Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'

श — श्वेता२४, Sat, 03/07/2026 - 16:42
अक्षरांचे पंख होऊनी परकी मला मी प्रश्न आज विचारते बेहिशेबी जीवनाचा ताळमेळच मांडते का कला साहित्य सारे ठेविले वेशीवरी अन् कुणाची पत्नी होऊन माप हे ओलांडते त्या नळाचे गीत सोबत ताल साधे भाकरी तान्हुल्याचा गोड चेहरा चंद्र म्हणूनी पाहते चांदण्यांचे शब्दमोती विखुरले दारी सडा कल्पना सारूनीही घर लख्ख माझे झाडते सोडुनी मज अन्य सर्वांना इथे प्राधान्य पण मीच मजला उचलूनी मग अग्रस्थानी ठेवते! अक्षरांचे पंख मजला हार का मग मानू मी? घेउनी स्वप्ने आभाळी मुक्त मी झेपावते...!! — श्वेता माईणकर सूर्यवंशी © 2026

प्रतिक्रिया द्या
426 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ब
बाजीगर Sun, 03/08/2026 - 05:20 नवीन
आपली ही अतिसुंदर कविता वाचून इंदिरा संत यांची आठवण झाली. यात तुम्ही सर्व च समावेशले आहे, की कशी एक स्त्री आपले प्रतिभेचे पंख मिटून घरट्यात समर्पित झाली आहे, आपली उडान अर्पण करून. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sun, 03/08/2026 - 11:05 नवीन
आपला प्रतिसाद प्रोत्साहन देणारा आहे...मनःपूर्वक धन्यवाद--/\--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर
क
कंजूस Sun, 03/08/2026 - 07:06 नवीन
परिस्थितीला भेदून आशावादी आणि आनंदी होण्याची कल्पना आवडली. जगात विविध देशांत स्त्रियांना जे स्वातंत्र्य आहे त्यात भारत अगदी वरती आहे. फक्त त्यांनी पाऊल पुढे टाकायचे आहे.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sun, 03/08/2026 - 11:06 नवीन
आपल्या प्रतिसादाबद्दल व कविता प्रकाशित करण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 03/09/2026 - 07:32 नवीन
छान आवडली रचना. लिहिते राहावे. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 03/09/2026 - 08:09 नवीन
आपल्याला रचना आवडली हे वाचून आनंद झाला. आपल्या मार्गदर्शन व प्रोत्साहनासाठी आभारी आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/09/2026 - 08:35 नवीन
कविता आवडली. शीर्षक अजूनच आवडले.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 03/09/2026 - 14:09 नवीन
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद! __/\__
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा