयार झालो असतो 😂

मला ब्रेकिंग बॅड हि सिरीज खूप आवडली असली तरी 'हायझेनबर्ग' हे त्यातले 'एक महत्वाचे पात्र' ह्यापलीकडे जास्त काही वाटले नाही! कदाचित त्याआधी नार्कोज आणि नार्कोज: मेक्सिको पाहिलेल्या असल्यामुळे त्यातल्या मेडलिन आणि कॅली ड्रग कार्टेल्स पुढे आणि 'पाब्लो एस्कोबार' आणि 'मिगेल एंजल' सारख्या ड्रग लॉर्ड्स पुढे 'हायझेनबर्ग' हा शाळा-कॉलेज मास्तर अगदीच 'चिंधीचोर' ड्रग लॉर्ड वाटला असल्याचा तो परिणाम असू शकतो.

तसेच सॉलचे व्यक्तिमत्व उभे करण्यासाठी बेटर कॉल सॉल'च्या सुमारे साडेपाच सीझन्समध्ये खूप मेहनत घेतली आहे आणि त्यावरून 'आपल्या अटी-शर्तींवर स्वतःसाठी अत्यंत सोयीस्कर अशी डील पदरात पाडून घेतलेल्या' सॉल कडून अशी कबुली देण्याचा मूर्खपणा अजिबात अपेक्षित नाही. किमची गोष्ट वेगळी आहे, तिचे पात्र खूप आवडले आहे आणि तीच्या चेहऱ्यावरून तिच्या मनात काय चालले आहे ह्याचा अजिबात थांगपत्ता लागत नाही. तिचे एकदम 'अनप्रेडिक्टेबल' असे स्वभाव वैशिष्ट्य प्रेक्षकांच्या मनावर मस्त ठसवले गेले असल्याने तिचे विक्षिप्त वागणे समजू शकतो, पण सॉल असला काही मूर्खपणा करेल असे खरेच वाटत नाही.

एकवेळ कार्टेलच्या कोणातरी सदस्याने किंवा सॉलच्या गुन्हेगारांना वाचवण्याच्या वकिली डावपेचांमुळे अन्याय झालेल्या एखाद्या व्यक्तीने गोळी घालून त्याला ठार मारलेले दाखवले असते तरी तो शेवट चांगला वाटला असता असे माझे मत!

प्रचेतस

नार्कोज आणि नार्कोज: मेक्सिको पाहिलेल्या असल्यामुळे त्यातल्या मेडलिन आणि कॅली ड्रग कार्टेल्स पुढे आणि 'पाब्लो एस्कोबार' आणि 'मिगेल एंजल'

काय नाव काढलंत राव.
ह्या दोन्ही मालिका अतिशय उच्च दर्जाच्या आहेत.

तुमच्या एंगल ने एंड पाहिला तर खरोखर विचित्र वाटतो. आधी हे लक्षात आले नव्हते. बाकी कीमचे पात्र खरोखर छान झाले आहे.
हायज़नबर्गबद्दल म्हणाल तर तो अगदी फिल्मी, टिपिकल व्हिलन नव्हताच, घरात बायकोसमोर भिगीबिल्ली असलेला पण ड्रग साम्राज्याचा सम्राट अश्या दुहेरी भूमिका तो डोके लावून पेलतो. त्याच्या चाली, कन्व्हेनसिंग पावर, क्रूरता हे सगळे अगदी सहज दाखवले आहे. मी तर फैन झाली हायजनबर्गचा!

कपिलमुनी

सध्या आवरण नावाचे एल भैरप्पांचे पुस्तक वाचले.
एक आधुनिक , पुरोगामी डाव्या विचारांची स्त्री स्वत:च्या धर्माचा , इतिहासाचा शोध घेते यावर आहे.

काश्मीर फाइल्स वगैरे चित्रपटांना प्रोपोगंडा मूव्हि म्हणुन हेटाळले गेले. सध्या ए आर रेहमान छावा चित्रपटाला द्वेषपूर्ण म्हणाला.
पण या गोष्टी इतिहासात आहे तशाच घडल्या आहेत , त्या दाखवणे द्वेषपूर्ण असले तरी सत्यच आहे आणि सत्य दाखवायला कसली चोरी ?
आवरण मध्ये याच लादलेल्या इतिहासाचे बुरखे फाडले आहेत , टिपू केवळ इंग्रजाविरूद्ध लढला म्हणून त्याची हिंदूविरोधी पापे पुसून महान सेनानी दाखवणे. मूळ दिल्लीची ओळख पुसून मुघल ओळख लादणे , हे काशीपासून ते हंपी पर्यंत आहे ,
डावे किंवा इंग्रजी इतिहासकार नंतरचे कॉम्ग्रेसी इतिहासकार हे सगळे राजकीय आहे असा प्रचार करतात . पण मौर्यांच्या काळापर्यंत हीन्दू बहुल सिंधू मध्ये आता औषधापुरता हिंदू का राहीला नाही याकडे दुर्लक्ष करतात .
पुस्तक सुंदर आहे , शेवट अपूर्ण वाटतो पण तो तुमच्यावर सोडला आहे

कांदा लिंबू

भैरप्पांचे आवरण हे पुस्तक माझ्याही संग्रही आहे; अनेकदा वाचले आहे.

हिंदूंच्या नाशाला हिंदूच कारणीभूत आहेत असे वाटते, पुस्तक वाचून.

Bhakti

**द क्वीन्स गॅम्बिट
महिन्याचा एका रविवारी बिंज वॉचिंग झाले.खूपच खिळवून ठेवलं. विशेष करून नायिकेचा अभिनय कमाल आहे.
प्रतिभा खूप मोठी असली तरी व्यसन आणि भावनिक संघर्ष यांच्याशी लढावं लागतं.बेथ हार्मन एक अनाथ मुलगी आणि
तिला मिळालेलं बुद्धिबळ खेळाचे वरदान असे कथानक भावना दुःख स्पर्धा इच्छाशक्ती यांचा सुरेख संगम आहे .

**अगाथा क्रिस्टीज सेव्हन डायल्स-आंतरराष्ट्रीय षड्यंत्र, गुप्त फॉर्म्युला आणि अनपेक्षित ट्विस्ट्सचा आहे.
**द वंडर-विज्ञान विरुद्ध विश्वास,यांच्याभोवती फिरते.
या ठीक ठाक आहेत

अभ्या..

फिर आयेगी हसीन दिलरुबा पाहिला नेटफ्लिक्सावर.
.
हा "हसीन दिलरुबा" २०२१ साली आलेला त्याचा सिक्वल आहे. कास्ट अर्थात थोडी वाढलेली.

