Skip to main content

पुणे म्हणजे प्रेम असतं

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 24/08/2026 20:53 या दिवशी प्रकाशित केले.

पुणे म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
छात्रो , मित्रों 'सेम' असतं !

काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?

असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !

तरीसुद्धा
तरीसुद्धा,

पुणे म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
छात्रो , मित्रों 'सेम' असतं !

चहा बिहा विकलात तरी
प्रेम बीम करता येतं;
डून स्कूलला शिकलात तरी
प्रेम बीम करता येतं !
जंतर मंतर हुकलात तरी
प्रेम बीम करता येतं
पुणे म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
छात्रो , मित्रों 'सेम' असतं !

लेखनविषय:

वाचने 82
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया