Welcome to misalpav.com
लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
या कविता महिला दिवससाठी लिहल्या होत्या. पण सौला हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करावे लागले होते. आता ती ठीक आहे. त्यामुळे कविता टंकायला आज फुरसत मिळाली. सर्व स्त्रियांची क्षमा मागून : (1) महिला दिनी बायको म्हणाली, आज चहा तुम्हीच करा, मी नाश्ता मागवते स्विगीवरून जरा. दुपारी आदेश दिला, आज तुम्हीच भांडी घासा, मी जेवण मागवते झोमॅटोवरून जरा. संध्याकाळी मी कपडे सारे धुतले तिने पिझ्झा मागविला डॉमिनोजवरून जरा. रात्री शेवटचा हुकूम दिला, "आता तुम्ही बिछाना लावा..." मनात शंकेचे काहूर उठले म्हणालो, महिला दिवस सरला आता, रात्र मिलनाची मलाच, साजरी करू दे आता ! (2) बायको रागाने म्हणाली, आज मी माहेरी जाणार. मी आनंदाने म्हणालो, ओला बुक करून देतो. दुसऱ्या क्षणी डोक्यावर टेंगुळ माझ्या उमटले चरणांवर तिच्या मी नाक पुन्हा घासले. (3) गृहलक्ष्मीच्या खिश्यात जातो महिन्याचा पगार(पेन्शन), माझ्या खिश्याची मात्र रोजची उपासमार. (4) महिला दिनी ती म्हणाली मी अर्धांगिनी आहे तुमची मी म्हणालो, साफ खोटे आहे! तू तीन चतुर्थांश आहे, मी फक्त एक चतुर्थांश. * सौ. माझे लेखन कधीच वाचत नाही.