Skip to main content

भ्रष्टाचार

लेखक मारवा यांनी रविवार, 23/08/2026 22:21 या दिवशी प्रकाशित केले.

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषधी प्र्शासना चा पदभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच या क्षेत्रातील भ्र्ष्टाचारावर मोठा प्रहार केलेला आहे. या निमित्ताने भ्र्ष्टाचार या विषयावर मुळापासुन विचार करण्याचा प्रयत्न करत असतांना माझ्या मनात काही मुद्धे आले ते असे.
भ्रष्टाचार हा मुलतः केवळ आर्थिक बाबतीतला वा त्या फायद्याच्या प्रेरणेतुन केलेला सध्या विचार करतोय ( बाकी प्रकारचे तुर्तास बाजुस ठेउ या ) या संदर्भात हा वाईट आहे अनेक प्रकारे नुकसान कारक आहे इत्यादीवर सर्वांचेचे एकमत असते आहे आणि तरी आपल्या भारतासारख्या देशात आपण सर्वच तो करतो कमी अधिक प्रमाणात मजबुरीने आनंदाने कसेही म्हणा पण सर्वांना त्यात एकमत ही आहे आणि एकदिलाने आपण तो करतो सुद्धा. अगदी बाळकडु वगैरे आपल्या सर्वांना दिले जाते घेतले जाते.
आता हा मिटवण्या संदर्भात जेव्हा वेगवेगळे उपाय सुचविले जातात उदा तंत्रज्ञाना चा वापर वगैरे जसे मध्यंतरी फेसलेस स्क्रुटीनी किंवा डीबीटी वगैरे वगैरे किंवा सर्वात विनोदी म्हणजे सर्वात मोठा काळा विनोदी प्रकार म्हणजे "अन्टी करप्शन ब्युरो " मतलब कुछभी भाई कुछभी हे कसे शक्य आहे की त्या विभागातला अधिकारी पैसे खाउन इतर करप्ट अधिकार्‍याला वाचवणार नाही. आणि प्रत्यक्षात खरेच ते ही भ्रष्टाचार करतात तर ते एक असो
मुळ मुद्धा असा की मला असे वाटते की भ्रष्टाचाराची एक महत्वाची प्रेरणा माझा स्वार्थ साधणे ही असते इतरही असतील पण सर्वात महत्वाची प्रेरणा म्हणजे उदा. माझ्या दुकानाचे शॉप अ‍ॅक्ट चे लायसन काढायचे आहे हे मला तत्काळ हवे आहे त्याशिवाय मी काम सुरु करु शकत नाही किंवा फार्मसी चे घ्या उदाहरण. जितका उशीर होइल तितका मला सुरु करणे अवघड होइल. म्हणजे त्याशिवाय ही सुरु होऊ शकते पण मला मोठा दंड किंवा मोठी लाच देण्याची इच्चा नाही शिवाय मी एक एरवी प्रामाणिक माणुसच आहे वगैरे.
तर मी पैसे चारुन एरवी सर्व योग्य कागदपत्रे असुनही फार्मसी लायसन वेळेवर मिळवतो व दुकानदारी सुरु करतो.
इथे काय होते की माझा तत्कालिक नजीकचा स्वार्थ साध्य होतो पण हीच रीत मजसारखे एक लाख लोक जेव्हा अवलंबतात तेव्हा मग ती एक सिस्टीम तयार होते जी कुणालाही ब्रेक करणे जवळपास अशक्य होते.
पण इथे माझा एक दुरगामी लॉस होतो आणि मज सारख्या एक लाख लोकांचा होतो. त्यांना प्रत्येक लायसन साठी रीन्युअल साठी एक अनावश्यक किंमत मोजावी लागते. मग ही अधिकची किंमत आणि अशाच इतर अनेक अधिकच्या किंमती मिळुन एक मोठी किंमत मी मोजतो. मग मी या सर्व किंमती माझा ग्राहक किंवा इतर संबधिंताकडुन " वसुल" करतो. मग ते फिरत फिरत किंमत मोजतात व वसुलतात. अशी सायकल मोजा वसुला सर्व समाजात फिरते सतत सतत सतत. आणि प्रत्येक संबंधित घटक ही " एक्स्ट्रा किंमत " मोजतो.
यात काहीही नविन नाही हे अगदी कॉमन सेन्स आहे. पण मुद्धा इतकाच आहे की हा जो
आजच्या छोट्या फायद्या च्या तुलनेत कालचा मोठा तोटा आहे
आजच्या स्वार्थ साध्य करण्यात उध्याचा मोठा स्वार्थ गमावणे आहे.
हे स्वार्थ केंद्रीत विचारसरणी योग्य मानुनच फार सकारात्मकतेने म्हणजे स्वार्थासाठीच मोठ्या स्वार्थासाठीच व स्वतःच्या च स्वार्थासाठी आहे आणि फार चांगले आहे जर आपण मोठा स्वार्थ लक्षात ठेऊन काम केले किंवा प्रबोधन केले तर आणि यासाठी तुम्ही जो आताचा भ्रष्टाचार करत आहात तो करु नका असे सर्वांना अपील केले पाहीजे असे माझे म्हणणे आहे.
म्हणजे हे जे अंतर आहे की आज मला फायदा झाला जो की एकदम ज्याला इंग्रजीमध्ये Tangible benefit असे म्हण तात ज्याची व्याख्या Tangible benefits are clear, measurable, and concrete gains that have a direct monetary value. You can count, track, and prove them with numbers. They include things like higher sales, lower costs, and cash bonuses. अशी आहे.
तर मला असे म्हणावयाचे आहे की जेव्हा तुम्ही तत्कालिक भ्रष्टाचार जेव्हा टाळतात तेव्हा जो दुरस्थ फायदा होइल तो प्रमोट केला पाहीजे तो दाखवला पाहीजे. हा बघ सुर्य हा बघ जयद्रथ स्टाइल मध्ये
आपण या दुरच्या फायद्या ला स्वार्थाला हायलाइट करण्यात कमी पडतो असे मला प्रामाणिकपणे वाटते.
म्हणजे उद्या सर्व रस्ते चांगले मिळण्यासाठी आज मी बिल पासींगचे माझे टक्के माझ्या अधिकारात नाकारतो, किंवा उद्या चुकीच्या वाहनांना परमिट मिळुन त्यांनी मला रस्त्यावर उडवु नये माझा जीव वाचावा म्हणुन मी आज लायसन साठी पैसे देत नाही. ( हिन्दुस्त्तानी या कमल हसन च्या सिनेमात एक अंधुक आठवते काहीतरी त्याचा मुलगा लायसन पास करतो गाडीचा अपघात होतो ) तर दोन्ही बाजुनी म्हणजे
माझा स्वार्थ मोठा स्वार्थ कसा साध्य होइल हे मला दाखवले पाहीजे व माझे मोठे नुकसान कसे होइल हे दाखवले पाहीजे.
हे म्हणजे जसे त्या प्रसिद्ध मार्शमेलो प्रयोगात दाखवले, किंवा आपण सर्वच जाणतो अनेक मोटीवेशनल गुरुनी आपल्याला शिकवलेले आहे ते Delayed gratification या क्षमतेविषयी ज्याची व्याख्या Delayed gratification is the ability to resist a small immediate reward to get a better and bigger reward later.
याचा इथे प्रचार प्रसार केला पाहीजे . यासाठी भारतीयांना खास करुन जपान वगैरेची उदाहरणे द्यावीत की बघा ते सच्चे मतलबी आपल्याहुन उत्तम मतलब त्यांनी कसा साध्य केला वगैरे
म्हणजे अनेक जणांना जसे कळतच नाही की भ्रष्टाचार न करता नजीकचा फायदा टाळुन ते सरतेशेवटी एक मोठा स्वार्थ साध्य करणार आहेत. हा मुद्दा हायलाइट करणे महत्वाचे आहे आणि तो सुद्ध स्वार्थ निखळ स्वच्छ सुंदर सुबक स्वार्थ केंदस्थानी ठेउनच हे सर्व केले पाहीजे असे मला प्रामाणिकपणे वाटते. हे जर कन्व्हिन्स करता आले तर कदाचित काही बदल होइल
तुम्हाला काय वाटते जाणुन घ्यायला आवडेल या निमित्ताने भ्रष्टाचारा च्या मुळात जाऊन चिकीत्सा करण्यास आवडेल.


 


वाचने 109
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया