जे न देखे रवी...

उर्जा चक्र

Primary tabs

सर्व रसिकांचे आणि फॅन्स चे कविता करावी या आग्रहासाठी अनेक आभार!
खूप काळापासून माझी कविता ओव्हरड्यु होती हे मी मान्य करतो. ही कविता जरा उशीराच टाकली गेली हे मान्य आहे.
आपण केलेल्या वारंवार आठवणीमुळे शेवटी ही कविता पाझरली आहे.

काव्याचा आनंद घ्यावा!

तांत्रिक विलोपन

स्पंदन संवेग विभव हे संचलन
स्थित्यंतर रोध प्रवेग प्रचालन
उत्सर्जन दाह जडत्व विलोपन
बीजकण न्यास संहती संरोपण

भूमिती रेख विन्यास परिमापन
वक्रीय भार का विरुपण मापन
पृष्ठभागावरी स्राव नि निक्षेपण
शृंखला सूत्र हे प्रगामी विलेपन

ध्रुवीय भार ऋणाग्र संमीलन
अणुगर्भी संमिश्र वेग प्रक्षालन
विद्युत चाप नि तीव्र प्रज्वलन
तंतुमय जाळ हे सघन प्रवलन

नाद हा शुष्क निर्वाती संकलन
यंत्रांश सांधे सूक्ष्म प्रक्षालन
अंतिम बिंदू नि सत्य साक्षांकन
स्थितीस्थापकत्व हे सम संलक्षण

कांदा चरतांना नयनी का पाझरण
संसारी विरे शास्त्रीय दळणवळण
शब्द ते ऐकता आठवले विस्मरण
काव्य नको कानाचे जळे उपकरण

-निनाद
२० जानेवारी २०२६