पाककृती

रवा इडली

Primary tabs

साहित्य: एक वाटी अख्खी उडीद डाळ (साल नसलेली), अडीच वाट्या जाड रवा, मीठ, एक टेबलस्पून तेल, पाणी

कृती : उडीद डाळ किमान पाच तास पाण्यात भिजवा. नंतर डाळ वाटून घ्या व पाणी घालून पातळ करा.
एका कढईत रवा भाजून घ्या पण रंग बदलू देवू नका. रवा कोमट झाल्यावर वाटलेल्या डाळीच्या मिश्रणात घाला.
कालवून घ्या व पाण्याचं प्रमाण गरज वाटल्यास याचवेळेस वाढवा. मिश्रण पातळ असले पाहीजे कारण रवा नंतर पाणी शोषून घेतो.
चवीनुसार मीठ व एक टेबलस्पून तेल घाला. नीट मिसळून उबदार जागी ठेवून द्या.
साधारण आठ ते दहा तासात पीठ फुगून येते. मिश्रण अजिबात ढवळायचे नाही.
इडलीपात्राला तेलाचा हात लावून घ्या व चमच्याने वरवरचे पीठ घेऊन पात्रात घाला.
इडल्या वाफवून काढाव्यात व चटणी, सांबाराबरोबर सर्व्ह कराव्यात.
वरील साहित्यात लहान आकाराच्या ३० इडल्या होतात.
ही पाककृती माझ्याकडच्या पुस्तकातील आहे. थोडे बदल केले आहेत.
वाटल्यास आपण वरील पिठात थोडे मटार, बारीक चिरलेले गाजर, कोथिंबीर व मिरीपूड घालू शकता.
हे जिन्नस पीठ वाटल्यावर मिसळावे लागतात.

रेवती

विसोबा खेचर

क्या केहेने भाभीजी..!

अत्यंत मनमोह्क फोटो..

वा र लो..!

तात्या.

चित्रा

आम्हीही येतो! :)
छान पाकृ. इडली मी रवा घालून सहसा करीत नाही, पण आता करीन तेव्हा अशीच करून पाहीन.

रेवती

जरूर या. आमच्या घरी येण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही. फक्त फोन करून सांगा.
उद्या या खरच. चित्राताई व विकासही येतायत. मजा येइल.

रेवती

श्रावण मोडक

चटणीचा रंगच आमंत्रण देणारा आहे. आणि इडलीचा स्पॉंजीनेसच ती किती हलकी झाली असणार हे दाखवतोय. जुलूम हेच खरं.

पक्या

छान पाकृ. फोटो पण जबरदस्त. धन्यवाद.
फोटीतील चटणी ची पण पाकॄ मि़ळेल का?

रेवती

वरील चटणीसाठी साहित्य मोजून घेतले नव्हते म्हणून अंदाजे देत आहे.
साधारण एक मोठी वाटी ओले खोबरे, अर्ध्या वाटीला थोडे कमी डाळं (फुटाण्याचं, सालं काढलेलं), हिरव्या मिरच्या, छोटा आल्याचा तुकडा, लसणीची एक मोठी पाकळी, मीठ, थोडी साखर हवी असल्यास, पाव चमचा चिंच कोळ, फोडणीचे साहित्य. लाल मिरची सुकी, कढीपत्ता, उडीद डाळ.
खोबरं ते चिंचेचा कोळ मिक्सरवर बारीक वाटावे. पळीफोडणी हळद न घालता करावी व त्यात उडीद डाळ, सुकी मिरची, व कढीपत्ता घालावा. ही फोडणी चटणीवर ओतावी व एकत्र करावे.

रेवती

पक्या

चटणीच्या पाकॄ साठी धन्यवाद, रेवतीजी.

शितल

अरे वा,
रेवती,
फोटो आणि कृती खुप छान आहे.:)
पुढच्या वेळी अशा प्रकारे इडली करून पाहिन.
चटणीची ही पाककृती दे ना.
:)

कोलबेर

फोटू जबरी आला आहे. पटकन एक इडली उचलुन घ्यावी असे वाटते.

लिखाळ

अरे वा.. छान पाकृ आणि फारच मस्त फोटो.
इडल्या खरोखरच उचलून घ्याव्याश्या वाटत आहेत. :)
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.

शाल्मली

अरे वा.. छान पाकृ आणि फारच मस्त फोटो.
इडल्या खरोखरच उचलून घ्याव्याश्या वाटत आहेत

अगदी असंच म्हणते..
रेवती ताईनी मला पाहुणचाराला बोलावलेच आहे.. आता जायला पाहिजे लवकरच.. :)
--शाल्मली.

आपला अभिजित

एक होती इडली
ती खूप चिडली

तरातरा धावली
सांबारात जाऊन पडली

सांबार होते गरम
इडली झाली नरम

चमचा आला खुशीत
बसला बशीच्या कुशीत
(इथे माझी मुलगी `कुशीच्या बशीत' म्हणायची!)

चमच्याने पाहिले इकडेतिकडे
इडलीचे केले तुकडेतुकडे

मुलांनी केली इडली फस्त
इडली झाली होती मस्त!

लिखाळ

हा हा .. बडबडगीत मस्त.
माझी पुतणी नेहमी हे गाणं फोन वर म्हणून दाखवते :)
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.

रेवती

बडबडगीत आवडले.
धन्यवाद!
रेवती

मीनल

अख्खी उडीद डाळ कशासाठी?
काही कारण?

मीनल.

रेवती

अख्ख्या उडीदडाळीच्या वापराने इडली ज्यास्त स्पाँजी होते असे दाक्षिणात्य मैत्रिणीने सांगितले होते (कारण माहीत नाही).
तसा अनुभव आला म्हणून मीही आता अख्खी डाळ फक्त इडलीसाठी वापरते.

रेवती

वर्षा

बडबडगीत मस्त आहे.
इडल्या एकदम टॉप!!!!!

सुनील

फोटोवरूनच इडल्यांचा हलकेपणा जाणवतोय! तसा नेहेमी तांदूळच वापरला आहे, आता रवा वापरून पहायला हवा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विकि

रवा इडली ची कृती आणि फोटो दोन्ही आवडले.
रवा इडलीत आंबटपणा नसल्याने मला रवा इडली अत्यंत प्रिय आहे. मला एक शंका आहे इडलीचा रवा(इडलीसाठी वापरतात तो) आणी जाडा रवा दोन्ही एकच आहे का की दुकानात इडलीचा रवा म्हणून वेगळा रवा मिळतो.

रेवती

रवा हा साधा रवा आपण शिरा करताना वापरतो तो आहे.
हा रवा गव्हाचा असतो.

रेवती

सहज

रवा इडली आता करुन पाहीली पाहीजे.

रवा इडलीचा (मला माहित पडलेला) इतिहास ..

महायुद्धाच्या काळात तांदुळ मिळणे मुश्किल झाल्याने इडली-प्रेमी मंडळींनी रवा डोसा व रवा इडली हे प्रकार तयार केले.
इडली शिवाय जगतील ते मद्रासी कसले ? :)

पाकृ, इडली आणि बडबडगीतही ... कालच एम.टी.आर.च्या मिश्रणाची रवा इडली करताना, हे घरी कसं बनवायचं याचा विचार करत होते.
धन्यवाद रेवतीताई.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

मनस्वी

इडली के व ळ सुं द र!
इडली आणि चटणीच्या पाकृसाठी धन्यु रेवती!

रेवती

सर्व वाचकांचे मनापासून आभार.
आपल्या प्रतिसादांमुळे उत्साह वाढला आहे.
पुढची पाककृती लवकर टाकण्याचा प्रयत्न करीन.

रेवती

रमेश आठवले

रवा डोसा च्या पा. कृ. ची वाट पहात आहे.
इडली आणि चटणीचे फोटो फारच सुरेख

आत्ता पाहिली ग रेवती रवाइडली, सहीच दिसतेय. उचलून तोंडात टाकावी अशी..
कित्त्येक महिन्यात केली नाही ग रवा इडली.. आता लवकरच करेन..:)
स्वाती

रेवती

धन्यवाद हेमू व स्वातीताई!
आज मिपा उघडल्यावर एकदम इडली समोर आली आणि मी दचकले;)
(बरेच दिवस झाले पाक्रु देऊन म्हणून).

रेवती

मदनबाण

आज्जेची इडली मला बरं कशी दिसली नाही ! ;)
आवडली हो... ;)

सूड

मस्त जाळीदार झालीय.

मारकुटे

सांबर असतं तर इडली बुडून राहिली असती आणि वर आली नसती

बॅटमॅन

सांबर

हा शब्द वाचून हरणाच्या समसंज्ञ चुलतभावाची आठवण झाली अन त्या डाळद्रावणात सांबराचे लेग पीस टाकलेले आहेत असे दृश्य डोळ्यांसमोर उभे राहून भडभडून आले.

मारकुटे

तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे.

बॅटमॅन

दिलगिरीबद्दल धन्यवाद.

अन खरा उच्चार आहे "सांबार". उत्तरभारतीयांचा सांबर उच्चार लै डोक्शात जातो.

मारकुटे

उच्चार काहीही असला तरी पदार्थाची चव बदलत नाही.

बोली भाषेत अनेक उच्चार होतात. वेगवेगळे उच्चार केले जातात. गंगा गँगस होते. सिंधू इंडस होते. मुंबई बॉम्बे होते. संवाद महत्वाचा असतो. मुळचा उच्चार जो आपण मानतो तोच खरा असं कशावरुन? शेवटी तो संकेत आहे. आणि तोच असला पाहिजे असा अट्टाहास चुकीचा ठरतो. काळाच्या ओघात प्रमाण उच्चार बदलत जातो.

समोरचा माणूस उच्चार वेगळा करतो म्हणून डोक्यात राख घालून कसं चालेल? कदाचित काळाच्या ओघात तोच उच्चार प्रमाण होईल. काय सांगावे? कालाय तस्मै नमः

बॅटमॅन

उच्चार काहीही असला तरी पदार्थाची चव बदलत नाही.

शिवी दिली तरी माणूस बदलत नाही असे अर्ग्युमेंट देऊ का यावर =))

बोली भाषेत अनेक उच्चार होतात. वेगवेगळे उच्चार केले जातात. गंगा गँगस होते. सिंधू इंडस होते. मुंबई बॉम्बे होते.

मुद्दा हुकला आहे. भारताबाहेरच्यांनी केलेल्या उच्चारांशी कर्तव्य नाहीये मला.

मुळचा उच्चार जो आपण मानतो तोच खरा असं कशावरुन? शेवटी तो संकेत आहे. आणि तोच असला पाहिजे असा अट्टाहास चुकीचा ठरतो. काळाच्या ओघात प्रमाण उच्चार बदलत जातो.

अर्थातच. पण तो शब्द ज्या भाषेतला आहे तेथील रूढ संकेत मी सांगितला तर चुकले का?

समोरचा माणूस उच्चार वेगळा करतो म्हणून डोक्यात राख घालून कसं चालेल? कदाचित काळाच्या ओघात तोच उच्चार प्रमाण होईल. काय सांगावे? कालाय तस्मै नमः

सकाळी डोक्याला तेल लावतो ते सोडून आजवर अन्य काही घातल्याचे आठवत नाही. कालौघात काय होईल ते होवो. सध्या काय आहे ते मी सांगितले. सांबर हा उत्तरभारतीय संकेत आहे आणि मराठीत एका प्राण्याचे नावही तेच आहे सबब मूळ शब्द सुचवला इतकेच.

मारकुटे

>> पण तो शब्द ज्या भाषेतला आहे तेथील रूढ संकेत मी सांगितला तर चुकले का?

पण मी त्या भाषेत बोलतच नव्हतो. माझ्या भाषेत मी मला हवा तो शब्द वापरला. चुकले का?

बॅटमॅन

मराठीत मी बहुतांना सांबार असाच उच्चार करताना पाहिले आहे तस्मात माझ्यासाठी संकेत तोच आहे.

सूड

>>मुंबई बॉम्बे होते.

आता तर हद्दच झाली. हे शिंचे पुणेकर मुंबईला बॉम्बे म्हणतात. मुंबई ही मुंबईच आहे. मुं ब ई. समजलं. चला दहा वेळा लिहून काढा.

रेवती

अरे काय चावटपणा सुरु आहे! ;) जुने धागे वर आणून चेष्टा करता का गरीबाची!

रेवती

कारण नसताना पाकृच्या धाग्यावरील शाब्दिक कसरती थांबवाव्यात असे सांगू इच्छिते.

प्यारे१

कुणी संपादक कसं हजर नाही ब्वा इथं?

श्या! =))

मारकुटे

सहमत आहे.
पण अशा शाब्दिक कसरती हेच मिपाचे बलस्थान असल्याचे ऐकले होते. असो.

कवितानागेश

एक सांबाराची पाकृ टाकून त्यात या वरच्यांना बुडवून टाक गं.. :)

बॅटमॅन

पाकृ ऑर नो पाकृ, सांबारात बुडायला आपण कधीपण तयार हाओत.

(सांबारप्रेमी) बट्टमण्ण.

कवितानागेश

अरे, त्या जाळीदार इडल्या बुडवायला सांगतेय सांबारात.
आला लग्गेच्च! :)

प्यारे१

इडल्या, बुडल्या!

बाकी 'सांभार' म्हणे संभाजी महाराजांवरुन पडलेलं नाव आहे.
(कधीतरी नजिकच्या भूतकाळात मिपावरच वाचलेल्या लेखातली माहिती असावी)

शिद

मस्त झालीय इडली...करुन पहायला हवे आता.

एक शंका: अतिशय थंड वातावरणात पिठ कसे आंबवावे? मागच्या विकांताचा बेत फसला :(

राघवेंद्र

भट्टी (गॅस ओव्हन) थोडा वेळ ( ५ मिनेटे ) गरम करुन, नंतर पिठ रात्रभर ठेवावे.

bela

पिठ ठेवलेल्या भान्ड्याभोवति जुना स्वेटर गुन्डाळा. उबेमुळे छान पिठ येइल.

रेवती

राघवसाहेब म्हणतायत तसं अव्हन अगदी २ मिंटे गरम करून , नंतर बंद करून त्यात पीठ झाकून ठेवले जाते पण माझ्या अव्हनमधील लाईट ढणढण्या असल्याने मी लाईट चालून करून ठेवल्यास सहा तासात पीठ्न फुगते. हा प्रयोग करायचा नसल्यास कांद्याचा शेंडा, बुडखा कापावा, साले काढावीत व पिठात बुडवून ठेवावा. पीठ फर्मेंट झाल्यानंतर काढून घ्यायला विसरू नये. छोटा कांदा नसल्यास (जो आमच्या इथे मला कधी मिळत नै), मोठ्या कांद्याचा तुकडाही चालेल.

>>>>कांद्याचा शेंडा, बुडखा कापावा, साले काढावीत व पिठात बुडवून ठेवावा.

अरे व्वा! हा प्रयोग करून पाहिला पाहिजे.

शुचि

फोटोत ईडली-चटणी खतरनाक चविष्ट दिसतेय !!!

आयुर्हित

पाकृ आवडली, फोटोत एवढी चांगली दिसते, तर खायला हि खूप छान असणार!
ही इडली पाहून मला एक छान विषय मिळाला.धन्यवाद रेवती ताई.

बडबड गीत ही आवडले! Keep it up!
आपला मिपास्नेही: आयुर्हीत

वेल्लाभट

अगागागागा! तोंडाला पाणी सुटलं हो फोटो बघून ! श्या!
भारी!

रेवती

सर्व प्रतिसादकांचे आभार.
नाना, तुमचेही आभार.
रमेशजी, आपल्या फर्माईशीची नोंद घेतली आहे.
धन्यवाद.