तापसी पन्नू (कायतरी सर्जरी केलीय नोज जॉब बहुधा. प्रचंड गंडलेला आहे. मूळची गोड पन्नू एकदम सर्वसामान्य आणि कशीतरीच दिसते आहे. पूर्ण चित्रपट ती आधी कशी दिसायची आणी आता काय करुन घेतलेय ध्यान ह्याची तुलना करण्यातच गेला)
विक्रांत मेस्सी (पहिल्यासारख्याच पाट्या प्लस थोडासा मुमकीन है चा नकली जोष)
आधीचा हर्शवर्धन राणे मेला त्याजागी नवीन आशिक म्हणून सनी कौशल आलाय (भाउ विकी कौशलच्या तुलनेत प्रचंड कॅलिबर आहे त्याच्यात. शिद्दत मध्ये ते जाणवले होतेच पण आवाजाचा पोत आणि अभिनय ह्या जमेच्या बाजू, सामान्य रुप असले तरी भविष्य उज्ज्वल आहे. )
जिमी शेरगिल : अजूनही राजा अवस्थी मधून बाहेर आलाच नाहीये. सोसो
बाकी सीआयडी फेम अभिजीत सारखे इतर थोडेफार पब्लिक.
.
कथा पहिली संपली तिथेच चालू होते.
बायकोसाठी हात तोडलेला आणि जळून मेला अशी बतावणी करुनही जिवंत असलेला रिशू(विक्रांत मेस्सी) वेगळीकडे फरार होऊन आयुस्ष्य जगणारी दिलफेक आणि बिनधास्त आशिक रानी(तपसी पन्नू) ह्यांना एकत्र यायचेय. स्वतःच्यच फॅमिलीला संपवून अनाथ अशी बतावणी करणारा व रानीवर भाळलेला अभिमन्यू (सनी कौशल). जुनी केस अनुभवलेला इन्स्पेक्टर आणि मेलेला हर्षवर्धन राणे ह्याचा पोलीसात असलेला काका मॉन्टू (जिमी शेरगिल) रानी आणि रिशू दोघानाही हुडकताहेत. लिखित पुस्तकरुपाने दिसणारा रेल्वे स्टेशन छाप पॉकेटबुक लेखक दिनेश पंडीत च्या कथेचे रेफरन्सेस वापरत कथा पुढे सरकते आणि अपेक्षित अशा वळणावर संपते.
संवाद चटकदार आहेत, सनी कौशल वगळता अभिनय सोसो सगळ्यांचाच. सस्पेन्स फार नाहिये, लूपहोल्स प्रचंड आहेत, काही करामती केवळ अशक्य अशा कोटीतल्या आहेत पण पहिली हसीन दिलरुबा आवडणार्‍या प्रेक्षकांना थोडाफार विरंगुळा अशी "फिर आयेगी हसीन दिलरुबा" आहे.

Bhakti

1

अनेकदा 'फील गुड मुव्ही' असं लिहुन सिनेमे शोधून पाहावे.नितांत सुंदर मनाचं तळ शांत होणारे काही सिनेमे हाती लागतात.

"प्राइड अँड प्रेज्युडिस" १९०० च्या शतकात इंग्लंडमधली प्रतिभावंत लोकप्रिय लेखिका जेन ऑस्टेनची सर्वात लोकप्रिय कादंबरी आहे.त्या काळात स्त्री लेखिका दुर्मिळच त्यामुळे तिच्या पुस्तकांवर "लेडी रायटर " असे लिहिले जात.तिने Sense and Sensibility ,Pride and Prejudice ,Mansfield Park ,Emma ,Northanger Abbey ,Persuasion अशा वेगळ्या धाटणीच्या अनेक कादंबरी लिहिल्या.पण सर्वात जास्त लोकप्रिय ठरली ती "प्राइड अँड प्रेज्युडिस"!!

पुस्तकांमधून, चित्रपटांमधून आणि टीव्ही रूपांतरांमधून पुन्हा पुन्हा सांगितली आणि नव्याने सादर केली गेली आहे.तिने अनेक नवीन कथानकांना प्रेरणा दिली आहे. तिच्या नायिका फेमिनीसम आणि प्रेम यांचे अद्भुत मिश्रण असत."प्राइड अँड प्रेज्युडिस" ही एका क्लासिक थीमची सुरुवात मानली जाते. ज्यात सुरुवातीला दोघे नायक नायिका एकमेकांचा तिरस्कार करतात असे वाटते, पण शेवटी ते चक्क एकमेकांच्या आकंठ प्रेमात पडलेले असतात.जो राईट २००५ मधील हा सिनेमा ऑस्करसाठी चार नामांकनाचा मानकरी ठरला.यासाठीचे श्रेय यातले कलाकार (पैकी नायिकालाही उत्कृष्ट नायिकेचे नामांकन होते),सिनेमाटोग्राफी,पोशाख यांना तर होतेच.परंतु याची मोठी शिलेदार होती पटकथालेखिका डेबोरा मोग्गाच यांनी पटकथेवर दोन वर्षांहून अधिक काळ घालवला.

१९व्या शतकाच्या सुरुवातीच्या इंग्लंडमध्ये घडते. नायिका एलिझाबेथ बेनेट,स्वतंत्र विचारांची आणि थोडी जिद्दी मुलगी आहे. तिला कुटुंबात ५ बहिणी आहेत. आईची एकच इच्छा असते की सर्व मुलींचे लग्न लवकरात लवकर श्रीमंत आणि चांगल्या घराण्यातील पुरुषांशी व्हावे.मिस्टर बिंगले आणि जेन बेनेट यांच्या प्रेमाची ,लग्नाची गोष्ट पुढे सरकत असतानाच त्यांचा मित्र मिस्टर डार्सी एक अतिशय श्रीमंत पण अहंकारी वाटणारा माणूस कथेचा एक प्रमुख पात्र होतो. एलिझाबेथ आणि डार्सीची पहिली भेट होते.पण डार्सीच्या अभिमानी 'वागणुकीमुळे' pride आणि एलिझाबेथच्या पूर्वग्रहांमुळे 'prejudice' त्यांच्यात गैरसमज निर्माण होतात.पुढे कथेत अनेक मजेशीर,काही गंभीर,हृदयस्पर्शी घटना होतात.शेवटी दोघेही आपल्या चुका ओळखतात, गैरसमज दूर होतात आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.

या कथेमध्ये तेव्हाच्या स्त्रियांनाही 'लग्न ' योग्य वयात व्हायला समस्या असत हे पाहून आश्चर्य वाटले.अनेक स्त्रियांच्या लग्नाची ही कथा अनेक सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधते. त्यातही नायिका एलिझाबेथ हिची हिम्मत ,स्पष्टवक्तेपणा ,सहजता तरीही वागण्यातली शिष्टचारता मंत्रमुग्ध करते . एलिझाबेथला समजले नसले तरी डार्सी हा तिच्यासाठी खूप खूप योग्य आहे हे चाणाक्ष प्रेक्षकांना नक्कीच संमजते.आणि आता तो कसा तिचा गैरसमज कसा कुठवर दूर करणार याची उत्सुकता असते.

"You must allow me to tell you how ardently I admire and love you" ते "You have bewitched me, body and soul" असा डार्सीचा झालेला प्रेमळ बदल फार रोमँटिक आहे.

लिझी शेवटी जेव्हा वडिलांना सांगते ,"I do love him. I love him very much. Indeed he has no improper pride. He is perfectly amiable. You do not know what he really is."

तेव्हा वडील आनंदून म्हणतात ,"I could not have parted with you, my Lizzy, to any one less worthy."

ते तिला मान्यता देतात आणि आनंदमिश्रित खूप खूप सुहास्य करतात.सिनेमा संपतो पण आपल्याही मुखावर सहज सुहास्य उमलते.

-भक्ती

टर्मीनेटर

'फील गुड' मुव्हीज बघायला आवडत असतील तर जिओ हॉटस्टारवर 'सर्वम माया' (Sarvam Maya) हा मूळचा मल्याळम सिनेमा बघण्याची शिफारस करतो! तो मराठी सहित सात भाषांत उपलब्ध असला तरी शक्यतो हिंदीत बघावा, मला एकदा बघायला चांगला वाटला आहे!

खूप काही अभिनव प्रयोग वगैरे ह्यात केलेला नाहीये पण बरेचसे मल्याळम चित्रपट चांगले असले तरी ते भयानक संथ असल्यामुळे (किंवा कळकट्ट पात्रांमुळे) कंटाळवाणे वाटतात तसे इथे होत नाही. त्यामुळे प्लेबॅक स्पीड न वाढवताही (गाणी पळवत) बघता येईल. आणि हो, ह्यातली 'माया''(रिया शिबू) कशी वाटली ते हा चित्रपट पाहिल्यास किंवा आधी पाहिला असल्यास अवश्य कळवा 🙂

Bhakti

ट्रेलर पाहिला ,आवडला. आता सिनेमा पाहते :)

टर्मीनेटर

घरच्या सगळ्यांनी एकत्र बसुन पहायलाही हरकत नाही, अगदी गिरिजाही बघु शकेल असा आहे!
त्याला 'हॉरर' हा टॅग उगाचच लावला आहे 😀

अजुन तीन सिनेमे सुचवतो. आधी पाहिले नसल्यास सवडीने ते ही पहा...

१) 'पासंगा-२'(Pasanga 2 - मूळचा तामिळ) ह्याची कथा पण चांगली आहे आणि सुरिया आणि अमला पॉल ची जोडी नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या भूमिकेत छान वाटली. (नर्मविनोदी, फील गुड, Child psychology)
हा सिनेमा 'अ‍ॅमेझॉन प्राईम' आणि 'युट्युब' वर आहे.

२) 'श्रीनिवासा कल्याणम' (Srinivasa Kalyanam - मूळचा तेलुगू) नितीन आणि राशी खन्ना. (फॅमिली व्हॅल्यूज, फील गुड मुव्ही)
हा हिंदीत 'अ‍ॅमेझॉन प्राईम' आणि 'युट्युब' वर आहे.

३) 'हर दिन दिवाली' (Prati Roju Pandage - मूळचा तेलुगू) साई धरम तेज, राशी खन्ना आणि सत्यराज. (फॅमिली व्हॅल्यूज, फील गुड मुव्ही)
हा हिंदीत 'अ‍ॅमेझॉन प्राईम (MX Player)' आणि 'युट्युब' वर Free आणि जिओ हॉटस्टारवर फक्त तेलुगूत आहे.

प्रचेतस

मध्यंतरी नेटफ्लिक्सवर विजय सेतुपतीचा 'महाराजा' पाहिला. अत्यंत भारी रहस्यपट. खिळून पहावा लागतो. जागोजागी क्लू पेरलेले आहेत.

स्वधर्म

साध्यासुध्या नायिकेचा संघर्ष खूप छान दाखवलाय. मला साध्या लोकांशी रिलेट होणारे सिनेमे आवडतात. म्हणून हिंदी अनेक वर्षांनी एखाद दुसराच आवडतो (मल्होत्रा खानदान, पापा का इंपोर्ट एक्स्पोर्ट का बिजनेस, स्विझर्लंडमध्ये उगीचच स्थळदर्शन इ. इ. सहन करू शकत नाही)

साई पल्लवी कधीच मेक अप करत नाही असे ऐकले होते. हॅट्स ऑफ त्यासाठी.

टर्मीनेटर

'गार्गी' बघायची तुमची इच्छा असेल(च) तर 'SonyLIV' वर आहे. खरंतर साई पल्लवी कितीही चांगली अभिनेत्री आणि उत्कृष्ट नृत्यांगना असली तरी मला ती कुठल्याही अँगलने हिरोईन मटेरियल वाटत नसल्याने आणि असले लो-बजेट चित्रपट बघायला बिलकुल आवडत नसल्याने माझी हा चित्रपट बघण्याची अजिबात इच्छा नव्हतीच. पण बायकोला बघायचा होता म्हणून मागे एकदा बघायला घेतला होता पण वरील दोन्ही कारणांच्या जोडीला हा चित्रपट 'संथ वाहते कृष्णामाई' छाप स्लो असल्याने काही मिनिटांतच कंटाळून दुसऱ्या उद्योगाला लागलो होतो पण बायकोने मात्र हुंदके देत साश्रुनयनांनी तो पूर्ण पाहून आपण संवेदनशील वगैरे असल्याचे प्रमाण दिले होते.

मला ह्या बाबतीत कोणी 'असंवेदनशील. अमानुष' वगैरे म्हंटले तरी माझी काहीही हरकत नसते, पण असले पकाऊ 'इमोशनल अत्याचार' पाहण्यापेक्षा आपला वेळ पक्के कमर्शिअल मनोरंजक चित्रपट पाहण्यावर खर्च केलेलाच बरा वाटतो बुवा!

(तुम्हालाही 'गार्गी' बोरिंग वाटेल ह्याची मला खात्रीच आहे, पण तुम्ही बघितलात आणि काही वेगळे मत बनले तर ते ऐकायलाही नक्कीच आवडेल 🙂)

प्रचेतस

तुम्ही केलेल्या वर्णनानुसार गार्गी मला आवडणार नाही असेच दिसते :)
बाकी किष्किंधाकांडम हा अतिशय संथ मात्र जिद्दीने शेवटपर्यंत पाहिला होता आणि शेवटी शेवटी आवडला होता.

प्रचेतस सर, गार्गी सुरुवातीपासून एंगेजिंग आहे, नक्की पहा आणी कळवा कसा वाटला ते.

स्वधर्म

या धाग्यावर एकदम आजच आलो. सॉरी. मी गार्गी अ‍ॅमेझॉनवर पाहिला होता असे आठवते. खूप दिवस झाले.

बाकी तुंम्हाला न्यूटन हा राजकुमार रावचा सिनेमा आवडला होता का? मला तो खूपच आवडला होता. टर्मिनेटर भाऊ तुंम्ही सॉलिड पिसं काढली आहेत असल्या सिनेमांची. म्हणून आमचे दोन पैसे हलकेच घ्या:
आपला हिरो कधी एकदा जातो आणि सोळा गुंड आणि व्हिलनचे दात घशात घालतो अशा प्रकारची उत्तेजना हवी असेल तर गार्गी तुंम्हाला आवडणार नाही. त्यासाठी रजनीकांत बघा बेष्टपैकी. 'हिरॉईन मटेरियल' पहायचं असेल तर आवड आपली आपली. मला लो बजेट = बोअर आणि हाय बजेट = भारी असे काही वाटत नाही. उलट मला हाय बजेट सिनेमे विनोदी वाटतात म्हणून कधीकधी जरूर बघतो.

सामान्य माणसाने शांतपणे कायद्याच्या कक्षेत राहून अन्यायाचा प्रतिकार करणे, चांगल्यावरचा विश्वास न गमावता समाजाला तोंड देत राहणे आणि शेवटी सत्याजवळ पोहोचणे असा प्रवास कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता, अगदी उत्कंठापूर्ण पध्दतीने दाखवला आहे. बर्‍याचदा हा सिनेमा वाटतच नाही, आपल्या घरासमोरच काहीतरी घडतंय असं वाटत राहतं.

प्रचेतस तुंम्ही जरूर बघा आणि कसा वाटला ते सांगा.

टर्मीनेटर

महाराजा मस्तच आहे!
मला विजय सेतुपती हा अभिनेता म्हणून खूप आवडतो. 'इझी अ‍ॅक्टिंग' कशाला म्हणतात ह्याचा तो एक आदर्श नमुना आहे.
लीड रोल मधले त्याचे जवळपास सगळे चित्रपट पाहिलेत (त्यात काही तद्दन भिकार चित्रपटही आहेत), आणि सुरुवातीच्या काळात तो अगदी दुय्यम भूमिका करायचा ते ही पाहिलेत. धनुष 'हिरो' असलेल्या एका जुन्या चित्रपटात त्याला व्हीलनच्या गॅंग मधल्या सामान्य पंटरच्या भूमिकेत पाहून हसूही आले होते 😀

प्रचेतस

सेतुपतीचे बरेचसे चित्रपट भिकारच आहेत. आता आता त्याच्या क्षमतेला न्याय देणारे सिनेमे येताहेत असे दिसते.

Bhakti

छान आहे, रियाने मस्तच काम केलय.नायिकेने विदाऊट मेकअप असूनही केवळ तिच्या रिफ्रेशिंग अभिनयाने खिळवून ठेवलं. पण शेवट समजला नाही.तिला आवडणारा दाढीवाला तोच??
पण संथच वाटला,सिनेमा खूप पळवला :)

टर्मीनेटर

पण शेवट समजला नाही.तिला आवडणारा दाढीवाला तोच??

शेवट अशा प्रकारे कल्पिता येऊ शकतो...
प्रभेंदू हा तोच (म्हणजे जिवंतपणी तिच्या मनातला प्रियकर) असावा पण आधीच्या आई-वडिलां बरोबरच्या संभाषणात ती त्याला बंगलोरमध्ये भेटल्याचे म्हंटले होते, ते फोनवर संपर्कातही असतात. पण प्रभेन्दुला हे काहीच माहित नसल्याचे दाखवले आहे म्हणजे हा 'तो' नसावा.

प्रभेंदूचा काका त्याला सल्ला देतो त्याप्रमाणे तो तिच्या घरच्यांना भेटायला जातो. मायाने आईला तिच्या मनातल्या प्रियकराचे जे वर्णन सांगितलेले असते ते योगायोगाने प्रभेन्दुला तंतोतंत लागू पडत असल्याने तो तिच्या आईला आपण तोच असल्याचे सांगत असावा. आणि (मेल्यानंतर) माया खरंच प्रभेन्दुच्या प्रेमात पडली असल्याने त्याच्या (तिच्या आईला दिलेल्या खोट्या) कबुलीने तिला मुक्ती मिळाल्याचे त्या हवेच्या प्रतीकात्मक स्पर्शाने दाखवले असावे.
मला हा शेवट लॉजिकल वाटतो आहे!

पण संथच वाटला,सिनेमा खूप पळवला

हा हा हा... 😀
संथ असणे हे मल्याळम चित्रपटांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तरी हा त्यातल्यात्यात सुपरफास्ट आहे म्हणू शकतो, नाहीतर संथपणाचे एकसे एक रेकॉर्ड्स त्यांनी नोंदवून झाले आहेत. प्लेबॅक स्पीड १.५ X केल्याशिवाय ते बघणे माझ्यासाठी अशक्य ठरते.

जुइ

त्यावेळी चित्रपटगृहात पाहिला होता.

Bhakti

सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय???(कोणाला आपल्याबद्दल काही वाटलं तरी बदलु नये ,हा बेसिक नियम मान्यच असेल असे..:))
माहिती अधिक झाल्याने इथे स्वतंत्र धागा दिला आहे.
http://misalpav.com/node/53480

Bhakti

धुरंधर नेटफ्लिक्सवर आलाय, लाभ घ्यावा.कथेत खूपच नावीन्य आहे.तीन-चार पार्ट तरी व्हायला पाहिजे.

Bhakti

1
प्रेमाला केवळ भावना म्हणून सिनेमांत सादर करणे खूप दुर्मिळ आहे. त्याच्याभोवती संघर्ष, प्रतिशोध,एकाकी लढा असे धागे कथा म्हणून गुंतलेले असतात.
पण अशा कथासूत्रांत "साबर बोंड" (कॅक्टस पिअर्स) हा प्रेमाचा सिनेमा अडकत नाही.गोष्ट जगात सहज मान्य नसणाऱ्या "समलैंगिक तरुणांची"!पण सिनेमा इतक्या सहजतेने हॆ समलैंगिक नातं आपल्यापर्यंत पोहचवतो की वाटत "का बर प्रेम देणाऱ्या यां नात्याला बोल लावतो,यांच्याही भावना जाणून घेत नाही.लग्नासाठी ढकलून कोणत्याही मुलीचे/मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याऐवजी, अशा लैंगिकता पुढे येऊन स्वीकार करणाऱ्यांना समाज दबावाशिवाय सामावून घेत नाही?
वडिलांच्या मृत्यूनंतर आनंद अंतिम क्रियाकर्मसाठी गावाकडे जातो. तिथे त्याचे वय उलटल्यामुळे लग्नाविषयीं गावाकडचे त्याला सतत विचारत राहतात. तेव्हा आनंदला त्याचा लहानपणीचा सवंगगडी बाळ्या भेटतो. बाळ्याही याच लैंगिक ओळखीचा आहे. ग्रामीण भागातल्या तरीही मधेच शुष्क बाभाळी, एवलस तळ, डेरेदार झाड्याच्या पानाची सळसळीतले ते दोघे अशी गोंगाटविरहित फ्रेम दाहक विषय आपल्यापर्यंत शांतपणे आणून सोडते.
यां सिनेमातल मर्म घ्यायचं असलं तरी काय??
उत्तर -"स्वीकार"
आपल्या भावनांचा स्वीकार, समोरच्याच्या भावनांचा स्वीकार हॆ एक मूल्य आहे.
आनंदला त्याचे आईवडील आहे आहे तसा स्वीकारतात त्यामुळे त्याच्या भावनांना सुरक्षा,प्रेम मिळते. बाळ्यालाही मग ती सुरक्षा मिळते. एक प्रेमाच "नातं" समाजाच्या नकळत सुरक्षित होतं.

तरल मनोवृत्तीच्या पब्लिक ने प्राईम व्हिडिओ वर नुकताच आलेला " ८ ए. एम. मेट्रो' हा चित्रपट बघावा अशी आवर्जून शिफारस करतो.

कपिलमुनी

katwe

हा चित्रपट आवर्जून बघा ! सत्यकथेवर आहे .
यावर स्वतंत्र धागा काढायचा आहे.

विजुभाऊ

काल आपला आवडता हीरो अमर विश्वास अ‍ॅमॅझॉनवर पाहिली
https://www.amazon.in/minitv/tp/234bac87-44a3-4f3a-a6b1-30c2debf8c4a
सुशिंची स्टार हंटर ही कादंबरी वाचली होती.
तीचे चित्राट स्वरूप पहाताना कसे वाटेल हा प्रश्न होता
पण सिरीयल आवडली.
कादंबरी वाचण्यातली उत्सुकता सिरीयल पहातानाही अनुभवली.

मूकवाचक

अमर विश्वास आणि बॅरिस्टर दिक्षीत या पात्रांना बराच वाव होता, त्या तुलनेत मोहिनी, गोल्डी या व्यक्तिरेखा पहिल्या सिझनमधे फारशा वेधक वाटल्या नाहीत. ही उणीव पुढे भरून निघेल, त्यामुळे या मालिकेचे आणखी बरेच 'सीझन्स' यावेत अशी आशा आहे.

Bhakti

In the Blink of an Eye हा चित्रपट मानवजातीच्या अस्तित्वाचा, भावनांचा आणि वारशाचा अत्यंत वेधक आणि तत्त्वचिंतनात्मक प्रवास दाखवतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन Andrew Stanton यांनी केले आहे, यापूर्वी Finding Nemo आणि WALL‑E सारखे भावनिक आणि विचार करायला लावणारे चित्रपट त्यांनी दिले आहेत.

WALL-E हा बालपणीचा एक अविस्मरणीय अनुभव होता,विशेषतः तो Star Movies वर वारंवार लागायचा आणि एकाकीपणा, प्रेम आणि आशा यांची सुंदर कथा सांगायचा. त्याच भावनिक आणि तत्त्वज्ञानात्मक शैलीची झलक In the Blink of an Eye मध्येही दिसते.

चित्रपटातील तीन काळात मानवाची कथा फिरत आहे.मानवजातीचा प्रवास या चित्रपटात मानवाच्या इतिहासातील तीन महत्त्वाचे टप्पे परस्पर गुंफलेले दाखवले आहेत

भूतकाळ (४५,००० BC) Neanderthal आदिमानवाचा संघर्ष, अस्तित्वासाठीची झुंज आणि कुटुंबाची सुरुवात, कशा प्रकारे ते होमो सेपीयन्सशी भेटतात, सहकार्य सुरु होते.

वर्तमानकाळ -एक वैज्ञानिक संशोधक, जो विश्वातील रहस्ये आणि मानवी अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत राहतात.

भविष्यकाळ -मानव दुसऱ्या ग्रहावर वसाहत निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, जिथे अस्तित्व, वारसा आणि मानवी ओळख पुन्हा निर्माण होते.

या तिन्ही कथांमध्ये एक समान धागा आहे.
एकाकीपणातून कुटुंबाकडे, आणि कुटुंबातून मृत्यू व वारशाकडे जाणारा प्रवास.

चित्रपट विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच मानवी भावनांचाही विकास दाखवतो. तंत्रज्ञान बदलते, काळ बदलतो, पण प्रेम, भीती, आशा आणि वारसा यांसारख्या मूलभूत भावना कायम राहतात.हा या चित्रपटाचा मुख्य संदेश आहे.
OTT- Disney Jio Hotstar