अप्पा चा विषय लय हार्ड है
अप्पा जोगळेकर यांनी मिसळपाव हे संकेतस्थळ सोडून दिलेले पाहून खरोखरच वाईट वाटले.
ऑनलाइन मंच म्हटलं की चार माणसं एकत्र येणार, चार विचार समोर येणार आणि मतभेद तर होणारच. सगळेच एका विचाराचे असते तर मग चर्चेला काही अर्थच उरला नसता, अगदी सगळ्यांची नाव एकच असल्यासारखं सपक वाटलं असतं. पण मतभेद इतके टोकाला जावेत की एखाद्या जुन्या आणि अभ्यासू सदस्याला थेट जागाच सोडून जावी वाटेल, हे काही बरोबर नाही. असं वाटतं की आपण कुठेतरी संवाद हरवून बसलोय.
अप्पांचा विषय नेहमीच लय हार्ड राहिलाय! त्यांचा अभ्यास, विषयाची मांडणी आणि शब्दांची पकड यामुळे त्यांच्या पोस्ट वाचायला एक वेगळीच मजा यायची. कधी मुद्दा पटायचा, कधी पटायचा नाही, पण त्यांचा विचार दुर्लक्षित करता यायचा नाही. असा माणूस जेव्हा एखादं व्यासपीठ सोडतो, तेव्हा नुकसान त्या माणसाचं नाही, तर त्या पूर्ण मंचाचं आणि वाचकांचं होतं.
वाद हवेत, पण ते विचारांशी असावेत, व्यक्तीशी नाही. कुणाला एवढं दुखावलं जाऊ नये की त्याला आपलं घर वाटणारं ठिकाण परकं वाटू लागावं. मतभेद नक्कीच असावेत, पण मनात भेद नसावेत. अप्पांनी पुन्हा परत यावं आणि मिसळपाववरची ती जुनी रंगत पुन्हा आणून द्यावी, हीच प्रामाणिक इच्छा आहे.
मिसळपाव
प्रतिक्रिया
सोडलं नव्हे तर पाटीच पुसली.
ते जाऊ दे काही लेखक आपलेच लेख लोकांनी वाचावेत अशी इच्छा धरतात पण इतरांचे अजिबात वाचत नाहीत किंवा प्रतिसाद देत नाहीत. त्यांचेही विषय तेच असतात पण नाही प्रोत्साहन देत. चुकून दोन ओळींचा प्रतिसाद दिला तर मीही यावर लिहिले आहे अशी फक्त जाहिरात असते.
इतके दिवस मिपावर वावरताना..
असे लक्षात आले की इथे सुद्धा उन्हाळा,पावसाळा हिवाळा आणी उप ऋतू असतात......
मुळीच नाही, थोडे ऑड वाटेल वाचायला
असं वाटतं की आपण कुठेतरी संवाद हरवून बसलोय.
पण असं मुळीच वाटत नाही.
पहिली गोष्ट तर आप्पांनी लेखन डिलीट केले आहे जुने, त्याचा आयडी अबाधित आहे. दुसरे म्हणजे संवाद हरवून बसविण्यासाठी आप्पांना विशेष काही करण्याची गरज नव्हती. कारण आता युरोपियन लोकांना वसाहतवादाची शिक्षा म्हणून मोरक्कन बेकायदेशीर लोकांनी स्पॅनिश स्त्रिया भोगल्या तर फरक पडू नये अशा आशयाची पोस्ट केल्यावर असल्या माणसाशी काय संवाद साधणार ?
परत वादविवादात कोणी एक पॉईंट टाकला की तिसऱ्याला त्या प्रतिसादावर येऊन सापांना दूध पाजू नका इत्यादी दिव्य ज्ञान पाजळणाऱ्या माणसाशी संवाद कसला अन् का साधायचा ? प्रतिसाद म्हणावे तर फॅक्ट अँड फिगर पेक्षा पर्सेप्शन जास्त मग डायरेक्ट अमेरिकेने लेंडी टाकली इत्यादी महान शोध
असो,
असली माणसे गेली असतील तर मला तरी दुःख नाही.
(प्रासंगिक स्पष्टवक्ता) खोंडे
आप्पांचे सदस्यत्व अकार्यरत…
आप्पांचे सदस्यत्व अकार्यरत झाले आहे. त्यांनी मिपाला अखेरचा जय महाराष्ट्र करून अज्ञात स्थळी प्रस्थान केले आहे.
हम्म
In reply to आप्पांचे सदस्यत्व अकार्यरत… by श्रीगुरुजी
बरे आहे, महापुरुषांच्या नावाने भलतेसलते बोलून पुरावे मागता पळ काढला एकंदरीत. स्पॅनिश स्त्रियांच्या बद्दल त्यांनी काढलेले मनातील घाण विचार पाहता हा इसम मिपावर सोळा वर्षे आहे ह्यावर विश्वास बसला नव्हता. विरोधकांना साप वगैरे म्हणण्यात त्यांची कोती मनोवृत्तीच दिसली. त्यामुळे मिपावर भेटलात आप्पा परत कुठे (अन् वरतीही भेटू नका) इतके म्हणून खाली बसतो.
अप्पांचे जुने लेखन वाचलेले…
अप्पांचे जुने लेखन वाचलेले आठवत नाही पण हल्लीचे प्रतिसाद एक तर अश्लाघ्य होते किंवा "दैनिक सनातन प्रभात" प्रमाणे निरर्थक टिपण्ण्या. पण कधी कधी वैयक्तिक कारणाने माणसाचा स्वभाव बदल वगैरे होतो. त्यामुळे आप्पा ना शुभेच्छा आणि परमेश्वर सद्बुद्धी देवो हि प्रार्थना.