मागील धागा ( https://www.misalpav.com/node/52636 )जुना झाल्याने आणि खूप मोठा झाल्याने हा नवीन धागा काढत आहे.
राजकीय विषय सोडून इतर विषयांसाठी.
-----------------------------
एक नवीन प्रश्न . PASSKEY विरुद्ध PASSWORD
१. विविध साईटस किंवा इमेलसाठी login करताना username , password टाकावे लागू नये म्हणून passkey वापरण्याची पद्धत दोन वर्षांपूर्वी आणण्यात आली.
२. एकच password सर्व साईटसना ठेवणे धोक्याचे आहे असं डिजिटल सुरक्षितता जाणणारे सांगतात. एवढे password बनवून लक्षात कसे ठेवायचे?
३. एकच password लक्षात ठेवा आणि तो password vault साठी वापरा. त्यात सर्व इतर passwords ठेवा सांगतात. पण तिथून password copy करून तो साईट्स login ला paste करता येत नाही. म्हणजे तो कॉपी केल्यावर लिहून घ्यायचा आणि काळजीपूर्वक टंकावा (type )लागतो.
passkey सुरक्षित करण्यासाठी finger print/ face unlock किंवा PIN वापरायचे आहे.
ज्या फोनमध्ये passkey ठेवली आहे तो फोन ( device) हरवला तर काय करायचे ?
या सर्वांवर बरेच विडिओ पाहिले तरी कुणाला काही अनुभव असले तर जाणून घ्यायचे आहे.
Comments
गुगल पासवर्ड मॅनेजर