Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिक्षणाचे ओझे जड झाले आहे का?

र
रेझर रेमॉन
Sun, 01/04/2009 - 20:01
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2528 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ल
लिखाळ Sun, 01/04/2009 - 21:06 नवीन
शक्तिमान रेझर, आपले प्रश्न चांगले आहेत. शाळेत अभ्यासात प्रगती न दाखवणार्‍यांना मी मंद समजत नाही. त्यामुळे मी स्वतः सुद्धा माझ्यालेखी कधी मंद ठरलो नाही :) अनेकदा शाळेतले मंदच आपल्या मुलांना हुशार बनवायचा घाट घालताना दिसतात. शिकल्या सवरल्या मंदांचे ज्यांना शक्य आहे त्यांनी कान उपटावेत. आपण शक्तिशाली असाल तर ते करु शकाल. काल-परवाच पृथ्वितलावर आलेल्या आपल्याला लगेच मर्त्य मानवाच्या खर्‍या मूलभूत समस्या दिसायला लागल्या याचे कौतूक वाटले. आपण नक्कीच गतीमान आणि हुशार दिसता. (ह.घ्या.) -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
र
रेझर रेमॉन Mon, 01/05/2009 - 19:19 नवीन
शक्तिमान रेझर, आपले प्रश्न चांगले आहेत. शाळेत अभ्यासात प्रगती न दाखवणार्‍यांना मी मंद समजत नाही. त्यामुळे मी स्वतः सुद्धा माझ्यालेखी कधी मंद ठरलो नाही Smile (शाळेत प्रगति दाखवणारे हुशार गणले तरी कालौघात मंद ठरतात. मागे वळून आपल्या शाळेतल्या शेवटच्या बाकांचा ट्रेस घेतला तर हे सहज ध्यानात यावे. आपण शाळेत मं...द होतो!) अनेकदा शाळेतले मंदच आपल्या मुलांना हुशार बनवायचा घाट घालताना दिसतात. ( धीस इज द गेम. सफेद सदर्‍यांनी लोकांना नादी लावले. शिकणे म्हणजे सर्व समस्यांचा हल, असे चित्र उभे केले. शिकून समस्या सुटल्या असत्या तर मुलांना पुन्हा का शिकायला लागले असते? शाळेतले मंद बिचारे पहिल्या बाकांवरच्या इल्युजन्स ना फॉलो करायला लागले तर त्यांचे काय चुकले?) शिकल्या सवरल्या मंदांचे ज्यांना शक्य आहे त्यांनी कान उपटावेत. (गरज काय? दॅटस डेस्टिनीज जॉब, चिको!) आपण शक्तिशाली असाल तर ते करु शकाल. काल-परवाच पृथ्वितलावर आलेल्या आपल्याला लगेच मर्त्य मानवाच्या खर्‍या मूलभूत समस्या दिसायला लागल्या याचे कौतूक वाटले. आपण नक्कीच गतीमान आणि हुशार दिसता. (ह.घ्या.) ( हे चांगलं वाटलं! फंडाज आर फॉर फन चिको!) काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात. (सगळ्यात फंटास्टिक हे आहे! या वाक्यातच मराठी तोरा आहे.) एनी वेज, खरा प्रश्र्न मुलीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने पाहिला तर... कारण पालकांच्या व्ह्यू ची किंमत तुम्हा-आम्हाला नाही, तर तिला मोजावी लागणार, नाही का? - रेझर रेमॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
स
सुनील Mon, 01/05/2009 - 06:13 नवीन
मास्तरांची प्रतिक्रिया वाचायला आवडेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 01/05/2009 - 06:21 नवीन
माझ्याशी संपर्क साधा. ते जरा हुशार इंजिनयर, शिक्षक, वगैरे विसराल का?
  • Log in or register to post comments
र
रेझर रेमॉन Mon, 01/05/2009 - 19:24 नवीन
थँक्स! हुशार, इंजिनिअर,शि़क्षक हे सारे लौकिकार्थाने. मी विसरून काय होणार, चिको? जात्यातले सूपात येणार काय? -रेझर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Tue, 01/06/2009 - 06:15 नवीन
अरे बाबा रेझरा, तुला सर्व उत्तरे माहित असतील तर प्रश्न का? आम्हा भोळ्यांचा आपला उगाच गैरसमज होतो ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेझर रेमॉन
म
मनीषा Mon, 01/05/2009 - 08:55 नवीन
शाळेतली प्रगती ..हेच एकमेव बुद्धीमत्तेचंलक्षण आहे असं वाटत नाही .. पण तिथे मिळालेल्या गुणांवरच एखादे आवडीचं क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य मिळतं हेही खरं आहे . अर्थात काहीवेळा लहान मुलांकडून फार अपेक्षा केल्या जातात ..............आणि मग त्या अपेक्षांचं ओझं होतं
  • Log in or register to post comments
र
रेझर रेमॉन Mon, 01/05/2009 - 19:38 नवीन
काय आहे... शाळा बुद्धिमत्ता आणि हुशारी, यश यांचा अन्योन्य संबंध आहे. हे आपल्यावर ठसवलंय... किती ही प्रयत्न केले तरी आपण हे झुगारू शकणार नाही. शाळेतली प्रगती ..हेच एकमेव बुद्धीमत्तेचंलक्षण आहे असं वाटत नाही .. पण तिथे मिळालेल्या गुणांवरच एखादे आवडीचं क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य मिळतं हेही खरं आहे . वाक्य जरा धोकादायक वाटते... आवडीचे म्हणजे?? डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, आय.टी., पॅरामेडिकल ही आवडीची क्षेत्रे आहेत? जरा धोकादायक क्षेत्रात आवड निर्माण होऊ दिली जाते? अर्थात काहीवेळा लहान मुलांकडून फार अपेक्षा केल्या जातात ..............आणि मग त्या अपेक्षांचं ओझं होतं. महेश ट्युटोरीअल्स, अग्रवाल, चाटेज यांच्याकडे ज्या संख्येने भरती होतेय ती पाहता 'काही वेळा' वर विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा