आज पाकिस्तान, तुर्की आणि सौदी यांच्यात संरक्षण करार झाला. झालेल्या नव्या संरक्षण करारामुळे आशिया आणि मध्यपूर्वेतील सामरिक समीकरणांमध्ये नवीन घडामोडी घडू शकतात. या कराराचा उद्देश संरक्षण सहकार्य, संयुक्त लष्करी सराव, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि संरक्षण तंत्रज्ञानातील सहकार्य वाढवणे हा आहे. तसेच, या तीनपैकी एका देशावर हल्ला झाला तर तो तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. भविष्यात या कराराचा विस्तार नक्कीच होऊ शकतो.
या करारामुळे भारतासमोर काही नवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात.
तुर्कीकडून ड्रोन, आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण मिळाल्यास पाकिस्तानची लष्करी क्षमता वाढेल. सौदी अरेबियाचे आर्थिक सहकार्यही त्याला बळ देऊ देईल.
काश्मीरसारख्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर पाकिस्तानला काही भागीदार देशांचा अधिक ठाम राजनैतिक पाठिंबा मिळेल. सध्या तुर्की तर उघडपणे पाठिंबा देतोच आहे. कदाचित सौदीही त्यात सहभागी होईल. अर्थात, सौदी सहजा-सहजी भारतविरोधी भूमिका घेणार नाही.
म्हणजेच, पाकिस्तान पूर्वीपेक्षा लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत तर होईलच, पण जागतिक राजकारणातही त्याला अधिक पाठिंबा मिळेल. सध्या सुरू असलेल्या इराणआणि अमेरिका युद्धामुळे पाकिस्तानचे वॉशिंग्टनसमोरील वजनही वाढलेले आहेच.
येत्या काळात या करारात नक्कीच काही देश सामील होतील. त्यात आघाडीचे नाव म्हणजे अझरबैजान. ऑपरेशन सिंदूरमध्ये या देशाने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. पाकिस्तान आणि अझरबैजान यांच्यात JF-17 विमानांच्या पुरवठ्याबाबत अगोदरच करार झालेला आहे.
दुसरा देश म्हणजे कतार. मध्यंतरी कतार आणि पाकिस्तानमध्येही संरक्षण कराराबाबत बोलणी सुरू असल्याच्या बातम्या आल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे, मध्यंतरी इस्रायलने कतारवर हल्ला केला होता आणि हे अमेरिकेच्या सहमतीशिवाय झालेलं नसावं. त्यामुळे कतारही मित्राच्या शोधात असणार.
आपला दुसरा शेजारी बांगलादेश सध्या तरी यात सामील होण्याची शक्यता वाटत नाही. कारण भारत आणि बांगलादेश यांच्यातील व्यापार, पण एखादा कट्टर मुस्लिम पक्ष सत्तेत आला, तर मात्र ही शक्यता नाकारता येत नाही.
भारताचे उत्तर काय असू शकते?
सध्या तरी भारताने केवळ सावध प्रतिक्रिया दिलेली आहे. पण याला उत्तर म्हणून भारतालाही काही हालचाली कराव्या लागतील.
याला उत्तर म्हणून असाच करार भारत करेल का? सध्या तरी उत्तर 'नाही' असेच वाटते. इस्रायल भारताबरोबर संरक्षण करारासाठी कधीही तयार होईल, पण भारत विकत भांडण घेणार नाही. मात्र येत्या काळात दोन्ही देश आपले संबंध आणखी वाढवतील, हे नक्की.
"शत्रूचा शत्रू तो आपला मित्र" या धोरणानुसार आर्मेनिया किंवा ग्रीस या देशांबरोबर भारताचे संबंध येत्या काळात आणखी चांगले होतील. सध्याही या देशांबरोबर आपले संरक्षण संबंध वाढत आहेत. आपण मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्य आर्मेनियाला पाठवत आहोत.
उद्या समजा ऑपरेशन सिंदूरसारखी परिस्थिती पुन्हा आली, तर पाकिस्तान पूर्वीपेक्षा अधिक मजबूत असेल. आणि सौदी व तुर्की थेट युद्धात काही उतरणार नाहीत, या भ्रमात राहू नये.
या कराराचा उलट परिणामही होऊ शकतो. तो म्हणजे, सौदीसारख्या देशाला पाकिस्तानसाठी भारताच्या विरोधात जाणे एवढं सोपं नाही. सध्या भारत आणि सौदी यांच्यात सुमारे ४० अब्ज अमेरिकी डॉलर्सचा व्यापार आहे, तर पाकिस्तान आणि सौदी यांच्यात तो सुमारे ५ अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे. त्यामुळे सौदी पाकिस्तानवर दबाव वाढवू शकतो.
मिपवार बरेच सरक्षण आणि जागतिक राजकारणा विषयी रस असणार आहेत. भारतावर ह्याचा कसा परिणाम होऊ शकतो किंवा आपण ह्या विरोधात काही करू शकतो का? आपल्या कडे काही पर्याय आहेत का? ह्याविषयी मिपाकरांची मत जाणून घायला नक्कीच आवडतील
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला वाटते
मी आधी मिपावरच कुठेतरी बोललोय...
There are temporary interests and Permanent Greed.
हे सगळे सोयीचे राजकारण असते. काश्मीरवर समर्थन मिळून करतात काय ? त्यांचे ते समर्थन एकत्रित करण्याचे प्रयत्न खूप दशके सुरूच आहेत अव्याहत, त्याचा परिपाक काय ? तर युनायटेड नेशन्स जनरल असेम्ब्ली मध्ये गळे काढणे ! काढेनात का !
तुर्की ड्रोन अन् चिनी रडार/ विमाने/ मिसाईल असूनही सिन्दुर मध्ये मार खाल्लाच न ? तुर्कीने कितीही करार केले तरी लायकी पाहून वाण वाटणार ते पण. उगाच पाकिस्तान आहे म्हणून घे कान फायटर जेट असे होणार नाही/ होत नसते.
अझरबैजान अन् कतार सहभागी होतील न होतील अन् झाले तरी आपल्याला नाक दाबता आले पाहिजे. अझरबैजानला सिरीयसली घेऊन काही उपयोग नाही. त्यांनी माज केला तर आर्मेनियाला अजून दोन वेपन सिस्टीम द्यायच्या की झाले, अर्मेनिया आणि नोगोर्नो काराबाख आपल्यासाठी टेस्टिंग रेंज आहे.
उरता उरले भारताचे उत्तर तर २०१६ मधेच सौदीकडून सर्वोच्च पदक मोदींना मिळाले होते पण म्हणून पर्मनंट ग्रीड त्यांनी सोडली नाही ! टेम्पररी इंटरेस्ट आपण पण पहावे !
नाहीतर हेचि का फळ मम तपाला पाळी येऊ शकते
(जयशंकर) खोंड्या
सर्वार्थाने सहमत
In reply to मला वाटते by वृषभ खोंडे
वृषभ खोंडे,
तुमच्या संदेशाशी सर्वार्थाने सहमत आहे. सदर करार मेडो ( वा मेटो ) चा नवा अवतार वाटतो आहे. जुना अवतार : https://en.wikipedia.org/wiki/Central_Treaty_Organization
जुन्या अवतारात इराण, इराक, तुर्कस्थान, पाकिस्तान व युके होते. इराण व इराक आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. म्हणून नव्या अवतारात त्यांना काढून सौदीची स्थापना केलेली दिसते. ब्रिटीशांचा अर्थात पडद्यामागून पाठींबा असणारे. तसंही पाहता सौदी अरेबिया हा ब्रिटीशांच्या पाठींब्यावर आजवर टिकला आहे. त्यामुळे ब्रिटिशांच्या उघड सहभागाची गरज पडू नये.
एकंदरीत नाटो सारखा प्रयोग मध्यपूर्वेत करून बघायची तयारी दिसते आहे. एका देशावरील हल्ला हा इतर देशांवरचा हल्ला मानला जाईल. पण अंतर्गत बंडाळी झाली तर काय धोरण असेल हे पाहणे रोचक ठरावे. बलुचिस्थान वेगळा झाल्यावर पाकिस्तान म्हणजे नेमकं काय हा प्रश्न उद्भवेल. त्यावेळेस या कराराची काय हालत होते ते बघावयास मजा येईल. तेव्हा लाह्या घेऊन बसूया.
आ.न.,
-गा.पै.
ट्रम्प साहेबांच्या…
ट्रम्प साहेबांच्या माकडचेष्टानी जगांत सगळीकडेच पोस्ट-अमेरिकन सुरक्षा रचना निर्माण होत आहेत. हा त्याचाच भाग आहे आणि ह्याचा प्रमुख रोख मध्यपूर्व आशिया आहे, भारतीय उपखंड नाही. भारतासाठी ह्या कराराचा धोका विशेष नाही. पाकिस्तान चे आण्विक कव्हर. सौदी आणि तुर्की ला हवे आहे. पाकिस्तनाची आण्विक अस्त्रे आता अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरू शकतात कारण पाकिस्तानचा फायदा उठवून सौदी कदाचित अमेरिकन रक्षा यंत्रणेला आपल्यासाठी पर्याय निर्माण करू पाहत आहे. संयम ठेवून पुढील हालचाली पाहाव्या लागतील.
पाकडे आणि सौदी यांच्यात असा…
पाकडे आणि सौदी यांच्यात असा करार आधीपासून आहे पण इराणपाकिस्तान संघर्ष भडकलाच नाही याउलट असा कोणताही करार नसताना इस्रायलने कारगिल युद्धात भारताला मदत केली होती. hexagon of aliance बद्दल इस्रायलने पूर्वीच सांगितले आहे.
आप्पांच्या गप्पा (हबीबी आवृत्ती)
In reply to पाकडे आणि सौदी यांच्यात असा… by अप्पा जोगळेकर
आदरणीय आप्पांनी मांडलेली रचना ही अतिशय योग्य आहे पण काही काही मुद्द्यांवर त्यांनी लक्ष द्यायचे विसरले असा विरोधकांचा दावा आहे.
उदाहरणार्थ पाकिस्तानचा न्युक्लिअर थ्रेट किती पोकळ आहे हे सिंदूर ऑपरेशन वेळी दिसले आहेच (जगाला) त्यामुळे त्यांची व्हॅल्यु त्या बाबतीत शून्य आहे.
हा करार झाला आहे तो मरायला स्वस्त सैनिक पुरवठ्याबद्दल. आत्ताही इराणने हमरीतुमरीला येऊन कतार/ कुवेत/ सौदी मधे सैनिक घुसवले तेव्हा सुद्धा पाकिस्तानी लष्करी तुकड्या सौदीच्या बाजूने लढण्यास उतरल्या होत्याच.
इतकेच काय ! ट्रंपने गाझा पीस प्लॅन अंतर्गत जेव्हा हिझबुल्ला अन् हमास विरुद्ध स्वारी सुरू केली तेव्हा चक्क अमेरिका इस्रायलकडून गाझा आणि वेस्ट बँक मध्ये लढायला पाकिस्तानी तुकड्या पाठवण्यास तयार होते पाकिस्तानी नेतृत्व.
मला वाटते की हे सगळे तुर्की पण बघते आहे आणि सौदी पण ! फक्त ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजचे काहीतरी एक असावे म्हणून हा करार केलेला दिसतोय. तसे पाहता आता तुर्की पण भारताशी संबंध normalise करण्याचा प्रयत्न सुरू करताना subtle प्रयत्न करताना दिसतोच आहे.
(व्हाईट पेपर ऑन सौदी, टर्की, पाकिस्तान ऍग्रीमेंट/मक्का एकॉर्ड बाय मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स, मिसळपाव सरकार, प्रेस नोट फ्रॉम द ऑफिस ऑफ आप्पा)
(जॉइंट सेक्रेटरी) खोंडे
शिवलीलेचा ११ वा अध्याय आठवतो…
In reply to आप्पांच्या गप्पा (हबीबी आवृत्ती) by वृषभ खोंडे
शिवलीलेचा ११ वा अध्याय आठवतो :
वेश्या असोन पतिव्रता ॥ नेमिला जो पुरुष तत्त्वता ॥ त्याचा दिवस न सरता ॥ इंद्रासही वश्य नव्हे ॥४६॥
--
भाजीपाव सैनिक आणि पाकिस्तान हे समदुःखी आहेत त्यामुळे त्यांना पाकिस्तानची अवस्था समजते. कुठल्याही घराचे उष्टे ज्या उकिरड्यावर फेकले जाते त्या उकीरड्याप्रमाणे, भाजीपाव चे समस्त स्वयंसेवक वाट्टेल त्या गोष्टीचे समर्थन करायला भाजीपाव नेतृत्व गोळा करते. गोबी घाबरून शांत राहिले तर "स्ट्रॅटेजिक silence" चा घोषणा, काही केले तर "मास्टरस्ट्रोक" चा जयजयकार. सतरंजी उचलणे, पाण्याच्या बाटल्या वाटणे, सभेंत चप्पलांचे रक्षण करणे, नंतर झाडू मारणे ह्या सर्व कामासाठी भाजीपाव नेतृत्व ह्या भक्तमंडळींची नेमणूक करते. मंत्रिपद वाटणे, तिकीट देणे, सरकारी नोकऱ्या वाटणे, फुकट हे आणि फुकट ते देणे, हुनर हाथ इत्यादी साठी नेहमी एक तर तथाकथित शोषित वंचित पीडित SVP किंवा नाहीतर प्रेमळ अल्पसंख्यांक मंडळींची रांग लागते. नंतर उष्टे काढायला खंदे स्वयंसेवक आणि जुने कार्यकर्ते.
पाकिस्तान ची आखाती देशांतील स्थिती तीच आहे. पुढे जाऊन मरायला सौदी, तुर्की वगैरेला तोफखान्याचे भक्ष्य पाहिजे. गरज पडेल तेंव्हा आण्विक अस्त्रे पाहिजेत. काही विशेष सूत्रांच्या मते, पाकिस्तानी आण्विक अस्त्रे कधीच सौदीने विकत घेतली आहे.
त्या वेश्या महानंदा प्रमाणे भाजीपाव स्वयंसेवक आणि पाकिस्तान दोन्हीची अवस्था तशीच आहे. आपली autonomy दुसऱ्याकडे गहाण ठेवल्याने साक्षांत इंद्र जरी आला तरी ह्या मंडळींना त्याला नकार देणे भाग आहे. फरक फक्त इतका कि पाकिस्तानला किमान पैसे मिळतात. भाजीपाव स्वयंसेवकांना मिळते उपेक्षा, पाठीवर थाप आणि निस्वार्थी असल्याचे सर्टिफिकेट.
- विशेष सूत्र - Youtube वरील षडयंत्र सिद्धांत मांडणारे थोर विद्वान.
चांगली चर्चा करण्याच्या ऐवजी…
In reply to शिवलीलेचा ११ वा अध्याय आठवतो… by साहना
चांगली चर्चा करण्याच्या ऐवजी प्रत्येक धाग्यात तुमचा संघद्वेष आणून धाग्याचा विचका कशासाठी करता?
काही जण अजिबात सुधारणार…
In reply to चांगली चर्चा करण्याच्या ऐवजी… by सुबोध खरे
काही जण अजिबात सुधारणार नाही हे माहित असूनही तुम्ही अपेक्षा का करता?
अपेक्षा सोडा... :)
राज जोशी
चांगली चर्चा होण्यासाठी आधी…
In reply to चांगली चर्चा करण्याच्या ऐवजी… by सुबोध खरे
चांगली चर्चा होण्यासाठी आधी मूळ प्रतिसाद हा चांगला असावा लागतो. सनातन प्रभात चे संपादन लिहितात त्या प्रमाणे प्रगल्भ भाषेच्या आड मूर्खपणाची प्रतिपादने केली ती त्याला call आऊट केलेच पाहिजे. कांद्या बटाट्याचे भाव डिस्कस केल्याप्रमाणे तुर्की काय, रशिया काय ह्यांच्यावर भाष्य केले कि अश्यांची खिल्ली उडवलीच पाहिजे नाहीतर ह्यांना कोणी गांभीर्याने घेण्याची शक्यता वाढते.
सहमत
In reply to चांगली चर्चा होण्यासाठी आधी… by साहना
संघ म्हणजे माझे कुलधर्म कुलाचार आहे ते कसे हे सांगा मग पाहू
प्रारब्ध कोणाला चुकले नाही.
In reply to चांगली चर्चा करण्याच्या ऐवजी… by सुबोध खरे
Past Traumatic Experience: If a specific car (or a vehicle matching that exact shape and brightness) previously struck, scared, or came close to hitting the dog or a pack member, the dog will remember and bark or chase out of fear or defense.
कोणास ठाऊक एखाद्या कमळ चिन्हांकित व्यक्तीने त्यांना फसवले असेल
शक्य आहे. मनात आणि मेंदूत…
In reply to प्रारब्ध कोणाला चुकले नाही. by अप्पा जोगळेकर
शक्य आहे. मनात आणि मेंदूत साठवून ठेवलेल्या मळमळीचे अपसारण होण्यासाठी संघ हे सहजसाध्य साधन आहे.
सकाळ झाली. कोंबडा आरवला…
In reply to प्रारब्ध कोणाला चुकले नाही. by अप्पा जोगळेकर
सकाळ झाली. कोंबडा आरवला. अप्पानि आज मानसशास्त्र तज्ज्ञाची भूमिका घेतली. कुत्रे गाडीच्या मागे भुंकणे, कमळाने दगा दिला वगैरे वगैरे गोष्टी अप्पांच्या आजच्या सत्संगातून शिकायला मिळाल्या. दुर्दैवाने ह्यामुळे अप्पांचा वेळ ह्यांत गेला नाहीतर इराण युद्ध, अमेरिकेची किती टॉमहॉक क्षेपणास्त्रे बाकी आहेत, नामवंत लष्करतज्ञ् काय म्हणताहेत वगैरे विद्वत्ताप्रचुर्यापूर्ण गोष्टींवर विवेचन करायला पुरेसा वेळ मिळाला नाही. असो आणखीन दिवस बाकी आहे. भाजी वगैरे विकत घेऊन लंच झाल्यावर व्हाट्सअँप उघडायला वेळ मिळाला कि कदाचित तेंव्हा ह्यावर पुष्पे प्रकाशित करतील.
शिवलीलेचा ११ वा अध्याय ...
In reply to शिवलीलेचा ११ वा अध्याय आठवतो… by साहना
वेश्या असोन पतिव्रता ॥ नेमिला जो पुरुष तत्त्वता ॥ त्याचा दिवस न सरता ॥ इंद्रासही वश्य नव्हे ॥४६॥
हे वाचून शिवलीलेची पोथी वाचायची इच्छा जागृत झाली आहे. पूर्वी दासबोध अनेकदा वाचलेला आहे. (माझे हे वाचन धार्मिकतेमुळे नसून भाषासौन्दर्याचा आस्वाद घेण्यासाठी असते.)
पैशांची समस्या
ह्या करारामुळे भविष्यात भूदल, हवाई दल किंवा नौदल यामार्फत भारतावर हल्ले होतील अशी शक्यता नाही कारण ह्या तीनही देशांची तेवढी क्षमता नाही. इथे भीती आहे ती ड्रोन युद्धाची.
तुर्कस्तानचे ड्रोन तंत्रज्ञान सगळीकडे विख्यात आहेच त्यांना सौदीच्या पैशांची जोड मिळाली तर पाकिस्तानी भूमीवरून अव्याहतपणे ड्रोनचा मारा भारतावर होण्याची शक्यता दाट आहे.
ऑपरेशन सिन्दुर च्या वेळी आकाश एअर डिफेन्स सिस्टिम भारताने प्रभावीपण वापरली त्यामुळे एस चारशे फार जास्त प्रमाणात वापरावी लागली नाही आणि ह्याचा आर्थिक दृष्टीने भारताला फायदा झाला होता. आकाशचेच advanced version प्रोजेक्ट KUSH याचे २३ जुलै रोजी पहिले टेस्टिंग सुद्धा झाले. थोडक्यात तंत्रज्ञान किंवा drone चा सामना करणे ही भारतासाठी समस्या नाही पण ह्यासाठी लागणारे पैसे ही समस्या नक्कीच आहे.
म्हणजे तुर्कीने लाखोच्या संख्येत ड्रोन तयार केले जे अजिबात अशक्य नाहीये तर त्यावेळी एअर डिफेन्स साठी किती अमर्याद पैसे खर्च होतील याची कल्पनाच केलेली बरी. आणि पैशांच्या बाबतीत भारत सौदीशी टक्कर घेण्याच्या क्षमतेचा नाही. हे सरकार संरक्षण क्षेत्रावर जास्त खर्च करत असले तरी तो खर्च पुरेसा नाही असे वाटते.
आप्पानी हे स्पष्ट केल्याने…
In reply to पैशांची समस्या by अप्पा जोगळेकर
आप्पानी हे स्पष्ट केल्याने समस्त भारतवर्षाचा जीव भांडयात पडला आहे. नौदल आणि भूदल प्रमुखांनी तातडीची बैठक घेऊन अप्पांचे विधान अभ्यासण्याची सूचना आपल्या अधिकाऱ्यांना केली. वायुदल प्रमुख श्रावण असल्याने देवळांत गेले होते येऊ शकले नाहीत. पण द्रोण विरोधी योजना काय असावी ह्यासाठी अप्पाना वायुदल प्रमुख लवकरच बोलावून घेतील हे मला विशेष सूत्रांकडून समजते. तुर्कीच्या द्रोण चे "फ्युज कंडक्टर" गायब केल्यास द्रोण निरुपयोगी ठरतील अशी युक्तीची गोष्ट अप्पानी वायुदलाला देण्याची योजना केली आहे हे सुद्धा समजते.
> पैशांच्या बाबतीत भारत सौदीशी टक्कर घेण्याच्या क्षमतेचा नाही
टॅक्स ताई निर्मलाजी ह्यांना हे ऐकून मोठा धक्का बसला आहे अशी बातमी दिल्लीत फिरत आहे. युद्ध जर whatspp फॉर्वर्डस चा मारा करून जिंकता आले असते तर IT Cell च्या विशेष स्पेशल ऑपरेशन सैन्यदलाचे नेतृत्व अप्पासाहेबांनी नक्कीच केले असते.
Turkish-supplied Bayraktar…
Turkish-supplied Bayraktar TB2 and related kamikaze drones were largely ineffective during Operation Sindoor. India's multi-layered air defense networks, including the Akashteer system, intercepted and shot down incoming Turkish-origin hardware, while preemptive strikes heavily degraded ground facilities housing these unmanned aerial systems,
तुर्कीये कडून लक्षावधी ड्रोन्स आणून ते भारतावर सोडण्याची पाकिस्तानची क्षमता नाही.
मुळात तुर्की पाकिस्तानला कोणतिचही गोष्ट फुकट देणार नाही. त्यातून त्यांच्याकडून जास्त शस्त्रास्त्रे घेण्यास चीन खोडा घालेल कारण त्यांचे पैसे न देता तुर्कीये ला पाकिस्तान पैसे देऊ लागल्यास चीनला कसे मान्य होईल.
पाकिस्तानचा सौदीशी करार होताच परंतु हुती बंडखोर सौदी वर गेली काही वर्षे हल्ला करत आले आहेत त्याबद्दल पाकिस्तानने काय केले?
नाटो संघटनेच्या मूलभूत कराराप्रमाणे कोणत्याही एका देशावरील हल्ला हा इतर सर्व देशांवर हल्ला मानला जाईल असे असताना मध्य पूर्वेतील अनेक अमेरिकी तळांवर इराणने हल्ला केला पण एकही नाटो देश अमेरिकेच्या बरोबर युद्धात उतरला नाही. कारण त्यांनी पळवाट शोधली कि हे तळ अमेरिकी भूमीवर नाहीत. उद्या जिब्राल्टर किंवा सियुता वर हल्ला झाल्यास तो ब्रिटनचा किंवा स्पेनचा तळ मानला जाईल का?
बहुसंख्य करार हे शेवटी स्वार्थासाठी असतात आणि स्वार्था साठी ते केराच्या टोपलीतच टाकले जातात.
पाकिस्तानचे भाडोत्री सैनिक सौदीला हुती बंडखोरांशी लढण्यासाठी हवे आहेत. हुती हे शिया आहेत आणि ते काफिर आहेत हे सांगून पाकिस्तानी सुन्नी सैनिकांना भडकावणे सहज सोपे आहे.
पाकिस्तानी वैमानिक सौदी वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी १९७० च्या दशकापासून सौदी मध्ये जात आले आहेत (आणि आपल्या F १६ विमानांचे उडण्याचे तास वाचवण्यासाठी) दोघांकडे अमेरिकी विमाने आणि शस्त्रास्त्रे असल्यामुळे हे सोपे गेले.
तुर्कीच्या इस्लामी जगताच्या नेतृत्व करण्याच्या आकांक्षाना तैयीप इरोडगन अध्यक्ष झाल्यापासून धुमारे फुटलेले आहेत त्यामुळे पाकिस्तानला मदत करण्यात ते पुढे असतात. परंतु त्यांनी दिलेली बायरॅक्टर ड्रोन्स ऑप सिंदूर मध्ये भारतीय संरक्षण दलांनी निकामी ठरवली.
Turkish-supplied Bayraktar TB2 and related kamikaze drones were largely ineffective during Operation Sindoor. India's multi-layered air defense networks, including the Akashteer system, intercepted and shot down incoming Turkish-origin hardware, while preemptive strikes heavily degraded ground facilities housing these unmanned aerial systems.
ड्रोनच्या हल्ल्याबाबत फार जास्त हवा/ धुरळा उडवलेला आहे. The Bayraktar TB2 has a maximum speed of 120 knots (220 km/h or 138 mph) and an efficient cruising speed of about 70 knots (130 km/h or 81 mph). अशा मंदगतीने जाणाऱ्या ड्रोन्स ना उडवणे विमानांना पाडण्यापेक्षा जास्त सोपे आहे.
मुळात आपल्या संरक्षण प्रणालीत विमानविरोधी तोफा ( बोफोर्स L ७- आणि शिल्का) मोठ्या प्रमाणावर फार पूर्वी पासून असल्याने ड्रोनच्या माऱ्याला तोंड देण्यास आपण सक्षम आहोत. या तोफांचे गोळे आपण कित्येक दशके बबनवत आलो आहोत त्यामुळे युद्धात हजारो ड्रोन्स आली तरी त्यांना निष्प्रभ ठरवणे आपल्याला तुलनेत जास्त सोपे आहे.
A single Baykar Bayraktar TB2 drone unit typically costs between $2 million and $5 million, though complete military procurement system packages—which include ground control stations, spare parts, training, and smart ammunition—raise the average per-system cost to roughly $5 million to $11 million per aircraft depending on contract specific.
Over 600 Bayraktar TB2 unmanned combat aerial vehicles have been produced by the Turkish defense company Baykar since serial production began. The manufacturer maintains a high annual production capacity of roughly 250 to 500 units to fulfill demand across more than 30 export countries.
The Turkish military-grade YIHA-III (Yiha) loitering munitions/kamikaze drone does not have a standard public retail price, but comparable tactical systems and related platforms generally cost anywhere from $24,000 to over $50,000 USD per unit
The Turkish-made Asisguard Songar armed drone system is estimated to cost between $24,000 and $100,000 USD per unit (approximately ₹20 lakh to ₹83 lakh INR), depending on the specific tactical weapon configuration, payload variant, and contract scale
एवढी किमत लक्षावधी सोडाच हजारो ड्रोन्स मुळात उत्पादन करणे सोपे नाही त्यातून ते खरेदी करण्यात पाकिस्तानचे नक्की दिवाळे निघेल.
आकाश क्षेपणास्त्र आणि आकाशतीर प्रणाली या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि लोक त्यात गल्लत करत आहेत.
जिज्ञासूंनी मुद्दाम हा दुवा वाचून पाहावा https://en.wikipedia.org/wiki/Akashteer
रोचक
In reply to Turkish-supplied Bayraktar… by सुबोध खरे
धन्यवाद
चांगली माहिती.गेल्या काही…
In reply to Turkish-supplied Bayraktar… by सुबोध खरे
चांगली माहिती.
गेल्या काही वर्षांत ड्रोन क्षेत्रात भारतातील अनेक स्टार्टअप्स मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. माझे दोन-तीन मित्र पूर्वी इतर IT कंपन्यांमध्ये काम करत होते; पण आता ते ड्रोनशी संबंधित कंपन्यांमध्ये शिफ्ट झाले आहेत.
ड्रोन्सची लष्करी उपयुक्तता भारताने कदाचित 2020 मधील आर्मेनिया–आझरबैजान युद्धानंतर अधिक गांभीर्याने लक्षात घेतली. त्या युद्धात ड्रोनचा प्रभावी वापर झालेला.
२०१२ पासून भारतीय सैन्याची…
In reply to चांगली माहिती.गेल्या काही… by रात्रीचे चांदणे
२०१२ पासून भारतीय सैन्याची ड्रोन तंत्रज्ञानावर नजर आहे. ड्रोन निर्मिती आणि त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान ह्यावर भारतीय सैन्याने नेहमीप्रमाणे DRDO आणि IIT मार्फत काम सुरूच ठेवले होते. त्याकाळी अमेरिकेकडे काय आहे आणि चीन कडे काय आहे हे पाहून इथे ड्रोन्स ची निर्मिती सुरु होती. मध्यंतरी सरकारने चिनी आयातीवर निर्बंध घातले आणि द्रोण साठी मोटर्स वगैरे मिळणे कठीण झाले आणि knee jerk रिअक्शन मधून commerical ड्रोन्स वर अनेक निर्बंध आले. त्यामुळे भारत कमोडिटी ड्रोन्स च्या मार्केट मध्ये मागे पडला आणि आज DJI चे अत्यंत प्रगत द्रोण $४०० डॉलर्स मध्ये मिळतात. $४०० चा द्रोण एक फोटो दिल्यास गर्दींत त्या माणसाला शोधून त्याला फॉलो करू शकतो. ह्याचा उपयोग फोटोग्राफी साठी होत असला तरी हेच तंत्रज्ञान युद्धांत कसे वापरले जाऊ शकते हे आम्ही सहज पाहू शकतो. एके काळी मी ह्या सिस्टिम्स वर काम केले होते म्हणून थोडे ज्ञान आहे.
मागील काही वर्षांत भारताने भूमिका बदलली आहे. ड्रॉन्स मध्ये फक्त द्रोण असून उपयोग नाही तर लक्षावधी स्वस्त ड्रोन्स निर्माण करण्याची क्षमता पाहिजे हे भारताने ओळखून विविध निर्बंध कमी केले आहेत. त्याच मुळे अनेक खाजगी कंपन्या ह्यांत आता कार्यरत आहेत. सर्वांत महत्वाचे म्हणे २०३० पर्यंत भारत १००% स्वदेशी द्रोण निर्माण करू शकेल. १००% स्वदेशी म्हणजे मोटर साठी लागणारे तांबे पासून, compute साठी लागणारी चिप आणि कॅमेरा साठी लागणारी लेन्स पर्यंत सर्व काही. हि फार मोठी महत्वाकांक्षा असली तरी देशासाठी शक्य आहे. सध्या युक्रेन वर्षाला ७० लाख द्रोण निर्माण करतो आणि रशिया १२० लाख. रशियाचा एक सैनिक ऑफेन्सिव्ह पोसिशन मध्ये ३० मिनिटे पेक्षा जास्त टिकू शकत नाही. कारण ड्रोन्स. अमेरिकन Anduril सारख्या कंपन्या सध्या युक्रेनी तंत्र अभ्यासण्यासाठी यूक्रेन मध्ये तळ ठोकून आहेत.
तुर्की चे TB२ ड्रोन चांगले असले तरी शेवटी युक्रेन मध्ये काही काळानंतर ते पूर्णतः निष्प्रभ ठरले. TB२ ची कंपनी हे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन ह्यांच्या जावयाची आहे. त्यामुळे त्याला तिथे बरीच सरकारी मदत मिळते. हे ड्रोन्स शाहेद प्रमाणे स्वस्त नसून अमेरिकन रिपर ची सेकंड कॉपी आहेत. ह्या प्रकारची क्षमता भारतीय वायुदलाकडे खूप आधीपासून आहे. इस्राएल चे हेरॉन आणि हेरॉन MK२ त्याशिवाय भारतीय आर्चर आणि रुस्तम-२ हे सुद्धा आहेत. शाहेद सारखे skystriker आणि नागास्त्र नामक ड्रोन्स सुद्धा आहेत.
युक्रेन च्या युद्धांत ड्रोन्स तंत्रज्ञान अत्यंत वेगाने बदलत गेले. TB२ सारखे ड्रोन्स हे खुप प्रभावी असले तरी शेवटी wireless communication वर अवलंबून असतात त्यामुळे जॅमिंग सारख्या EW वर आधारित यंत्रणांनी ते निष्प्रभ केले जाऊ शकतात. त्यामुळे त्याच्यासाठी युक्रेन रशिया ने ऑप्टिकल कॅबेल जोडलेले द्रोण निर्माण केले. मग त्या केबल कापण्यासाठी दुसऱ्या प्रकारचे द्रोण.
$१०,००० च्या शाहेद ड्रोन साठी $२,०००,००० चे पेट्रीऑट चालणार नाही हे ओळखून अमेरिकेने विविध प्रकारची अँटी-ड्रोन यंत्रणा निर्माण केली. भारताने सुद्धा ह्या दिशेने पावले उचलली आहेत. सामान्य EW म्हणजे जमिंग तंत्रज्ञान भारताने आधीपासून विकसित केले आहे. पण शेकडो ड्रोन्स नि अचानक हल्ला केला (स्वार्म) तर त्याच्यासाठी काय करावे ह्यासाठी भारतीय कंपन्या काम करत आहेत.
हल्लीच गोव्यांत पर्तगाळी मठांत भव्य राम मूर्तीचे अनावरण प्रधान मंत्र्यांनी केले. त्याच्या सुरक्षेसाठी SPG तैनात होती. प्रधान मंत्र्यांचे आगमन झाले तेंव्हा SPG ला न सांगता गोवा पोलिसांनी आपला महागडा ड्रोन वरून फिरवला. SPG च्या EW ने तो तात्काळ नष्ट केला. गोवा पोलिसांना म्हणे त्यांत ५ लाखाचे नुकसान झाले.
सध्या माझे कॉन्टॅक्ट DRDO वगैरेत नसले तरी, अमेरिकेत ह्या संदर्भांत काय चालू आहे ह्याची माहिती आहे. भविष्यांत वायरलेस किंवा इतर कुठल्याही प्रकारचे "संदेश वाहन" तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन्स चालणार नाहीत असे दिसून येत आहे. त्याशिवाय AI ने जी प्रगती केली आहे त्यामुळे ज्याच्याकडे अडवान्सड AI चिप्स आहेत त्याच्या हातांत लाठी आहे आणि म्हणून म्हैस सुद्धा त्याचीच आहे. NVDIA इत्यादींनी Jetson Nano सारखे Edge AI प्लॅटफॉर्म निर्माण केले आहेत. $४०० डॉलर्स चा हा छोटा कंप्यूटर हातात मावतो पण ६७ ट्रिलियन ऑपरेशन्स प्रति सेकंड करण्याची त्याची क्षमता आहे. विना इंटरनेट विना कुठलेही वायरलेस कॉम्म्युनिकेशन वापरता ह्यावरील AI मॉडेल कॅमेरा आणि इतर सेन्सर वापरून आपले काम बजावू शकतो. म्हणजे ह्याला आज्ञा देऊन एकदा हवेंत सोडला कि हा जातो आणि काय कसे करायचे ते आपण पाहतो. बॅटरी असे पर्यंत हा चालत राहील. कधी कधी परत सुद्धा येईल. Jetson nano सारख्या commodity हार्डवेर वर एकदा प्रयोग करून सिद्ध केले कि नंतर त्याच विशेष चिप्स मास manufacture करून तुम्ही $४०० ची किंमत $४० वर आणू शकता. त्यामुळे अमेरिकेने ऍरिझोना इत्यादी ठिकाणी चिप्स निर्माण करण्याचे कारखाने सुरु केले आहेत.
अमेरिकन क्षेपणास्त्रांची सद्य स्थिती आणि पुढे काय ह्याची चर्चा : https://www.youtube.com/watch?v=vZUJHUkC-3M
उत्तम माहिती
In reply to २०१२ पासून भारतीय सैन्याची… by साहना
साहना,
अशी सुरेख माहिती देत चला. संघबिंघ चुलीत जाउद्या.
आ.न.,
-गा.पै.
संघबिंघ चुलीत जाउद्या. >>>+1
In reply to उत्तम माहिती by गामा पैलवान
संघबिंघ चुलीत जाउद्या. >>>
+1
त्याग-सुपरनोवा असलेल्या…
In reply to उत्तम माहिती by गामा पैलवान
त्याग-सुपरनोवा असलेल्या संघाच्या बाबतीत अशी शेलकी भाषा लिहून आपला संघद्वेष दाखवून दिल्याबद्दल तीव्र धिक्कार. ह्या सुपरनोवातून जे बुद्धिमत्तेचे बुटके तारे बाहेर येत आहेत त्यातील एक सुद्धा तुमच्या चुलीला पुरून उरेल.
त्याशिवाय चुलीत शक्यतो स्वच्छ इंधन टाकावे असे माझे मत आहे.
असो !
https://www.tomshardware.com…
In reply to २०१२ पासून भारतीय सैन्याची… by साहना
https://www.tomshardware.com/tech-industry/artificial-intelligence/nvidia-jetson-chip-found-in-russian-cruise-missile-ukraine-claims-presence-in-s-71-monochrome-weapon-may-indicate-use-of-ai-tech
NVIDIA Jetson ह्याचा वापर ड्रोन मध्ये होणार हे मी आधी लिहिले होते आणि इतक्या लवकर रशियन क्षेपणास्त्रांत ते सापडले जाईल हि अपेक्षा नव्हती.
च्यायला
In reply to https://www.tomshardware.com… by साहना
रशियाच्या ट्रॅक २ प्रोक्युरमेंट अँड सप्लाय चेन चे कौतुक करायला हवे ! मिसाईल मध्ये टाकली आहे चिप म्हणजे इंडस्ट्रीयल स्केल वर मागवल्या आहेत चिप्स, त्याआधी त्याचे इंटिग्रेशन सुद्धा केले ! कमाल म्हणावी लागेल.
वैताग म्हणू की ....
In reply to च्यायला by वृषभ खोंडे
च्यामारी, व्हिडियो गेम आणि प्रत्यक्ष लढाई यांतलं अंतर झपाट्याने कमी होतंय. की शून्यच झालंय? हा वैताग म्हणावा की समाधान?
-गा.पै.
https://www.youtube.com…
https://www.youtube.com/watch?v=7Vhs2bKjTrQ
https://www.youtube.com…
https://www.youtube.com/watch?v=5vYVg-rRKAc
जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत…
जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत शत्रू प्रबळच होत जाणार!
अच्छा ! म्हणजे मोदी सत्तेतुन…
In reply to जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत… by अमरेंद्र बाहुबली
अच्छा ! म्हणजे मोदी सत्तेतुन गेले की शत्रुच सत्तेवर येणार की काय???? अले बापले... नको नको =))
ख्या ख्या ख्या, काय भारी…
In reply to अच्छा ! म्हणजे मोदी सत्तेतुन… by राज जोशी
ख्या ख्या ख्या, काय भारी विनोद केला, ख्या ख्या ख्या, ख्या ख्या ख्या.
शेखर गुप्ता यांनी त्यांच्या…
शेखर गुप्ता यांनी त्यांच्या Cut the Clutter या YouTube व्हिडिओमध्ये या विषयावर सविस्तर विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते, हा करार strategic पेक्षा symbolic अधिक आहे. त्यांनी यामागे तीन महत्त्वाची कारणे दिली आहेत.
पहिलं कारण म्हणजे “No Common Enemy”. Saudi Arabia, Pakistan आणि Turkey या तिन्ही देशांच्या security concerns आणि strategic priorities वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे NATO सारख्या मजबूत defence alliance साठी आवश्यक असलेला समान शत्रू किंवा समान strategic threat येथे दिसत नाही.
दुसरं कारण म्हणजे economic constraints. Saudi Arabia वगळता Pakistan आणि Turkey दोन्ही देश सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत.सौदीच पण काही बरं चाललं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दीर्घकालीन military cooperation किंवा एकमेकांना आर्थिक मदत करण्याची त्यांची क्षमता मर्यादित आहे.
तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे geopolitical impact. या नव्या करारामुळे आधीपासून अस्तित्वात असलेल्या GCC आणि OIC सारख्या regional organisations वर याचा परिणाम होऊ शकतो. Saudi Arabia ने Pakistan आणि Turkey सोबत स्वतंत्र security arrangement केल्यामुळे इतर देशांना ते आवडेलचं असं नाही.
https://youtu.be/Dzms5zLKewQ?si=43VqutNJL9POxaoy