जे न देखे रवी...
अभंग
Primary tabs
संसदेत नाही । फिरकले पायी ।
महिलांच्या ठायी । धाक वाटे ।।१।।
जुने मढे सारे । काढिले बाहेरी ।
नाव नेहरूंचे । घेती सदा ।।२।।
एपस्टिन यादी । येईल बाहेरी ।
हीच भीती उरी । दाटलेली ।।३।।
शिक्षण, बेकारी । तशी महागाई ।
बोलणेच नाही । विषयांवर ।।४।।
आत्महत्या करी । राजा शेतकरी ।
जंगले व्यापारी । लुटविती ।।५।।
निवडणुकीवेळी । गोड गोड बोली ।
वचनांची झोळी । रिकामीच ।।६।।
सेवा तीर्थ नाव । ध्यानी नाही भाव ।
जनहिती ठाव । फेकीला हा ।।७।।
संसदेचा वेळ । वायाचि गेला हा ।
'दिलीप' म्हणे पाहा । कुणाकडे? ।।८।।
एक काव्य / रचना म्हणुन मस्त जमलं आहे.
पाकृ श्रेष्ठ अशा गणपाची दाद मिळाली.
अभंग सार्थकी लागले.
धन्स गंपा.
-दिलीप बिरुटे
चक्क बल्लवाचार्य गणपा??? मित्रा, अरे अधनं मधनं तरी पाकृ टाकत जा. मान्य आहे की मी एकही ट्राय नाही केली. पण तुझ्या नीटनेटक्या पाकॄ वाचायचा / बघायचा काय मझा असतो यार. तब्येतपाणी, घरची मंडळी खुशाल?
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
अहाहा,
.
बुडताचि वह्या । येई ते विमान ।
'अभ्या' विनवी सरा । दीनवाणे ।।७८६।।
।।७८६।।
🤣 🤣 🤣
- (rofl झालेला) सोकाजी
अभ्यासेठ.. भारी.
-दिलीप बिरुटे
हाहा! एक नंबर!
दादानु,
ऐवजी "काढताचि वह्या" असे असायला हवे असे वाटते. वह्या एकदा बुडवल्यावर विमानाची लगेच गरज पडत नसावी, हे माझे वैयक्तिक मत.
सं - दी - प
यू आर म्हणिंग राईट सॅन्डीबाबा.
.
मला वाटलं ‘दिलीप’ काहीतरी उपाय दाखवून त्याकडे पाहा म्हणेल ;)
- (हलकेच घ्या असे म्हणणारा) सोकाजी
भक्त म्हणे विसरा नाव ते एपिस्टना
पाहा आता आणला हा टिपू सुलताना!!
:) :)
प्लीज भक्त ऐवजी भक्ती चुकूनही वाचू नका,_/\_
लै फॉर्मूले आणतात हे लोक.
तर अभंगातील चरण असे.
भक्त म्हणे नाव । सोडा एपिस्टन ।
आणला टिपू हा । सुलतान ।।९!!
-दिलीप बिरुटे
( अभंगात रमलेला )
अभंग आणि प्रतिसाद दोन्ही भारी..
:) आवडला!:)
व्वा, भारीच की बिरुटे सर.
'दिलीप' म्हणे पाहा । 'राहुल'कडे !
लै हसलो, चपखल आहेत :)
आवडले. भारी.
असेच म्हणतो!
@दिलीपराव
मन की बात | असो मना आत |
सांगाया सुरुवात | करो नये ||
काही मेंबर | जणू इको चेंबर |
जाने ते डिसेंबर | भुंकिताती ||
वह्या लिहु.उद्या दुपारी.
दिलीप म्हणे ,वाया जाऊ त्या परी
मस्त..
आपले आभार ।
काय मी मानावे ।
डोळे हे भरून ।
आले आता ।।
अभंग रचावे ।
ऐसे निरंतर ।
'दिलीप' म्हणे हा ।
भाव मनी ।।
-प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(जालावरील 'वार'करी
मस्त!
हा घ्या रुमाल, डोळे पुसा!

- (हभप) सोकाजी
हा घ्या हो रुमाल । डोळे हे पुसावे ।
हसू उमलावे । 'सोत्रि' म्हणे।
-दिलीप बिरुटे
( अभंग वृत्त शिक्षक )
स्वतःचीच आरती | करावी जाऊन
सेल्फी काढावी | इव्हेंट पाहुन
कोण दलित | कोण ब्राह्मण
आपणच महान | सागंतसे अजैविक
फेकावे जोरात | बोलावे मिठास
जीएसटी लावोनी | लुटावे जनास
कोणाता स्ट्रोक | कोण मारतो
भिकेस लागतो | सामान्य माणुस
हिंदूत्वाचे घेऊन सोंग | फसावावे जनास
चढवतो चादर | ख्वाजा चरणी
नौटंकी करावी | रोज नवनवी
फुकावे कोट्यावधी | फीत कापोनी
बाण म्हणे आज | ओळखावे सोंगास
काळ योग्य पाहोन | हकलावे मुर्खास
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya... - (8K)
बंधूंच्या युती | आता ते फूटी|
ढोंगाला सुटी | मराठी भाग्य ||
जनतेने नाकारले |संख्या ना साकारले |
कडू कारले|विरोधी नेता ||
क्लिनचीट चे पेव |जज ऐकमेव|
चालू द्या देवघेव | 'देव' आशिर्वाद ||
विमान अपघात | नाही घातपात |
नको अन्य बात |वदले साहेब ||
करमचंद जासूस | तर्क मागमूस |
रोज नवे ऊस | चर्चा गुऱ्हाळासी ||